ROAD MAP
भारत देशात १०० कोटीपेक्षा अधिक लोकांकडे मोबाईल फोन उपलब्ध झाले आहेत. शहरीभागात झोपडपट्टीतील प्रत्येक कुटुंबाकडे सुद्धा किमान एक मोबाईल आहे. ग्रामीण भागात अजून १००% कुटुंबाकडे मोबाईल उपलब्ध नाहीत. परंतु एखाद्या शाळेचा विचार केल्यास एखाद्या वर्गातील ७० ते ८० टक्के मुलांच्या पालकांकडे मोबाईल उपलब्ध आहेत. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यामधील एका शाळेतील पाचव्या वर्गाच्या मुलांसोबत इंग्रजी वाचनासाठी GOOGLE BOLO App च्या वापराबाबत चर्चा केली असता अधिकांश मुले ती वापरत होती. काही मुले वापरत नव्हती त्याचे कारण पालकाकडे मोबाईल उपलब्ध नसल्याचे सांगितले. परंतु GOOGLE BOLO App वापरणाऱ्या मुलांना विचारले तेव्हा त्यातील ३-४ मुलांच्या पालकाकडे मोबाईल नव्हते पण त्यानी काका, नातेवाईक किंवा मित्राच्या पालकांच्या मोबाईलचा वापर करीत होते. आता ज्या पालकांकडे मोबाईल नाही त्यांची मुले मित्रांच्या पालकांचे मोबाईल वापरू शकतात.
परंतु काही डोंगराळ आणि आतील गावांमध्ये मोबाईल नेटवर्क उपलब्ध नाहीत तसेच काही पालकांकडे मोबाईल नाहीत किंवा लहान मोबाईल (DATA PACK न वापरणारे) आहेत. या भागातील मुलांना शिकण्याकरिता मोबाईल टेक्नोलॉजी चा वापर करणे अवघड होईल. तथापि अपेक्षा आहे कि मोबाईल नेटवर्क लवकरच सर्वदूर पसरेल तसेच एकदा मोबाईलचा शैक्षणिक उपयोग कळला आणि पटला तर सर्व पालक (गरीब पालक सुद्धा) DATA PACK असणारा मोबाईल विकत घेतील.
गरीब पालक सुद्धा मोबाईल का घेतील? आमच्या देशात इंग्रजीचे फारच आकर्षण आहे. ते आकर्षण एवढा जबरदस्त आहे कि सर्वाना मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकावी असे वाटते. परंतु अजून तरी देशातील सर्व राज्याने मातृभाषा बाजूला सारून सर्व शाळा इंग्रजी माध्यमाच्या केलेल्या नाहीत. अर्थात काही राज्यांनी सर्व शाळा इंग्रजी माध्यमाच्या करण्याचा निर्णय घेतला आहे. मोबाईच्या वापरणे मातृभाषेच्या शाळेत शिकत असलेली मुले सुद्धा इंग्रजी माध्यमाच्या शाळेसारखे इंग्रजी शिकू शकतात. याचे भरपूर उदाहरणे तयार झाले आहेत. त्याबाबत नंतर सविस्तर चर्चा करण्यात येईल. अंतः इंग्रजी शाळेत (उपलब्ध नसल्यामुळे) न शिकता सुद्धा त्यांची मुले इंग्रजी शिकतील या आकर्षणामुळे गरीब पालक DATA PACK वाले मोबाईल घेतील. मात्र यासाठी हे दाखवून द्यावे लागणार आहे कि प्रत्येक शाळेत आणि गावात काही मुले मोबाईलचा वापर करून फक्त इंग्रजी नाही तर इतर विषय आणि आधुनिक जगण्यास उपयुक्त बाबी कुशलतेने शिकत आहेत.
शिक्षण व्यवस्थेने मुलांकडून शिकणे :- बऱ्याच कारणानी आजच्या शिक्षण व्यवस्थेला मुलांकडून शिकण्याची आवश्यकता आहे. त्यातील काही कारणे खाली दिले आहेत.
- वाबळेवाडी (ता. शिरूर, जि.पुणे) शाळेचे मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय वारे खूपच संवेदनशील आहेत. पाचवीत शिकत असलेल्या वेदांतच्या दप्तरमध्ये नेहमी काही नट-बोल्ट असावयाचे. श्री. वारे यांनी विचारल्यावर लक्षात आले कि वेदांत ला हे नट-बोल्ट हाताळण्याची खूप इच्छा व्हायची. यावरून श्री. वारे ला नीति आयोगाची TINKERING LAB आपल्या शाळेत सुरु करण्याचे सुचले. आज बरीच मुले आविष्कार LAB (TINKERING) चा वापर करून नवीन PRODUCT बनवत आहेत. सहा मुलांनी मिळून इलेक्ट्रिक कार डिझाईन केले आहे. स्वतः वेदांतला सहा पेटंट मिळण्याची शक्यता आहे.
- इटाळी (ता.पाथरी, जि. परभणी) परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाप्रती खूप सजग आहेत. जिल्ह्यातील मुलांना चांगली इंग्रजी यावी म्हणून त्यांनी ऑगस्ट २०१९ पासून रेडीओचा वापर करणारे WE LEARN ENGLISH कार्यक्रम सुरु केला आहे. या कार्यक्रमाची यशस्विता पाहून त्यांनी घरगुती साहित्याचा वापर करून मुलांना विज्ञानाचे प्रयोग करता येईल असे रेडिओवर आधारित “चला शिकूया प्रयोगातून विज्ञान” कार्यक्रम सुरु केला आहे. हा कार्यक्रम डिसेंबर २०१९ पासून आठवड्यातून एकदा सुरु झाला आहे. जिल्ह्यात याची चर्चा सुरु झाली. श्रीमती कुसुम कच्छवे विषय साधन व्यक्ती इटाळी गावात गेल्या असता त्यांना सातव्या वर्गात शिकणारा कपिल भेटला. कपिल YOUTUBE मधून VIDEO पाहून पाहून घरी विज्ञानाचे प्रयोग करत राहतो. त्याने सहा प्रयोग करता येईल अशी एक विज्ञान पेटी सुद्धा विकसित केली आहे. वडील शेतकरी असल्याने शेतात यंत्र वापरले जाते. BATARY खराब झाल्यावर वापराबाबत कपिल ने विचार केला. आज त्याच्या घराच्या ४ खोल्यांना त्यानेच प्रकाश मिळतो. यास सुद्धा पेटंट मिळण्याची शक्यता आहे.
- जिल्हा परिषद शाळा मारसूळ (ता.मालेगाव जि.वाशीम) मुलांना घरामध्ये फेकून दिलेले एक यंत्रासारखी वस्तू दिसली. मुलांनी ती उचलून शिक्षकाकडे आणून त्याबद्दल माहिती विचारली. शिक्षकाने ते यंत्र खराब झालेले मसाजर असल्याचे सांगितले. मुलांनी ते दुरुस्ती करण्याबाबत विचारले तर शिक्षकांना माहिती नव्हते. मग मुलांनी ते स्वतः दुरुस्त केले. आज एक मुल त्याचा वापर करून इतरांना मसाज करून देतो व थोडे पैसेही मिळवितो. मुलांच्या या कृतीने प्रेरित होऊन शिक्षकांनी मुलांना COMPUTER CODING शिकविण्याच्या हेतूने स्वतः COMPUTER CODING चे प्रशिक्षण घेत आहेत.
- पिंपळे गुरव (महानगरपालिका – पिंपरी चिंचवड जि. पुणे) आंतरराष्ट्रीय शिक्षण विचार प्रशिक्षणांतर्गत शिक्षकांना सांगितले गेले कि येत्या काळात सध्या शाळेत असलेल्या मुलांना जगाच्या कोणत्याही देशात जाऊन नोकरी/उद्योगधंदे करावे लागणार आहे. त्यामुळे मुलांना फक्त मातृभाषा आणि इंग्रजी नव्हे तर देशातील आणि जगातील इतर भाषाही यायला पाहिजे. शिक्षकांनी जाऊन हे मुलांना सांगितले. ते ऐकून ७ व्या वर्गाच्या १५ मुलांनी ४ भाषा (जपानी, चीनी, जर्मन आणि फ्रेंच) YOUTUBE पाहून शिकण्यास सुरुवात केली आहे. याचप्रमाणे केसुर्ली (ता. भद्रावती, जि.चंद्रपूर) ची मुले इतालवी, गाडीवाट (ता. व जि. औरंगाबाद) ची मुले १३ भाषा यात ३ विदेशी आणि १० आंतरदेशीय भाषा शिकण्याची सुरुवात केली आहे.
- वाबळेवाडी (ता. शिरूर, जि. पुणे) अमेरिका आणि इंग्लंड मध्ये ६ वर्षे वयाच्या मुलांना COMPUTER CODING शिकविले जात आहे, हि बातमी मी वाचली. श्री. दत्तात्रय वारे यांना या बातमीची स्कॅन कॉपी पाठविली आणि विचारले कि त्यांच्या शाळेत पण COMPUTER CODING चे शिक्षण दिले जाते काय ? त्यांची शाळा आंतरराष्ट्रीय शाळा असल्याकारणाने जगाच्या कोणत्याही देशाच्या शिक्षणापेक्षा मागे असता कामा नये. याची त्यांना आठवण करून दिली. श्री. वारे कोणतीही मर्यादा बाळगत नाहीत. त्यांनी सांगितले कि ६ वर्षे वयाच्या मुलांना सध्या इंग्रजी शिकवत आहे (हि शाळा मराठी माध्यमाची) त्यामुळे कोणी बाहेरची व्यक्ती त्यांना COMPUTER CODING शिकवू शकतील असे वाटत नाही. तथापी ६ वी ते ९ वी च्या मुलांना आधी शिकवितो मग त्यांच्याकडून पहिल्या वर्गाच्या मुलांना शिकविणार.
त्यांनी बाहेरून COMPUTER CODING शिकविणारी एक व्यक्ती बोलावली. त्यांनी C++ आणि JAVA शिकण्याचे पाठ्यक्रम ठरविले. C++ शिकण्यापूर्वी C हि भाषा शिकवली. वाबळेवाडी शाळेच्या ६ वी ते ९ वी च्या मुलांना SUPER १५० नावाचा WHATS APP ग्रुप तयार केला आहे. काही मुलांना प्रश्न पडला कि C आणि C++ मध्ये काय फरक आहे. त्यांनी यु-ट्यूब पाहून अभ्यासला. त्यांना २४ फरक आढळले. ते फरक त्यानी SUPER १५० मध्ये शेयर केला. अजून काही मुलांनी C भाषेत लिहिलेले COMPUTER PROGRAMME C++ मध्ये बदलण्याचे सूत्र यु-ट्यूब मधूनच शोधून काढले. शाळेत एक दिवस आव्हान कार्यशाळा ठरविली. ‘C मधला कोणताही प्रोग्राम द्या मिनिटात C++ मध्ये बदल करून दाखवू.’ हा आव्हानाचा विषय. कार्यशाळा भरविली, आव्हान पूर्ण झाले. C++ शिकण्याची गरज संपली. अजून काही मुलांना C++ येत असेल तर JAVA शिकणे किती उपयोगी ? या प्रश्नाचा शोध यु-ट्यूब मधूनच घेतला. JAVA शिकणे उपयोगाचे नाही असा उत्तर मिळाले. त्यामुळे JAVA शिकाण्याची गरज सुद्धा संपली.
