वेध ची कार्यप्रणाली

मुलांच्या शिकण्याला गती मिळावी, 100% मुले शिकती व्हावीत, यासाठी काय करता येईल? ज्याने शिक्षकाचे काम कमी होईल आणि परिणाम अधिक मिळतील, हा विचार केंद्रस्थानी ठेऊन “वेध वर्क टीम” नावाचा whats app समूह तयार केला गेला आहे, जिथे महाराष्ट्र सोबत इतर राज्यातील शिक्षण प्रेमी आणि ज्यांना शिक्षणात योगदान द्यायचे आहे, त्यासाठी वेळ आणि श्रम गुंतवण्याची ज्यांची तयारी आहे, अशी मंडळी एकत्र येऊन दररोज रात्री 9 ते 10.30pm  या वेळेत चर्चा करत आहेत.दिवसभर आपले कार्यालय, शाळा, गृहस्थी सांभाळून दररोज रात्री हि मंडळी सातत्याने एकत्र येऊन मूल शिकण्याच्या अनुषंगाने काम करत आहे. रात्रीच्या या चर्चेत माजी शिक्षण सचिव  नंदकुमार  सर यांचे “वेध वर्क टीमला” सातत्याने मार्गदर्शन मिळत आहे. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आणि नवनवीन कल्पना यांच्या माध्यमातून शिक्षकांच्या या प्रामाणिक प्रयत्नांना दिशा देण्याचे काम नंदकुमार सर यांच्या सोबतीने होत आहे हे विशेष.

100% मुले शिकण्यासाठी वेध चे भविष्यवेधी प्रशिक्षण मॉड्यूल शिक्षकांना स्व: पातळीवर करता येतील अशा खालील 6 बाबींबाबत जागरूकता निर्माण करते आणि त्यांना प्रशिक्षण देते. स्व: पातळीच्या या बाबी करण्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहन देणे, त्याची कार्य पद्धती समजावणे, शिक्षकांची बदलती भूमिका इ. बाबीवर 4 दिवसीय प्रशिक्षणाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाते. या  6 बाबी केल्यास निपुण भारत अभियान मध्ये अपेक्षित उद्दिष्टांची पूर्तता होताना दिसत आहे.

वेध ने आतापर्यत केलेले काम (संक्षिप्त)
पुढील व्हिजन

जिल्हानिहाय PLC विकसित करणे.

मुलांचे शिकणे मोजण्यासाठी शाश्वत अशी मूल्यमापन व्यवस्था तयार करणे.

मुलांना आपले यश मोजता यावे, शिक्षकांना प्रत्येक मूल शिकण्याच्या पातळीवर कुठे आहे हे पडताळता येण्यासाठी व्यवस्था तयार करणे.

शिक्षकांना मुलांसोबत काम करताना येणारे अनुभव, मिळणारे परिणाम तसेच येणाऱ्या अडचणींबाबत निर्भयपणे व्यक्त होण्यासाठी वर्चुअल माध्यम उपलब्ध करून देणे.

सोशल मेडियाच्या माध्यमातून सातत्याने सक्सेस स्टोरीज प्रसारित करणे.

विशिष्ट कालावधी नंतर शिक्षक सभांचे आयोजन करणे.

झूम च्या माध्यमातून मिळालेले परिणाम सादर करण्यास शिक्षकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे.

प्रश्न तुमचे उत्तर आमचे या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्याच व्यवसाय बंधूंकडून मदत उपलब्ध करून देणे.

सेल्फी विथ सक्सेस या उपक्रमाच्या माध्यमातून समाजात आपण करत असलेल्या कामाचे प्रसारण करण्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहन देणे.

पालक समाज यांना जोडण्यासाठी वर्चुअल माध्यमांचा उपयोग करणे.

 वेध स्त्रोत विविध प्रशिक्षणे, घटक संच, चाचण्या तथा आवश्यक त्या सर्व बाबी विकसित करण्यासाठी ज्ञान भागीदार म्हणून मदत करतात.