मग पुढचा प्रश्न निर्माण झाला. फक्त C++ शिकून COMPUTER चे जग जिंकता येते काय? उत्तर मिळाले वेग-वेगळा वेळी वेग-वेगळ्या देशात वेग-वेगळे COMPUTER PROGRAMME लोकप्रिय असतात. सध्या भारतात PYTHON हा COMPUTER PROGRAMME लोकप्रिय आहे. मग काही मुलांनी PYTHON शिकून घेतला. सध्या वे-वेगळ्या समस्यांवर APP तयार करतात.
- सध्या गाजत असलेले पुस्तक ‘SAPIENS’ HOME DENS आणि 21 QUESTIONS ON 21ST CENTURY SKILLS चे लेखक युवल नोह हरारी म्हणतात कि २०५० चे जग कसे राहील आज कोणालाच माहिती नाही. अजून एक माहिती अशी आहे कि पुढील १० वर्षात सध्या उपलब्ध असलेल्या नोकऱ्यापैकी ४० टक्के विलोप पावतील. नवीन नोक-या कोणत्या येतील याबद्दल एकदम स्पष्टता नाही.
युवल नोह हरारी पुढे म्हणतात कि, औद्योगिक क्रांतीने समाजामध्ये दोन वर्ग तयार केले, कामगार वर्ग आणि भांडवलदर वर्ग. सूचना क्रांती सुद्धा दोन वर्ग तयार करेल, उपयोगी वर्ग आणि निरुपयोगी वर्ग. कॅलिफोर्निया मधे ते बोलत होते. यावरून त्यांना प्रश्न विचारले गेले कि याचा अर्थ असे लावायचे काय कि अमेरिकेतील बरेच लोक निरुपयोगी होतील. तेव्हा ते उत्तरले नाही. ग्वाटेमाला आणि बांगलादेश सारखे देशांमधील लोक निरुपयोगी होतील.
भारत देशाचे बरेच इंजिनियर कॅलिफोर्निया मध्ये काम करतात म्हणून ते भारत देश बोलले नसावे. परंतु भारत देशाच्या शिक्षण व्यवस्थेतून सगळीच मुले कॅलिफोर्निया मध्ये कार्यरत भारतीय इंजिनियर्सच्या दर्जाचे तयार होत नाहीत हे आम्हाला माहित आहे. त्यामुळे आज चालत आहेत तश्याच आपल्या शाळा चालत राहिल्या तर ५० टक्के मुले पर्यायाने ५-६ बांगलादेश आपल्याकडे निरुपयोगी होण्यासाठी तयार आहे. असाच युनिसेफचा तसा एक अहवाल सुद्धा आहे.
तसेही २०५० चा जग कसे राहील हे कोणाला माहित नाही आणि आज शाळेत असलेली मुले तेव्हा ३५-४० च्या वयाचे राहतील, तेव्हा ते खरे आयुष्य जगत राहतील. माहित नसलेल्या लोकांनी त्यांना माहिती शिकवू नये हे स्पष्ट आहे. मग ‘माहिती कशी मिळवावी; हे शिकवावे’ वरील उदाहरणांमध्ये मुले नेमके तेच करत आहेत. म्हणून मुलांकडून शिकायची गरज आहे.
वाबळेवाडीची शाळा पाहिल्यावर (दर आठवड्याला ५०० ते १००० लोक भेटी देतात) सर्वाना वाटते कि त्यांची शाळा पण तशीच असावी. शाळेबद्दल अधिकांश माहिती मुलेच देतात. शेवटी मुलांना विचारले गेले कि तुमच्या शाळेत बरेच काही आहे. यातले दोनच गोष्टी करावयाच्या झाल्यास कोणत्या ? यावर मुलांनी उत्तर दिले, “फक्त एकाच गोष्ट करा, मुलांचे ऐका.”
मुलांनी सुद्धा मुलांकडूनच शिकणे :-
शिक्षण व्यवस्थेने अजून एक गोष्ट शिकायची आहे. मुले, मुलांकडून अधिक चांगले शिकतात. त्याचे भाषिक तसेच मनोवैज्ञानिक कारणे आहेतच. वरील उदाहरणांवरून एक अतिरिक्त कारण तयार झाले आहे ते म्हणजे शिक्षकांना माहित नसलेल्या बाबी शिकण्याची गरज.
भाषिक कारण :-
देशामध्ये ब-याच बोलीभाषा आहेत, परंतु शाळा फक्त प्रमाण भाषांमध्ये आहेत. त्याचप्रमाणे स्थलांतर इत्यादी कारणाने शहरांच्या शाळांमध्ये प्रत्येक वर्गात ब-याच भाषांची मुले आहेत. मुंबईतील धारावी मधील काळा किल्ला शाळेच्या मी संपर्कात आहे. या शाळेच्या पाचव्या वर्गात भारतातील ९ भाषा बोलणारी मुले शिकत आहेत. त्यातील ७५% मुले हिंदी भाषिक आहेत. शाळा मराठी माध्यमाची आहे आणि SEMI ENGLISH राबविणारी शाळा आहे. शिक्षण शास्त्राच्या दृष्टीने मुलांसाठी फार चांगली स्थिती नाही. परंतु माणसांच्या कोणत्याही गटात १५ टक्के लोक अति उत्कृष्ट दर्जाचे असतात. त्याचप्रमाणे या मुलांमध्ये स्वयंअध्ययनाने शिकू शकणारी मुले असतात. मुलांवर स्वशिक्षणाचा विश्वास टाकल्यास सर्वसाधारण वर्गाच्या ३० मुलांपैकी ५ मुले कोणताही विषय स्वतः शिकून घेतील. मग ही मुले इतर मुलांना शिकण्यास मदत करतात. मात्र शिक्षकाने त्या प्रकारचे PEDAGOGY DESIGN केली पाहिजे. या ५ पैकी ५ वेग-वेगळी भाषा बोलणारी मुले असू शकतात जे मागे राहणा-या मुलांना त्यांच्या मातृभाषेत शिकवू शकतात. प्रत्येक प्रमाण भाषेमधील पुढे जाणा-या मुलांनी मागे राहणा-या मुलांची मदत करावी किंवा दोन्ही सारख्या पातळीवर असल्यास एकमेकांची मदत करावी. अशाने १००% मुले शिकण्याची जवळ-जवळ हमी मिळते.
बालमानसशास्त्रीय कारण : –
कोणतीही बाब शिक्षकाने शिकविल्यानंतर मुलांचे शिकणे झाले कि नाही हे तपासण्याकरिता समजले काय? असे विचारतात. तेव्हा मुले ‘हो’ असेच म्हणतात. ‘विषय मित्र’ संकल्पना राबविण्यास सुरुवात केल्यानंतर बऱ्याच शिक्षकांना हे लक्षात आले आहे. शिक्षकांनी वर्षानुवर्षे शिकवून न शिकणारी मुले जोडीदाराकडून तासात, दिवसात किंवा आठवड्यात शिकायला लागली तेव्हा शिक्षकांनी याचा तपास घेतला. सध्या मोठ्या शिक्षक प्रशिक्षणांमध्ये ‘विषय मित्र’ मुलाचे मुलाखत घेतली जाते. त्यात सुद्धा मुले हेच उत्तर देतात. शिक्षकांनी शिकविल्यावर एकदा किंवा दोनदाच समजले नाही हे सांगता येते. नंतर मानसिक दडपण निर्माण होते व मुले ‘होय’म्हणतात. जोडीदार किंवा विषय मित्राला कितीही वेळा ‘समजले नाही’ हे सांगता येते. त्याचप्रमाणे जोडीदार/ विषयमित्र त्याच गल्लीत राहत असेल किंवा फोनवरून ते २४ X ७ उपलब्ध असतात.
हुशार मुले :-
मुलांना ज्या नवीन बाबी माहिती असतात ते त्यांनी इतर मुलांना शिकवायचे आहे. वर सांगितल्याप्रमाणे योग्य नेतृत्व,प्रबंधन आणि नियोजन मिळाल्यास किमान १५% मुले नवीन बाबी शिकतात. नंतर या बाबी मुलांनी इतर मुलांना शिकवावे. ही हुशार मुले इतर मुलांना त्यांच्या मातृभाषेत शिकवू शकतात. शाळेतील एखाद्या मुलाने COMPUTER PROGRAMMING किंवा एखादी विदेशी भाषा शिकून घेतल्यास ते इतर मुलांना शिकवू शकतात.
देशातील अधिकांश शाळांमध्ये शिक्षकांना बहुवर्ग अध्यापन करावे लागते. काही शाळांमध्ये काही कारणाने शिक्षकांचे पद भरलेले नसतात. बोलीभाषा बोलणारी मुले असली की ती भाषा शिक्षकांना जमत नसते. शहरी भागांच्या शाळेमध्ये एकाच वर्गात ब-याच भाषा बोलणारी मुले असतात. शिक्षकांना ह्या सर्व भाषा जमने अपेक्षित नाही. मात्र त्याचा विपरीत परिणाम मुलांच्या शिक्षणावर होतो.
यातील जवळ-जवळ १०० टक्के अडचणी ही हुशार मुले सोडवू शकतात. मात्र शिकण्याचे DESIGN शिक्षकाने तसे तयार केले पाहिजे. औरंगाबाद जिल्ह्यातील एका शाळेत बंजारी बोलीभाषा बोलणारी मुले आहेत. दुस-या वर्गाच्या एका मुलाला स्वतःचे नाव लिहिता येत नव्हत. वर्गात जोडीदार संकल्पना राबविल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत त्या मुलाला नाव लिहायला जमले. जोडीदाराने त्या मुलासोबत बसून बंजारी बोलीभाषेत समजावून प्रत्यके रेघोट्या काढून दाखविल्या. शिक्षकाच्या मते, फळ्यावरून मराठी प्रमाण भाषेत शिकवितांना त्यांना हे केव्हाही जमले नाही.
सिलतरा (जि. रायपुर, छत्तीसगढ) मध्ये ५ व्या वर्गात ९१ मुले आहेत. त्यापैकी ६४ मुलांना वाचता येत होते. उरलेल्या वाचता येत नसलेल्या २७ मुलांपैकी ५ सतत गैरहजर रहावयाचे आणि २२ मुलांपैकी २० मुलांना तीन आठवड्याचे आंत वाचन यायला लागले. पद्धतीत बदल काय तर विषयमित्र योजना राबविली.
अतिसामान्य मुले :-
प्रत्येक वर्गात एक किंवा दोन मुले अतिसामान्य असतात. हि मुले शिक्षकांनी न शिकविलेल्या बाबी स्वतःहून शिकत राहतात. कपिल व वेदांत त्याचे उदाहरण आहेत. मात्र इतर मुलांचा शोध लावणे शिल्लक आहे. त्यामुळे शिक्षकांनी वर्गामध्ये रोज एकदा तरी हा प्रश्न, “मी न शिकविलेल्या गोष्टी कोणी शिकले असेल तर सांगा?” विचारावे. याने मुले बोलण्यास प्रेरित होतील आणि वेगळे शिकले नसले तरी नवीन शिकण्याकरिता सरसावतील. कोणतेही मुल काही नवीन शिकले असल्यास ते इतर मुलांना सुद्धा शिकता येईल, याचे नियोजन शिक्षकाने करावे.
भारताच्या इतिहासातून दुजोरा :-
मुलांकडून मुलांचे शिक्षण होणे हे आजच्या घटकेला नवीन बाब वाटत असले तरी भारताला हे काही नवीन नाही. लॉर्ड मेकाले यांनी ब्रिटीश संसदेत भारतीय शिक्षण व्यवस्थेबाबत अहवाल सादर केला त्यात गुरुकुलांचा उल्लेख आहे. यापैकी एका गुरुकुलामध्ये २०,००० विद्यार्थी होते. परंतु आचार्य फक्त एकाच. या गुरुकुलांमध्ये मोठ्या वयोगटातील मुले लहान वयोगटाच्या मुलांना शिकवायचे. आता एकच आचार्य नसून शिक्षक संख्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. तरीसुद्धा याआधी विषद केलेल्या फायद्यांमुळे मुलांकडून शिकण्याची योजना राबविणे योग्य राहील.
शिकविणा-या मुलांना होणारे फायदे :-
पुढे गेलेल्या मुलांनी मागे राहणा-या मुलांना शिकवावे असे येथे सांगितले जात आहे. याने पुढे गेलेली मुले स्वतःचा अभ्यास केव्हा करतील असा प्रश्न समोर येऊ शकतो. या प्रक्रियेमध्ये मुलांना दिल्या जाणा-या आव्हानांचा खूप उपयोग केला जातो. आव्हान दिले कि मुले फार लवकर अध्ययनाचे कार्य पूर्ण करतात. एका दिवसात दुसरी, तिसरी व चौथीची सर्व पुस्तके वाचणारी इयत्ता दुसरीची मुले दिसून आली आहेत. गणित हा वाचनाचा विषय नाही अवघड असतो म्हणून ते वगळले गेले होते.
राक्षसभुवन (ता. गेवराई जि. बीड, महाराष्ट्र) येथे श्री. अशोक निकाळजे हे पहिल्या वर्गाला शिकवितात. त्यांना वाटत की पहिल्या वर्गाच्या मुलांना शिक्षकाने शिकविल्याशिवाय अक्षरज्ञान जमणार नाही. तरीही गणपतीच्या काळात ३-४ दिवस सुटी असल्यामुळे मुलांना पुढील अक्षरे शिकण्याचे आव्हान द्यावयाचे ठरविले. त्यांनी वर्गाला सांगितले, “मुलांनो मी आतापर्यंत …………… ही अक्षरे शिकविली आहेत. पुढील सुट्ट्यांमध्ये तुम्ही किमान १० अक्षरे स्वतःहून शिकून घ्यावयाचे आहे. जी मुले १० पेक्षा अधिक अक्षरे शिकून येतील त्यांना माझ्या (शिक्षकाच्या) खुर्चीवर बसून वर्गाला ५ मिनिटे शिकविण्याची संधी देईन. मात्र तुमच्यापैकी ज्यांना १० अक्षरे शिकता येणार नाही त्यांना ५ मिनिटे खुर्चीवर बसण्याची संधी तर देईन पण त्यांना शिकवू देणार नाही.” हे बोलणे संपताच ३ मुली व २ मुले उभी झाली आणि म्हणाली, “आम्हाला तुम्ही शिकविलेल्या पेक्षा १० अधिक अक्षरे आत्ताच येतात.”
अर्थात काही मुले शिक्षकांच्या पुढे असतातच. उलट, या मुलांना येत असलेल्या बाबींचा वापर करून आपण वर्गाचा फायदा करून घेऊ शकतो. तसेच त्यांच्यावर होणारा अन्याय टाळू शकतो.
इतर मुलांना शिकविण्यापुर्वी मुले अतिरिक्त तयारी करतात त्यामुळे शिकलेल्या संकल्पनांचे दृढीकरण होते. असेही शिकण्यात आणि शिकविण्यासाठी शिकण्यात बराच फरक आहेच. इतर मुलांना शिकविण्याकरिता संवाद साधावा लागतो. त्यामुळे संवाद कौशल्य सुधारते. चांगले शिकविता आले तर आत्मविश्वास वाढतो. एका प्रकारे मुल शिकवून जर मुल नाही शिकले तर शिकविण्यारिता नवीन (CREATIVITY SKILL) मार्ग शोधावा लागतो. ही एकूणच एक पद्धत एकमेकांना मदत करण्याची आहे त्यामुळे सहकार्याच्या (COLLABORATION SKILL) भावनेस चालना मिळते. तसेच एखाद्या मुलाला पुन्हा-पुन्हा समजावून समजत नसेल तर धैर्य राखून प्रेमाने (COMPASSION) समजावत राहावे लागते.
अशाप्रकारे एक यशस्वी विषयमित्रामध्ये २१ व्या शतकातील कौशल्ये 4Cs (CRITICAL THINKING, COLLABORATION, CREATIVITY AND COMMUNICATION SKILLS) विकसित होते.
शिक्षकांद्वारे दिल्या जाणा-या आव्हानांना वेळोवेळी पूर्ण केल्याने सुद्धा मुलांचा आत्मविश्वासात (CONFIDENCE) वाढ होते.
आव्हाने :-
राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क २००५ मध्ये शिक्षणाचे उद्दिष्ट, “भविष्यात येणा-या आव्हानांना तोंड देण्यास सजग होणे.” हे दिले आहे. ज्ञानरचनावादात सुद्धा मुलांचे एखादी संकल्पना शिकून झाल्यावर त्यांच्या मेंदूला जमेल त्या पातळीचे आव्हान देणे अपेक्षित आहे. वायोगोस्की ने ZPD (ZONE OF PROXIMAL DEVELOPMENT) चा सिद्धांत मांडला आहे. यात पुढचे आव्हान देतांना ते आधी शिकलेल्या बाबीची पुनरावृत्ती असू नये ती आव्हाने शिकलेल्या संकल्पनेचा वापर करून पुढील संकल्पना शिकण्यास मेंदूला उपयुक्त करणारी पाहिजे.
मुलांना परीक्षेसाठी तयार करणा-या शिक्षण व्यवस्थेत शिकलेल्या संकल्पनेच्या पुनरावृत्तीकडे फार भर असते. असे केल्याने परीक्षेच्या दिवशी मुले उत्तर विसरणार नाहीत आणि त्यांना बोर्ड परीक्षेत चांगले गुण पडतील.
मात्र बोर्ड परीक्षेत अधिक गुण मिळविलेली मुले २०५० च्या नवीन (सध्या माहित नसलेले) जगातील आव्हानांना कसे सामोरे जातील हे सांगणे अवघड आहे. ज्ञानरचनावादाच्या सिद्धांताप्रमाणे तसेच भविष्यातील मुले (FUTURE READY) मुले तयार करावयाचे असल्यामुळे पुनरावृत्तीचे आव्हाने टाळावेत.
सध्या मुलांना मोबाइल फोनच्या स्वरुपात सर्व समावेशक माहिती देणारे यंत्र उपलब्ध असल्यामुळे आव्हानांचे काठीण्यपातळी बाबत विचार करण्याची गरज नाही. आपल्याला कितीही काठीण्य वाटत असले तरी मुलांना ते पेलवेल यावर विश्वास ठेवायला हरकत नाही.
प्रमाणपत्र नाही प्रत्यक्ष मुले हेच प्रमाण :-
प्रमाणपत्र उपलब्ध असले तरी रोजगार देतांना लेखी परीक्षा आणि मुलाखतीची प्रथा होतीच. परंतु प्रमाणपत्र असल्याने परीक्षेसाठी अर्ज करण्याची पात्रता यायची. भारत देश तंत्रज्ञान कंपन्यांसाठी प्रसिद्ध आहे. कंपन्या इंजिनियर म्हणून कोणत्याही ब्रांच च्या इंजिनियर्स न रिक्रुट करतात आणि त्यांना प्रशिक्षित करतात. अर्थातच युनिवर्सिटीज ने दिलेल्या प्रमापत्रात विशिष्ट ब्रांच चा उल्लेख असणे उपयोगाचे नव्हता.
आता अजून एक नवीन ट्रेंड सुरु होऊ घातले आहे. CV LESS मुलाखतीचा अर्थात कंपन्या कोणत्याही प्रमाणपत्राची मागणी करणार नाही. फक्त त्या व्यक्तीत आवश्यक कौशल्य आहेत काय हे तपासणार आणि बस. त्यामुळे प्रमाणपत्रांचे उरले सुरलेले मूल्य पण कमी होत आहे.
COMMUNITY (COMMUNITY + MUTINY) अर्थात समाजाकडून क्रांती या नावाची एक स्वयंसेवी संस्था आहे. ही संस्था १५ ते १८ वयोगटाच्या मुलांसोबत समाजसेवेच्या माध्यमातून विकासाचे कार्य करते. सुरवातीस या मुलांच्या पालकांना वाटायचे की आपले मुल आता समाजसेवेत जात आहे त्यामुळे त्यांना परंपरागत नोक-या लागणार नाही. परंतु आश्चर्य कि ही मुले पारंपारिक शिक्षित मुलांपेक्षाही नोकरी करिता देण्यात येणाऱ्या मुलाखतीत अधिक यशस्वी होत आहेत.
तसेही भारत देशात ज्ञानावर आधारित परीक्षांचे प्रमाणपत्र असतात. अंगी असलेल्या कौशल्यावर पारंपारिक शिक्षणाने विशेष लक्ष दिलेले नाही. आंतरराष्ट्रीय शिक्षण विचार २१ व्या शतकातील कौशल्याबाबत बोलते तेव्हा त्यास प्रमाणपत्र पुरेसे होणार नाही.
ब-याच वेळा शिक्षक म्हणतात कि आधीच्या शाळेतून मुले योग्य शिकून आली नाहीत तर त्यांच्या हातात काही विशेष राहिलेच नव्हते. आता प्रत्यक्ष प्रमाणाचे दिवस आल्याने अशा शिक्षक व शाळांनी शाळेत आलेल्या मुलांच्या शाळेत दाखला घेताना काही प्रश्न विचारून २ मिनिटांचे VIDEO तयार करावेत आणि त्यांना वर्षभर शिकविल्यानंतर त्या मुलांमध्ये काय फरक पडला याचा वर्षांती पुन्हा २ मिनिटांचे VIDEO तयार करावे. याने शिक्षकाच्या वर्षभराच्या श्रमाने मुलांच्यात काय प्रगती झाली हे बघता येईल. हे प्रमाण शिक्षकाला, त्या मुलाला, त्या मुलाच्या पालकाला आणि भविष्यात EMPLOYER ला या सर्वाना बघता येते. खरे शिक्षकांनी, शाळेनी आणि बोर्डानी सुद्धा हि नवीन पद्धत अवलंबून मासिक किंवा त्रैमासिक प्रत्येक मुलाचे असे VIDEO मुल्याकन म्हणून किंवा मूल्यवृद्धी (VALUE ADDITION) चे प्रमाण म्हणून स्वतः ठेवायला पाहिजे व पालकांना दिले पाहिजे.
अशा व्हिडीओज चा उपयोग महाराष्ट्रात सध्या बरेच से शिक्षक मुलांचे SPOKEN ENGLISH कौशल्य दाखविण्यासाठी करीत आहेत. यावेळी हे मूल्यांकनासाठी नव्हे तर अधिक श्रम करण्यासाठी प्रेरित करणे यासाठी आहे. वर्गात मुलांचा इंग्रजी बोलण्याचा व्हिडीओ तयार करून पालकांचे WHATS APP GROUP मध्ये टाकले जाते. ते पाहून पालक आणि मुले अधिक प्रेरित होतात आणि पुढे SPOKEN ENGLISH साठी सर्व मिळून अधिक जोमाने मेहनत करतात. घरीसुद्धा मुलांना इंग्रजी बोलण्यासाठी पालक प्रेरित करतात. पालकांकडे उपलब्ध असलेल्या मोबाईल चे मेमोरी मर्यादित असल्यामुळे बरेच शिक्षक स्वतःचे यु-ट्यूब CHANNEL चालवितात. त्या CHANNEL मध्ये व्हिडीओ अपलोड करतात आणि पालक गटामध्ये फक्त लिंक टाकतात.
आंतरराष्ट्रीय शिक्षण विचाराच्या प्रशिक्षणांमध्ये सध्या प्रत्यक्ष मुलांना घेऊन जातात. तेथे मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे, आव्हान देणे आणि जोडीदार, गट तथा विषयमित्र संकल्पनेवर प्रत्यक्ष मुलांकडून माहिती दिली जाते. तसेच मुलांना प्रशिक्षक तसेच शिक्षकांकडून प्रश्नही विचारले जातात. मुले या प्रश्नांचे योग्य ते उत्तरे देतात. मुलांमध्ये सभाधीटपणा येण्यासाठी मेहनत करणा-या या समाजामध्ये विचार करण्यासारखी बाब म्हणजे सदर मुले सभेमध्ये १०००- १२०० शिक्षकांसमोर हातात माईक घेऊन बोलतात. फक्त बोलतच नाहीत तर त्यांच्या सर्व शंकांचे समाधान करतात.
एका जिल्ह्यात मुलांना सर्व ज्ञान आहे परंतु संवाद कौशल्य आणि इंग्रजी बोलण्यात कमी पडल्यामुळे मार खातात असे सांगितले गेले होते. तेथे वाबळेवाडी (मराठी मध्यम) शाळेच्या मुलांना प्रमाण घेऊन गेले. प्रश्नोत्तरीच्या वेळी या मुलांना एखादे उत्तर मराठीत दिल्यानंतर तोच उत्तर इंग्रजीत सांगा म्हटल्यावर मुलानी आत्मविश्वासाने लांब-लचक उत्तर इंग्रजीत दिले. एका प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी सानिया शेख (विद्यार्थिनी) ने विचारले की याचे उत्तर त्याने इंग्रजीत द्यावे कि मराठीत. अशा प्रकारचे मुले आंतरराष्ट्रीय शिक्षण विचाराने तयार होतात हे सांगितले जातेच. परंतु प्रमाण म्हणून मुलेही दाखविले जातात.
निरुपयोगी (USELESS) होण्याची प्रक्रिया :-
ही प्रक्रिया जेव्हापासून माणसाने प्रगती करायला सुरुवात केली तेव्हापासून सुरु आहे. मात्र तंत्रज्ञान विकासाची गती वाढल्याने एखाद्या व्यक्तीस सतत शिकत राहणे अगत्याचे झाले आहे. आधी एका आयुष्यासाठी एक कौशल्य शिकून घेणे पुरेसे असायचे. परंतु बदलाची गती वाढल्याने एका आयुष्यात चार-पाच किंवा अधिकांश वेळा नवीन कौशल्ये शिकण्याची पाळी येईल.
आजच्या भारत देशात एखाद्या व्यक्तीला काहीच जमत नसेल तर ती शेतात काम करते. नांगरणे चे उदाहरण घेऊया. दहा पंधरा वर्षापूर्वी शेत नांगरण्यासाठी सहा बैल,चार बैल किंवा दोन बैल नांगराचा उपयोग होत असे. सहा बैल नांगरासाठी चार माणसे लागत,चार बैल नांगरासाठी तीन तर दोन बैल नांगरासाठी दोन आणि एक एकर शेत नांगरायला दोन दिवस लागत. आता त्याचा कामाला एक एकर शेत नांगरायला एक ते दोन तास व एक चालक व ट्रक्टर लागतो. याचा अर्थ दहा वर्षापूर्वीची नागर हाणण्याचे कौशल्य असणारी माणसे आता शेत नांगरण्याच्या बाबतीत निरुपयोगी झाली आहेत. आता मात्र ट्रक्टर चा चालक उपयोगी आहे. आता विचार करूया पुढील पंधरा वर्षाने शेत नांगरनात काय बदल होतील? कदाचित चालकाचे काम नसेल…..ट्रक्टर स्वयंचलित असेल. तेंव्हा ट्रक्टर चालक निरुपयोगी झालेला असेल आणि ट्रक्टर संदर्भात प्रोग्रामिंग तयार करणारा उपयोगी असेल. याचाच अर्थ सतत शिकत न राहिल्यास माणसे किंवा कौशल्य निरुपयोगी होतात.
आता सिंचनाचे उदाहरण घेऊ. थोड्याच काळापूर्वी शेतात पाणी देतांना दांडाणे पाणी देत असत.(मोकळे पाणी) त्यासाठी दांड फोडणे आणि बुजविणे यासाठी पूर्णवेळ माणूस लागत असे. शेतात एका पातळीपर्यंत पाणी भरले कि दांड बंद करावयाचे. यात लागणारे कौशल्य एवढेच कि किती पातळीपर्यंत पाणी भरल्याने दांड बंद करावे. सध्या ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन आले आहेत. त्यात अजून तरी पंप किंवा टाकीचे नळ किती कालावधी उघडावयाचे आहे एवढेच पाहायचे आहे. परंतु याच ठिबक सिंचनाला जोडून असेही यंत्र मी बघितले आहे ज्याच्या माध्यमातून COMPUTER PROGRAMMING करून उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात लागणा-या पाण्याचे नियंत्रण करता येते. ठिबकाच्याच माध्यमातून खत आणि किटकनाशक औषधाचे प्रमाण सुद्धा ठरवून देता येते. असे केल्याने पाण्याचे, खताचे तसेच औषधाचे योग्य प्रमाण देता येते. याने पाणी, खत, औषधाचे पैसे तर वाचतच आहेत सोबतच पर्यावरणाचे नुकसान सुद्धा कमी करता येते. त्याचप्रमाणे पाण्याचे कमी प्रमाण वापरून अधिक पिक घेता येते. परंतु त्यासाठी COMPUTER PROGRAMMING माहिती असावे लागते. अशा परिस्थितीतसुद्धा सिचानाचे कार्य करीत असलेली माणसे COMPUTER PROGRAMMING न शिकल्यास निरुपयोगी (USELESS) होतील.
मोटार सायकल आणि कार इत्यादी २०२५ नंतर फक्त पेट्रोल/डिजल वापरणार नाहीत असा धोरणात्मक निर्णय भारत सरकारने घेतला आहे. याचा परिणाम असा होणार की पेट्रोल/डिजल पंप बंद होतील. अधिकांश लोक घरी BATTERY चार्ज करतील. अगदी मोबाईलसारखे. दिवसभर वापरा आणि रात्री चार्ज करा. परंतु लांब पल्ल्याच्या गाड्यांना मध्येच BATTERY बदलावी लागणार. अतः पेट्रोल/डिजल पंप BATTERY चार्जिंग स्टेशन मध्ये परिवर्तीत होतील. पेट्रोल/डिजल वर खर्च वाढल्याने अधिक लोक अपग्रेड होऊन मोठ्या गाड्या वापरतील. तसेच कार्बन एमिशन कमी होणार असल्याने हे धोरण पर्यावरणासाठी उत्तम आहे.
याचे साईड इफेक्ट नोक-यांवर आहे. पेट्रोल/डिजल इंजिन च्या कार मध्ये २०,००० कलपुर्जे (सुटे भाग) लागतात.परंतु BATTERY कार मध्ये फक्त २० कलपुर्जे लागतात. त्यामुळे कलपुर्जे तयार करणारे कारखाने बंद होतील. तेथील लोक बेरोजगार होतील. तसेच २०,००० कलपुर्जांमध्ये झीज तुट (WEAR & TEAR) अधिक होते म्हणून दुरुस्ती अधिक लागते. गाडी मालकांचे दुरुस्ती खर्च कमी होईल, परंतु मोटार मेकेनिक गरेज बंद पडतील. तेथील लोक बेरोजगार होतील.
तंत्रज्ञानाचे प्रत्येक बदलांमध्ये असे घडतेच एक रोजगार संपते ते दुसरा रोजगार सुरु होते. मात्र नवीन रोजगारासाठी नवीन कौशल्ये लागतात. जे लोक नवीन कौशल्ये शिकण्यास तयार होणार नाहीत ते निरुपयोगी होतील. मात्र नवीन शिकण्यास तयार असलेले लोक काहीही बदल झाले तरी कायम उपयोगी राहतील. आंतरराष्ट्रीय शिक्षण विचार सतत शिकणारी आणि स्वतःहून शिकणारी मुले तयार करू पाहत आहे.
SMALL प्रयोग :-
हा शीर्षक फार वेगळा वाटतो. परंतु कपिल ने यु-ट्यूब मध्ये सर्च करण्यासाठी हाच शब्द प्रयोग केला होता. आम्हीपण करून पहिला. असे केल्याने विज्ञानाचे छोटे-छोटे प्रयोग यायला लागते.
यु-ट्यूब आणि गुगल मधून शिकणे खूप सोपे आहे. त्याच्या सर्च इंजिन ला KEY WORDS दिले तरी चालते. त्यात थोडी चूक होत असेल तर ते दुरुस्त करण्यासाठी सुचविते. टाईप करायला सुरुवात केली की स्वतःहून काही-काही सुचविते. आपणास पटल्यास पूर्ण टाईपसुद्धा करावे लागत नाही.
टायपिंग जमत नसेल तर मोबाईलच्या माईक समोर बोलल्याने सर्च करून देते. त्यातले त्यात आपण बोललेली भाषा मिंग्लिश (मराठी + इंग्लिश) किंवा हिंग्लिश (हिंदी + इंग्लिश) असेल तरीही ते योग्य सर्च करून देते. सर्च करणे अवघड नाही. त्यातले योग्य व्हिडिओ किंवा मजकूर आपण निवडायचे आहे. माहिती मिळविणे यापेक्षा केव्हाही सोपे नव्हते. आधी पुस्तक, शिक्षक किंवा पुस्तकालय माहितीचे स्त्रोत असावयाचे. त्या प्रत्येकामध्ये काही न काही मर्यादा असायच्या. आता गुगल आणि यु-ट्यूब मिळून या सर्व मर्यादा संपल्या आहेत. आवश्यकता आहे फक्त एक DATA PACK वापरणारे मोबाईल फोनची आणि शिक्षकांचे नेतृत्व, व्यवस्थापन आणि नियोजनाची.
मुलांचे WHATS APP GROUP :-
आपण वर बघितले कि वाबळेवाडी शाळेतील मुले त्यांच्या ‘SUPER 150‘ WHATS APP GROUP चा पुरेपूर लाभ घेत आहेत. इतर शाळांनी सुद्धा तसे करावे. आणि मुलांचे आंतरशालेय WHATS APP GROUP तयार करून त्यांना योग्य दिशा देऊन त्याचा लाभ घ्यावा. आतापर्यंत एका शाळेतील मुलांच्या हुशारकी आणि ज्ञानाचा संभाव्य लाभ आम्ही बघितले आहे. यापुढे ब-याच शाळांची मुले मिळून कोणते फायदे देतील हे सुद्धा पाहण्याची गरज आहे.
माहितीच्या देवाण घेवाणीचे टप्पे खालीलप्रमाणे दिसतात.:-
- शासन निर्णय, परिपत्रक आणि शासन पत्राद्वारे माहिती देणे. ते ONLINE उपलब्ध करणे.
- शिक्षक व अधिकाऱ्यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेणे. नंतर त्यास WHATS APP GROUP ची जोड देणे. TAG मिटिंग करणे. केंद्रस्तरीय संमेलने करणे.
- MOOC ची व्यवस्था करणे.
वरील सर्व शासन चलीत व शासनमान्य आहेत.
माहितीच्या देवाण घेवाणीचे अजून काही मार्ग आहेत.
- शिक्षक आणि अधिकारी स्वतःहून इतर चांगल्या शाळांना भेटी देणे. महाराष्ट्रात याची संस्कृती विकसित झाली आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचा यात मोठा वाटा आहे. अशा भेटीसाठी ब-याच वेळा शिक्षक/अधिकारी स्वतः खर्च करतात. अधिकांश ठिकाणी प्रशासन परवानगी देते परंतु काही ठिकाणी रजा घेऊन किंवा सुट्टीच्या दिवशी हे काम करावे लागते. महाराष्ट्रा व्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये अशी संस्कृती विकसित झालेली दिसत नाही.
- शिक्षक व अधिका-यांचे WHATS APP GROUP च्या माध्यमातून माहितीचे देवाण घेवाण महाराष्ट्रात असे बरेच GROUPS आहेत.
- आता मुलांच्या WHATS APP GROUP च्या माध्यमातून विचारांचे आणि माहितीचे देवाण घेवाण येथे सुचविण्यात येत आहे. ही महाराष्ट्रासाठी सुद्धा नवीन बाब आहे. परंतु महाराष्ट्राने ते यशस्वी करून दाखवावे हि अपेक्षा आहे. इतर राज्य सुद्धा हळू-हळू या मार्गाने चालायला लागतील.
शिकण्याच्या गतीत प्रचंड वाढ :-
वरील सर्व विचारांवर विश्वास करून शिक्षकांनी राबविण्यास सुरुवात केली की, मुलांच्या शिकण्याच्या गतीत प्रचंड वाढ होते. वरील सर्व विचारांना कृतीत आणावयाचे म्हणजे खालील तीन पाया-यांचा अवलंब करणे-
- मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे.
- मुलांना अधिक शिकण्यास आव्हान देणे. यात कमीत-कमी किती हे ठरवायचे असते. जास्तीत-जास्त किती हे मुले ठरवितात. मोठ्यांनी वरची मर्यादा कधीही ठरवू नये. अन्यथा मुलांच्या प्रगतीत आपण अडसर निर्माण करतो असेच त्याचा अर्थ होईल.
- मुलांनी मुलांना शिकण्यास मदत करण्याचे नियोजन करणे. यास आंतरराष्ट्रीय शिक्षण विचार प्रशिक्षणात PEDAGOGICAL INTERVENTION म्हटले गेले आहे. यात मुख्यत्वे PEER LEARNING, GROUP LEARNING आणि विषय मित्र अशी संकल्पना आहे. तसेच मुलांचे स्वशिक्षण, PEER LEARNING आणि विषय मित्र असे शिकण्याची चार पातळ्या आहेत.
या सर्व बाबींवर विस्तृत माहिती शिक्षकांच्या हस्तपुस्तिकेत दिली आहे.
वरील ३ बाबी करताना शिक्षकांनी शिकविणे बंद करणे हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. मग प्रश्न उभा होतो की शिक्षकाने शिकविण्याचे नाही तर काय करावयाचे आहे. याचे उत्तर शिक्षकाने मुलांना दिशा आणि दृष्टी द्यावयाचे आहे. मुलांच्या शिकण्याला नेतृत्व प्रदान करावयाचे आहे. त्यांच्या शिकण्याचे नियोजन आणि व्यवस्थापन करावयाचे आहे.
वरील तीनही बाबी योग्य प्रमाणात घडून आल्यास शासनाद्वारे नेमून दिलेले पाठक्रम एक तृतीयांश वेळेत पूर्ण होते. एक तृतीयांश वेळ म्हणजे वर्षातील ३ महिने, महिन्यातून १० दिवस, आठवड्यातून २ दिवस किंवा दिवसातून २ तास होते. शाळेतील सर्व मुलांनी पाठ्यक्रम संपवून शाळेत उपलब्ध असलेल्या अतिरिक्त दोन तृतीयांश वेळ नेमून दिलेल्या पाठक्रमाच्या पलीकडे परंतु अभ्यासक्रमाशी निगडीत शिकण्याच्या दृष्टीने वापरावयाचे आहे.
या वेळेचा उपयोग पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास जसे इंग्रजी शिक्षण, शिष्यवृत्ती परीक्षा, प्रतियोगिता परीक्षा,शासन पातळीवरील आदेश जसे ASER, NAS आदींची पूर्णता व जागतिक पातळीवरील अपेक्षा जसे PISA, COMPUTER CODING, COMPUTATIONAL THINKING आणि २१ व्या शतकातील कौशल्ये पूर्ण करण्यासाठी करावयाचे आहे.
शासनाने नेमून दिलेले पाठक्रम एक तृतीयांश वेळेत पूर्ण होत असल्यास शाळा कोणत्या बोर्डाशी सलग्न आहे यास अर्थ उरत नाही. भारत देशातील अधिकांश बोर्ड जागतिक पातळीवरील अतिउत्कृष्ट शिक्षणास लक्षात ठेवले नसल्याने प्रत्येक शाळेस स्वतःचे पाठक्रम तयार करावे लागणार आहे. लहान मुलांना COMPUTER PROGRAMMING, COMPUTATIONAL THINKING आणि FOREIGN LAUNGUAGE यातले काही ठळक उदाहरण आहेत. COMPUTER PROGRAMMING सतत बदलणारा विषय आहे. त्यामुळे शाळांनी किमान वर्षातून एकदा तरी याचा आढावा घेऊन पाठ्यक्रम बदलणे अपेक्षित आहे. बोर्डाची प्रक्रिया एवढ्या जलद गतीने चालत नसल्यामुले सद्यस्थितीत शाळांनी संगणक क्षेत्रातील काही माहितगार लोकांचे संपर्कात राहणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे येणा-या काळात उपलब्ध होणारे जॉब आणि त्यांना लागणारे कौशल्या याबाबतीत काही स्वयंसेवी संस्था कार्य करीत आहेत. त्यांच्याशी संलग्न राहणे उपयोगाचे होईल.
तथापि शिकवायचे कसे ? (LEARNING TO LEARN) याच प्रमुख थीमवर प्रत्येक शाळेने कार्य करावयाचे आहे.
आता पालक, शासन आणि जागतिक अपेक्षा पूर्ण करताना काही प्राधान्यक्रम ठरवता येईल काय याचा विचार करणे आवश्यक आहे. खालील बाबी प्राधान्यक्रमाने देण्यात आलेल्या आहेत.
१) ASER पातळीवरील शिक्षण :-
पालक आणि शासन दोन्हीची पहिल्या क्रमांकाची अपेक्षा असते कि शाळेत शिकत असलेल्या मुलांना वाचन आणि मुलभूत गणितीय क्रिया यायला पाहिजे. ASER म्हणजे ANNUAL STAUS OF EDUCATION REPORT हा प्रथम या संस्थेच्यामार्फत दर दोन वर्षांनी प्रसिद्ध होणारा अहवाल असतो. सद्यस्थितीत भारत देशातील ५ व्या वर्गातील जवळ-जवळ निम्या मुलांना दुस-या वर्गाची पुस्तके वाचता येत नाहीत आणि आठव्या वर्गाच्या निम्याहून अधिक मुलांना भागाकार करता येत नाही.
या दस्ताऐवज मध्ये दिलेल्या प्रक्रिया अवलंबल्यास पहिल्या वर्गातील १००% मुले ३ महिन्याच्या आत वाचायला शिकतात. प्रत्येक मुल पाठ्यक्रमाचे पुढे असते त्यामुळे असर पातळी हा मुद्दाच उरत नाही. तरीसुद्धा शक्य तितक्या लवकर हि पातळी ओलांडणे प्रत्येक शाळा आणि शिक्षकाचे कार्य राहील. हे कार्य पूर्ण झाल्यावर लगेच शिक्षकाने आपल्या संबंधित WHATS APP GROUP वर ‘SELFIE WITH SUCCESS’ आणि त्यास CAPTION माझ्या वर्गातील सर्व ३० मुलांना वाचता येते, म्हणून ‘SELFIE WITH SUCCESS’ किंवा माझ्या वर्गातील सर्व ३० मुलांना शासनाने इयत्ता…… करिता नेमून दिलेल्या सर्व गणितीय संकल्पना येते म्हणून ‘SELFIE WITH SUCCESS’. काही वेळा दिव्यांग किंवा स्थलांतरित झालेली मुले वर्गात असतात. सुरवातीच्या काळात त्यांचा उल्लेख करून त्यांना वगळून सर्व (१००%) संबोधता येईल. परंतु येत्या काही वर्षात स्थलांतरित होणा-या मुलांचे शिकण्याचे प्रश्न सोडवता यायला पाहिजे, दिव्यांग मुले मात्र शिल्लक राहतील.
‘असर’ साठीचे टेस्ट त्याच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. त्यावर आधारित अन्य टेस्ट तयार करता येईल.
२) NAS पातळी गाठणे :-
भारत सरकार द्वारा आयोजित होणारी हि टेस्ट आता दर दोन वर्षांनी होणे नियोजित आहे. पुढील टेस्ट २०२० साली होणार आहे. ही टेस्ट तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या मुलांची घेतली जाते. या टेस्टचे प्रश्न संच प्रादेशिक अकादमिक प्राधिकरण अमरावती द्वारा विकसित केले गेले आहेत आणि ते LO’S SMART APP म्हणून उपलब्ध आहे. भारत सरकारने ठरविलेल्या निकषाप्रमाणे प्रत्येक विषयामध्ये १००% मुलांना किमान ७५% गुण पडले पाहिजेत.
आंतरराष्ट्रीय शिक्षण विचार राबविणा-या शाळांची मुले पिसा पातळीची असावयास हवी. पिसा पातळी ही काठीण्य पातळीत NAS पेक्षा कितीतरी पुढे आहे. त्यामुळे अशा शाळांनी NAS मध्ये ७५% गुण पेक्षा १०० नक्कीच गाठायला पाहिजे.
पाठ्यक्रम संपल्यावर यासाठी आवश्यकतेप्रमाणे सराव घेणे आवश्यक राहील. किंबहुना प्रत्येक पातळीवर मुलांना पिसा दर्जाचे प्रश्न (सध्या या पातळीचे प्रश्न मुबलक प्रमाणात उपलब्ध नाही) विचारले गेल्यास NAS पातळी आपोआप गाठली जाईल.
मूल्यमापनासाठी अजून एक महत्वाचे साधन आपणास उपलब्ध होत आहे. त्याचे नाव LEARNING NAVIGATOR आहे. त्यात प्रत्येक प्रश्न मुलांनी मोबाईल मध्ये सोडवायचे असतात. ते झाल्यावर शिक्षकाच्या कोड प्रमाणे सर्व मुलांचा मुल्यांकन डाटाचा DASH बोर्ड शिक्षकाच्या मोबाईल वर उपलब्ध होते. त्या डाटाच्या आधारे शिक्षकाला कळते की कोणत्या मुलाला कोणती संकल्पना समजली किंवा नाही. त्याप्रमाणे मुलांना ज्या त्या पातळीवर शिक्षण अनुभव देणे अपेक्षित असते. आपल्या नवीन PEDAGOGICAL INTERVENTION मुले सर्व मुलांना योग्य पातळीवर आणणे सोपे जाणार आहे.
३) इंग्रजी शिक्षण :-
महाराष्ट्र राज्यात ५ वी व ८ वीच्या मुलांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. परीक्षांमध्ये सर्व मुले पास होऊ शकतात. शिष्यवृत्ती काही मोजके मुलांना मिळते. आपल्या शाळेतील १००% मुले शिष्यवृत्ती परीक्षा पास व्हायला पाहिजे याच्या तयारीच्या सरावासाठी काही APP उपलब्ध आहेत जे खाली दिले आहेत.
पुढील ५ वर्षात देशातील मातृभाषा माध्यमाच्या प्राथमिक शाळेतील १००% मुलांना इंग्रजी वाचता आणि बोलता यायला पाहिजे हा दृष्टीकोन तयार करण्यात आला आहे. त्यातही मोबाईल फोनचा पुरेपूर वापराचा विचार करून PEDAGOGY मध्ये आवश्यक बदलावर विचार करण्यात येत आहे. या बदलांवर बरेच शिक्षक प्रयोग करीत आहेत. आपण पण त्यात सहभागी होऊ शकता. हा नवीन विचार BOX……. मध्ये देण्यात आला आहे.
४) शिष्यवृत्ती परीक्षा :-
४.१ – मिशन स्कॉलरशिप
४.२ – ५ वी, ८ वी शिष्यवृत्ती
४.३ – ५ वी स्कॉलर गणित
५) पुढील वर्गाची तयारी :-
एखाद्या मुलाला पुढच्या वर्गाचे विषय येणे खूप आनंददायी बाब आहे. ते येणे मुलांच्या आत्मविश्वासास वृद्धिंगत करणारे असते. त्यामुळे एक तृतीयांश वेळेत पाठ्यक्रम पूर्ण झाल्यावर हुशार मुलांना पुढच्या वर्गाचे पाठ्यक्रम स्वतःहून पूर्ण करण्यास सांगावे व त्यांच्या मदतीने संपूर्ण वर्गाचे पुढच्या इयत्तेचे पाठ्यक्रम पूर्ण करून घ्यावे. बालभारतीने सर्व इयत्तांचे पाठ्यपुस्तक ONLINE UPLOAD केला आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तकांचा प्रश्न त्याप्रमाणे सोडवावे.
मात्र अकरावी व बारावी शिवाय इतर इयत्तेत एका पेक्षा अधिक पुढील इयत्तेचा पाठ्यक्रम पूर्ण करू नये. त्या इयत्तांमध्ये मुलांच्या इतर बाबींच्या (ज्या येथे दिले गेले आहेत) तयारी करून घ्यावी. अकरावी आणि बारावीच्या वेळी IIT सारख्या प्रतियोगिता परीक्षा तयारी करावयाचे असल्याने दोन वर्षांपूर्वी पाठ्यक्रम पूर्ण करण्याचे उपयोगी होईल.
६) प्रतियोगिता परीक्षेची तयारी :-
देशात सर्व साधारण समज आहे कि CBSE बोर्डातील मुले NEET आणि JEE परीक्षेत अधिक यशस्वी होतात. ते खरे असल्यास CBSE शाळांमध्ये NCERT ची पुस्तके शिकविले जातात. त्यामुळे मुलांची तयारी म्हणून वेबसाईट मधून NCERT ची पुस्तके DOWNLOAD करून त्याचे प्रश्न मुलांकडून सोडवून घेतले पाहिजे.
याशिवाय जागतिक पातळीवरील ऑलिम्पियाड होतात. प्रत्येक वर्गातील मुलांना त्यात बसविले गेले पाहिजे. जागतिक पातळीचे ऑलिम्पियाड इंग्रजीत होतात. मुलांची इंग्रजीची तयारी एवढी असावी जेणेकरून मुले ऑलिम्पियाड चे प्रश्न इंग्रजीमध्ये सोडवतील. वाबळेवाडीची शाळा मुलांची तेवढी तयारी करून घेते.
शिवाय वाबळेवाडी शाळा ६ व्या वर्गापासून मुलांचे FOUNDATIONAL COURSE चा पाठक्रम करून घेते. आपला उद्देश मोफत ONLINE उपलब्ध असलेले पाठ्यक्रम वापरणे आहे. त्यासाठी प्रत्येकाने अभ्यास करून अधिक माहिती पुरवावी. खर्चिक पाठ्यक्रम देशातील सर्व शाळांना परवडणार नाही. परंतु सर्वांनी मेहनत केल्यास त्याच दर्जेचे मोफत पाठ्यक्रम उपलब्ध होऊ शकते.
- शारीरिक व्यायाम
- क्रीडा
- कला, संगीत आणि नाट्य
- हॉवर्ड गार्डनरच्या ८ इंटलीजेंस साठी उपक्रम.
- उद्योजगता प्रशिक्षण
- २१ व्या शतकातील कौशल्ये विकसित करण्यासाठी जागतिक पातळीवरील ६ PEDOGOGY
- पाठपुरावा प्रक्रिया
७) पालकांमध्ये असलेले कौशल्यांचा वापर :-
प्रत्येक समाजामध्ये विविध समाजोपयोगी कौशल्ये उपलब्ध असतात. सर्व कौशल्यांच्या किमान तोंड ओळख प्रत्येक शाळेनी मुलांकरिता केले पाहिजे. हे करीत असताना हॉवर्ड गार्डनरचे ८ इंटेलिजन्स व शालेय विषयांचा समन्वय एकाच वेळी साधता येतो. हे दोन्ही करत असताना जागतिक पातळीवरील उदयास येत असलेले ६ नवीन PEDAGOGY आपोआप राबविले जाईल. परंतु ते तसे होत आहे काय हे डोळसपणे पाहिले गेले पाहिजे. हे सर्व समेकीत पद्धतीने राबवायला लागले की २१ व्या शतकातील ६ C मुलांमध्ये येत जातील. तथापि ते ही डोळसपणे पाहत राहावे लागणार आहे हे राबवत असतांना काही प्रकल्प पद्धतीने शिक्षण देणे सुद्धा योग्य राहील.
वरील मुद्यांशी निगडीत काही अति आवश्यक बाबींचा उल्लेख येथे केले जात आहे.
७.१ आहार आणि आरोग्य :-
या दोन्ही बाबी पाठ्यक्रमामध्ये असतात. मात्र आतापर्यंत त्यांचा संबंध (समवाय) जीवनाशी फार जोडलेला दिसून येत नाही. मुलांना ४ थ्या वर्गापासून आहार शिक्षण देण्यास सुरुवात होते. मात्र मुलांच्या जेवणाविषयीच्या विचारात त्याचा परिणाम होत आहे की नाही हे बघितले जात नाही. योग्य (सकस) आहार न घेतल्यास मुले कुपोषित राहू शकतात. परंतु कुपोषण हा विषय बहुतेक आहार ज्ञानाशी जोडले गेले नाहीत. कुपोषित मुलांना पिसा स्तर ची तयारी करणे जड जाऊ शकते. शरीर स्वास्थ्य नसेल तर शिकण्याची गती मंदावते.
गरिबीमुळे सकस आहार घेणे शक्य नाही असे लोकांचे मत असू शकेल. पण त्या मतात थोडी दुरुस्तीची गरज आहे. ते मत असे असेल, गरिबीमुळे काही कुटुंबाना आहार घेणे शक्य नाही. परंतु आहार घेणे शक्य झाले तर तो आहार सकस राहील याची काळजी घेता येते. आहार शास्त्राचा उपयोग कमीत-कमी खर्चात सकस आहार कसा तयार करता येतो यासाठी करायला पाहिजे.गरिबी हा फार मोठा मुद्दा नसेल तर घरातील आहारामध्ये काय बदल केल्याने तो सकस होईल यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. हे सर्व ज्ञान पाठ्यपुस्तकाच्या आहार धड्यांमधून मिळत नसेल तर यु-ट्यूब चा वापर करून मुलांना शिकायला लावावे. दृष्टी अशी कि पुढील एका वर्षात आपल्या शाळेतील १००% मुले वयानुरूप योग्य वजनाचे असले पाहिजे. म्हणजेच त्यांच्या BMI (BODY MASS INDEX) २२ ते २४ च्या मध्ये पाहिजे. BMI चा अभ्यास सुद्धा मुले यु-ट्यूब मधून करू शकतात. दर महिन्याला मुले स्वतःचे BMI काढून आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतात. सुरुवातीस मोठ्या मुलांनी लहान मुलांना BMI गणना करण्यात मदत करावी.
काही शाळांनी शाळेत पोहा व भेळ बनविण्याचे उपक्रम केल्याचे ‘वेध’ ग्रुप मध्ये शेयर केल्याचे आठवते. मात्र त्याचा संबंध पोह्यामध्ये असलेले उष्मांक, प्रथिने आणि मायनर मिनरल शी केल्याचे आठवत नाही. तसेच BMI बद्दल एखाद्या शाळेने उपक्रम केल्याचे आठवते. परंतु प्रत्येक शाळेने दर महिन्याला ते करावयाचे आहे. अर्थात एकदा शिकविले कि हे काम मुले स्वतः करीत राहतील.
७.२ स्वच्छता,आजार आणि नीटनेटकेपणा :-
आहार आणि आरोग्याचा जसा संबंध आहे तसाच संबंध स्वच्छता आणि आरोग्याचा सुद्धा आहे. दरवर्षी १५ नोव्हेंबर रोजी हात धुण्याचे कार्यक्रम करून स्वच्छतेची इतिश्री होऊ नये. मुले रोज ७ पदी हात धुतात कि नाही हे पाहणे. एखादे मुल किंवा स्वतः आजारी पडल्यास त्याचे नेमके कारण कोणते ? याचा विचार करायला पाहिजे. साधारणपणे आजार ताप-खोकला, सर्दी आणि हगवण एवढेच असतात. योग्य प्रमाणात जेवण (पोट साफ राहणे), योग्य प्रमाणात कपडे घालणे (थंडी वाजू नये), स्वच्छ पाणी पिणे, शरीर स्वच्छ ठेवणे आणि हात स्वच्छ धुतल्याने यापैकी कोणताही आजार होत नाही. प्रत्येक आजाराच्या वेळी त्याची कारणमीमांसा करून पुढे ते कारण होऊ न देणे हे कार्य प्रत्येक शाळेने करून मुलांना तशी सवय लावावयाचे आहे. पिसा पातळीवरील शिक्षण मिळण्यास याचा मोठा वाट राहणार आहे.
आपण जागतिक पातळीचे नागरिक तयार करू पाहत आहे. तेव्हा मुले नेहमी नीटनेटके राहायला पाहिजे. वाशीम जिल्ह्याच्या एक शाळेने ‘SELFIE WITH SUCCESS’ चा वापर करून मुलांना नीटनेटके राहायला शिकविल्याचे एक उदाहरण आपल्या समोर आहेच. याचा संबंध कुणी पालकांच्या गरिबीशी जोडत असतील ते मान्य नाही. बाकीचे विचार आपण आपल्या पातळींवर करावे.
७.३ FIT INDIA :-
स्वस्थ व निरोगी राहण्यासाठी शरीराच्या प्रत्येक अंगाला योग्य व्यायाम मिळत राहायला पाहिजे. मा.पंतप्रधान म्हणतात कि, प्रत्येक व्यक्तीने दर दिवशी एक तास तरी घाम गळायला पाहिजे. हे घाम गाळणे होत असताना हृदयाचे ठोके किमान दीड पटीवर गेले पाहिजे. म्हणजेच किमान १०८ ( ७२ च्या दीडपट ) असे किमान एक तास रोज. मग ते नियमित काही काम असो, शाळांमध्ये केले जाणारे P.T. असो, विविध खेळ असो किंवा एरोबिक्स असो किंवा अन्य काही. यातल्या ब-याच गोष्टी यु-ट्यूब मधून शिकता येईल. काही पालकांचे मदत घेता येईल. वाबळेवाडी मधील तो पालक आपणास आठवत असेल ज्यांनी शाळेच्या विकासासाठी आपल्या कारखानदाराला सांगून आपला शिफ्ट शाळेच्या वेळी असणार नाही याची मान्यता घेतली आहे.
शारीरिक व्यायाम करीत असताना एकापेक्षा अधिक गोष्टी जसे काम, क्रीडा नृत्य, संगीत, गणित इ.केल्यास हॉवर्ड गार्डनर च्या एका पेक्षा अधिक इंटेलिजन्सचा वापर आपण करू. शाळांनी एरोबिक्स करायला पाहिजे याने संगीत, नृत्य आणि व्यायाम एकाच वेळी होईल. अर्थात BODY KINESTHETICS आणि MUSIC INTELLIGENCE चा वापर सोबतच होईल.
७.४ क्रीडा :-
क्रीडा मध्ये दृष्टी अशी की देशातील प्रत्येक मुलांना आवडणारे क्रीडा प्रकारची जाण व्हायला हवे. अतः प्रत्येक शाळेनी प्रत्येक खेळ केव्हातरी खेळायला पाहिजे. भारत देशाला OLYMPIC मेडल फारच कमी मिळते. ते वाढवायचे असेल तर देशातील प्रत्येक मुलाला एखादे विशिष्ट खेळाबद्दल आवड कळायला पाहिजे. हे कार्य प्राथमिक शाळांचे आहे. एखाद्या मुलाचे एखाद्या खेळाबाबत आवड कळल्यावर क्रीडा विभागाच्या मदतीने त्याची त्याच दिशेने विकासाची योजना आखायला पाहिजे. मधली पायरी शालेय क्रीडा स्पर्धा राहीलच. चांगले खेळाडू असेल तर स्वप्न OLYMPIC चेच पहावयास हवे. ते पूर्ण नाही झाले तर इतर काही आशियाड, कॉमनवेल्थ, राष्ट्रीय खेळ, राज्य पातळी इत्यादी मिळेल. परंतु स्वप्न बघण्यात कमतरता नको.
यासाठी लागणारे साहित्य आणि मनुष्यबळसाठी गावातील समाज, गावातील खेळाडू, बाजूच्या गावातील माध्यमिक शाळा, तेथील क्रीडा शिक्षक, तालुका किंवा जिल्हा स्तरावरील विविध खेळांचे संघ, क्रीडा विभागातील कोच आणि अधिकारी इत्यादी यांचेशी समन्वय साधून पुढील पाऊले उचलावे.
७.५ शेतीकाम :-
भारत कृषिप्रधान देश आहे असे सांगितले जात. अजून ही आपल्या देशात ६० टक्केचे सुमारास लोक शेती करतात. देशाच्या GDP मध्ये शेतीचे योगदान फक्त १७% राहिले आहे. (PLEASE CHECK) अर्थात शेतकरी लोक गरीब आहेत. ग्रामीण भागातील सरकारी शाळांमध्ये शिकणारी मुले शेतकरी किंवा शेतमजुरांचीच आहेत. मुले शिकले की शेती करणार नाहीत हा आपल्या देशाचा स्थायी भाव आहे.
परंतु आता परिस्थिती बदलत आहे. ओर्गेनिक शेती, विविध फळ- भाज्यांची शेती आणि औषधांची शेती करण्याकरीता खूप शिक्षित लोक या क्षेत्रात शिरत आहेत. लठ्ठ पगाराची नोकरी सोडून शेती करणारे लोकांच्या संख्येत वाढ होत आहे. त्याची बरीच करणे आहेत. पर्यावरणाचा –हास न होता शेती करावयाचे असेल तर कमीत-कमी नैसर्गिक संसाधने जसे पाणी, जमीन आणि रासायनिक खतांचा वापर नामशून्य करून अधिकाधिक उत्पादन मिळविण्याचे आव्हान हि हुशार मंडळी पेलू इच्छितात. त्यासाठी तंत्रज्ञानामध्ये तरबेज झाल्याशिवाय ते करता येत नाही. मोठ्या शहरांच्या ब-याच लोकांना स्वतः शेती करून दैनंदिन भाज्यांची आवश्यकता पूर्ण करण्याची इच्छा निर्माण होत आहे. असे केल्याने आपल्या शहराच्या घरात राहून आणि आपले नियमित पगाराचे कार्य करून करतात. शेताची पाहणी GPS किंवा असेच काही तंत्रज्ञानाच्या मदतीने करतात. गावात एक व्यवस्थापक असतो तो पूर्ण व्यवस्थापन करतो. तोच शेतातले भाज्या पाठवितो आणि हे शहरातले शेतकरी रोज स्वताच्या शेतातल्या भाज्या खातो. असे केल्याने ओर्गेनिक भाज्या खाता येतात. ज्याची चव अति उत्तम असते आणि जे शहरात खूप महाग असते. महाग असले तरी ते ओर्गेनिक मला मिळेल याची शाश्वती नसते. यासह आपण स्वतः शेती करतो आणि जमिनीशी जोडून आहोत असा भाव निर्माण होतो. त्याने माणूस समाधान मिळवितो आणि आनंदी होतो. आपल्या शाळेतील मुलांना यु-ट्यूब च्या माध्यमातून असे लोक, अशी शेती किंवा शेतीमध्ये होणारे नवीन बदल या सर्व विषयी माहिती काढण्यास सांगावे. या बाबींमध्ये वापरले जाणारे तंत्रज्ञानाची माहिती मिळविण्यास उद्युक्त करावे. याने काही मुलांना आतापासूनच शेतीची आवड निर्माण होऊ शकते. मात्र ती शेती सध्याची शेती (ज्यात उत्पादकता कमी आहे) राहणार नाही. तर तंत्रज्ञानाचा वापर करणारी, नैसर्गिक संसाधनाचा –हास मोडणारी भविष्यातली शेती असेल. याप्रकारे मिळविलेले काही ज्ञान मुले स्वतःच्या आणि गावाच्या शेतीत वापरायला सुद्धा सुरुवात करतील. शक्यता आहे की हि मुले शाळेत असतानाच शेतीतील तंत्रज्ञान आणि उत्पादकता सुधारून टाकतील.
कुमठे बीटमधील शाळांनी सेंद्रिय शेतीवर खूप काम केल आहे. अजूनही ब-याचशा शाळा परसबागेचे काम करतात. शाळेत जमीन उपलब्ध नसेल तर एखाद्या शेतक-याला विनंती करून या कामासाठी जमीन मिळवावी. याचे पण बरेच प्रकार असू शकतात. काही शेतकरी मुलांचे शिक्षण आणि स्वतः चा लाभ हे दोन्ही बाजू पाहून पार्टनरशिप करायला तयार होऊ शकतात. शाळेला अमुक जमीन मधील शेती आपली आहे असे सांगण्याचा मोह आवरून अमुक-अमुक शेतकरी आपले पार्टनर आहेत. त्यांच्या शेतात उगवणा-या पिकांबाबत आपल्या मुलांनी खत, पाणी, औषध वापराबाबत अभ्यास केला आहे. त्यातले गणित केला आहे. आणि मनुष्यबळासह सर्व संसाधनाच्या वापरात दक्षता वाढवून उत्पादकता वाढविण्याचा अभ्यास केला आहे आणि त्याच परिणाम हा आहे असे सांगणा-या शाळा तयार व्हायला पाहिजे.
त्या शाळा भविष्याची शेती समजावून देणारी, भविष्याचे मुल तयार करणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा राहतील. अशा शाळांना स्वतःचा अभिमान वाटायला पाहिजे. अशा शाळांचा देशाला सुद्धा अभिमान वाटेल.
७.६ विविध कला, संगीत, नृत्य, नाट्य ई. :-
प्रत्येक गावात हारमोनियम आणि तबला वाजविणारे नक्कीच असतात. ब-याच गावात शहराच्या गल्लीत झांज पथक असतात. कीर्तनकार असतात जे संगीताचा वापर करतात. वाबळेवाडी शाळेतील यश ने संगीतात पूर्ण पारंगततता मिळविली आहे. त्याने हे शिकण्यासाठी यु-ट्यूब चा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. वाबळेवाडी शाळेने पुणे शहरातील विविध कला, संगीत, नृत्य नाट्य संस्थेशी स्वतःला जोडून घेतला आहे. शाळेतील मुले त्याच्या शिबिरामध्ये सहभागी होतात. बरीच शिबिरे शाळेतच होतात. या संस्थांद्वारे काही चाचण्या आयोजीत केल्या जातात. वाबळेवाडी शाळा अशा चाचण्यांचे केंद्र सुद्धा नेमले गेले आहे.
आपल्याही बाजूच्या शहरात अशा संस्था असतील किंवा ONLINE प्रशिक्षण आणि चाचण्या करणा-या संस्था उपलब्ध असतील किंवा यु-ट्यूब वरून शिकता येण्यासारख्या भरपूर बाबी असतील. मुलांच्या समोर ह्या सर्व संधी आणि पर्याय उपलब्ध करून द्यावे. नंतर मुले आपल्या आवडी-निवडी प्रमाणे पुढील पाऊले उचलतील, त्यास शाळेनी मदत करावी.
७.७ विविध विषयांचा जीवनाशी संबंध जोडणे : –
पिसा रेडी किंवा भविष्यवेधी मुले तयार करण्याची हि मुलभूत प्रक्रिया आहे. ब-याच शाळांनी “शाळा भरली बँकेत” अशा प्रकारच्या पोस्ट टाकल्या आहेत. वाबळेवाडी शाळेमधील एक प्रयोग खालीलप्रमाणे आहे. इतर शाळांनी आपले प्रयोग शेयर करावे. साधारणपणे असे १० विविध प्रयोग परिशिष्ट म्हणून टाकले जातील.
८) हॉवर्ड गार्डनरच्या ८ इंटेलिजन्स आणि त्यासाठी उपक्रम :- हे ८ इंटेलिजन्स खालीलप्रमाणे आहेत.
- LINGUISTIC INTELLIGENCE (भाषिक बुद्धिमत्ता)
- LOGICAL MATHEMATICAL INTELLIGENCE (तार्किक गणितीय बुद्धिमत्ता)
- MUSICAL INTELLIGENCE (सांगीतिक बुद्धिमत्ता)
- BODILY – KINESTHETIC INTELLIGENCE (शारीरिक गतिक बुद्धिमत्ता)
- SPATIAL INTELLIGENCE (अवकाशीय बुद्धिमत्ता)
- INTERPERSONAL INTELLIGENCE (परस्परांविषयी बुद्धिमत्ता)
- INTRAPERSONAL INTELLIGENCE (स्वविषयी बुद्धिमत्ता)
९)उद्योजागता विचारशैली प्रशिक्षण अभ्यासक्रम :-
उद्योजागता विचारशैली प्रशिक्षण अभ्यासक्रमामुळे देशाच्या दोन प्रमुख समस्यांचे निदान होईल. – बेरोजगारी आणि संस्था विकास दर. जी मुले मोठे होऊन उद्योजक बनतील ते स्वतः व अन्य लोकांसाठी रोजगार तयार करतील. उद्योजगता विचारशैली अभ्यासक्रमाने नोकरी करण्याची इच्छा असणा-यांना सुद्धा लाभ होईल. नोकरी करणा-यांमध्ये दोन प्रकारची माणसे असतात. एक, जे नोकरीच्या मागे धावतात. आणि दुसरे, ज्यांच्या मागे नोक-या धावतात. जी मुले नोक-यांच्या मागे धावतात त्यांच्याकडे डिग-या असतात पण उद्योजगता विचारशैलीची कमतरता असते. ही गुणवत्ता ज्या लोकांमध्ये असते ते नोकरी करताना सुद्धा उद्योजागता विचारशैलीने कामे करतात. नोकरदार एखाद्या व्यक्तीच्या याच गुणांना सर्वाधिक पसंत करतात. म्हणून या अभ्यासक्रमाने भविष्यात नोक-या करणारे मुले सुद्धा मोठ्या प्रमाणावर यशस्वी होतील.
यानंतर दिल्ली शासनाद्वारे तयार केले गेलेले उद्योजगता विचारशैली अभ्यासक्रमाचे तोंडओळख देण्यासाठी खालील पानांना वाचावे.
![](https://vedh.org.in/wp-content/uploads/2024/12/image-556x720.png)
![](https://vedh.org.in/wp-content/uploads/2024/12/image-1-526x720.png)
![](https://vedh.org.in/wp-content/uploads/2024/12/image-2-542x720.png)
![](https://vedh.org.in/wp-content/uploads/2024/12/image-3-506x720.png)
![](https://vedh.org.in/wp-content/uploads/2024/12/image-4-538x720.png)
१०) जगासाठी तयारी :-
आताच जगातील विविध देश एकमेकांशी जोडले गेले आहेत. इंटरनेट त्यास महत्वाचे कारण आहे. याने मानवीय आकांक्षेची दूरभ्रमण आणि दूरदर्शन घटक पूर्ण होतात. मात्र दूरभ्रमण अर्थात माणसाना लांब प्रवासाची सुद्धा इच्छा होते. ते इंटरनेट ने पूर्ण होत नाही. आज युरोप आणि अमेरिकेचे सरासरी प्रौढ व्यक्तीकडे कार आहे. तसेच तेथे विमानाने प्रवास साधारण समजले जाते.
भारत देशात आजच्या घटकेला हजारी २२ कार आहेत. हे अमेरिकेत आणि युरोपच्या क्रमशः ८५० आणि ९०० पेक्षा फारच कमी आहे. BATTERY ने चालणारे कार आल्यावर पर्यावरण बाबतची काळजी फारशी करावयाची गरज राहणार नाही. ओला, उबेर सारख्या कंपन्या असल्यामुळे प्रत्येकाला स्वतःच्या कार घ्यायची गरज भासणार नाही. तथापि सर्व भारतीयांची दूरगमनाची इच्छा पुरती व्हायला अजून अवकाश आहे. फक्त भारतात जन्माला नाही आले म्हणून भारतीय लोकांचा दूरगमनाचा हक्क हिरावून घेणे योग्य नाही.
भारतातील प्रत्येक मुलाला याबाबतील माहिती व्हायला पाहिजे तसेच सध्या शाळेत असलेल्या मुलांना जागतिक स्वप्न बघता यायला पाहिजे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय शिक्षण विचार खालील ३ बाबी करेल .—
१०.१ विदेशी भाषा शिकविणे :-
महाराष्ट्रात ब-याचशा शाळेतील मुले यु-ट्यूबच्या मदतीने काही विदेशी भाषा जसे जपानी, चीनी, जर्मन, फ्रेंच, स्पेनिश आणि इतालवी शिकण्यास सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय शिक्षण विचाराच्या माध्यमातून देशातील प्रत्येक मुलाला भारतातील इतर भाषांसह एक तरी भाषा निवडतांना त्या देशाची दरडोई लोकसंख्या ५ कोटीपेक्षा अधिक असावे तसेच त्या देशाचे दरडोई उत्पन्न भारतापेक्षा किमान ५ पट असावे. तसेच त्या देशात इतर देशांच्या माणसांना जॉब आणि उद्योगधंद्यांची संधी उपलब्ध आहे काय हे पाहणे.
पूर्वेकडील देशांचे लोक धार्मिक कारणाने अजिंठा, वेरूळ, बोधगया इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भेटी देतात. त्या प्रवासी लोकांना ‘घरातच आहोत’ अशी भावना निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणी जवळच्या लोकांनी चीनी, जपानी, थाई, व्हिएतनामी शिकणे सुद्धा योग्य राहील. काही लोकांना गाईड बनण्याची संधी मिळू शकेल.
१०.२ शाळाच्या जागतिक जुळणी :-
महाराष्ट्रात ब-याचशा शाळा EMPATICO या वेबसाईटच्या मदतीने महाराष्ट्र, देशातील इतर राज्य तसेच जगातील इतर देशांशी काही प्रमाणात जुळणी केली आहे. अशा जुळण्या आणि पार्टनरशिप प्रत्येक शाळेने करावी. हे करण्यास किमान व्यवस्था LAPTOP आणि इंटरनेट लागते. जुळत असताना त्या देशाचे टाईमझोन आपल्या शाळेच्या वेळेला उपयुक्त आहे काय हे बघावयाचे असते. तथापि बिंदू क्र. १०.१ मध्ये दिलेल्या निकषांप्रमाणे देशांच्या निवड केल्यास काही वेळा त्या देशाच्या शाळेची आणि काही वेळा स्वतः या कामासाठी त्यावेळी शाळा उघडण्याची व्यवस्था करणे योग्य राहील.
दुसरी बाब भाषेची असते. एरव्ही आपल्या मुलांना विदेशी भाषा शिकवायचे आहेच. इंग्रजीसुद्धा जागतिक भाषा आहे. या दोन भाषा त्वरेने शिकण्यासाठी मुलांना प्रोत्साहित करावे तसेच दोन्ही बाजूला इंटरप्रीटर ठेवून हे कार्य नक्कीच प्रत्यर्क शाळेने करावे. सुरुवातीस थोडी अडचण येते; परंतु तिस-या – चौथ्या जुळणी नंतर या अडचणी सोडविल्या जातात.
१०.३. जागतिक शिष्यवृत्तींची तयारी :-
जगाच्या श्रीमंत देशांमध्ये युवकांचे प्रमाण कमी झालेले आहे. त्यामुळे तेथील शिक्षण व्यवस्थेतील लोकांचे बेरोजगारीचे प्रश्न निर्माण होत आहेत. कारण कि पटांवर मुले कमी झाली आहेत. तसेच जगातील आर्थिक कमकुवत कुटुंबातील मुलांना मदत करण्याचे धोरण अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर आहे. इतर देशांत सुद्धा असे असतील. त्याचा शोध घ्यावा याचे प्रमाण हळू-हळू पूर्ण जगभर वाढत जाईल.
आपल्या देशात युवकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. इतर देशांत उच्च शिक्षण घेण्याची इच्छा सुद्धा आपल्या युवकांमध्ये आहे. जागतिक EXPOSER आणि शिक्षण हे मुलांना जागतिक नागरिकत्वकडे अग्रेसर करेल म्हणून या विचारावर मोठ्या प्रमाणावर काम करावयाची गरज आहे.
देशातील काही संस्था TEACH FOR INDIA तसेच आकांक्षा या दिशेने काम करीत आहे. महाराष्ट्रातील माध्यमिक शाळेतील मुलांना त्यांची मदत मिळू शकेल. वाबळेवाडी शाळेने त्याबाबत पुढाकार घेतला आहे. रयत शिक्षण संस्था व नंतर हळू-हळू प्रत्येक SCHOOL COMPLEX (जि.प.प्राथमिक शाळा आणि ही मुले ज्या शाळांमध्ये माध्यमिक शिकतात ते मिलन) ने या दिशेने काम करावे. इतर राज्यांनी सुद्धा याप्रमाणे काम करावे.
या तयारीला SAT आणि CAT ची तयारी म्हणतात.
११) संगणकीय विचारसरणी (COMPUTATIONAL THINKING) :-
यास आणखीही काही शब्दांनी ओळखले जाते. –
- COMPUTER CODING
- COMPUTER PROGRAMMING
- ALGORITHMIC THINKING
या शब्दाची उत्पत्ती संगणक असले तरी याचा संबंध समस्या निराकरणाशी आहे. संगणकीय विचारसरणी तयार झाल्यावर जटील समस्यांचे विश्लेषण करणे, निराकरणासाठी सूत्रबद्ध करणे आणि मग समस्या निराकरण करणे हे माणसास सोपे जाते. संगणकीय विचारसरणी मूलतः संगणक वैज्ञानिकांद्वारे वापरले जाते. ज्याच्यात गणित, विज्ञान आणि सर्जनशिलतेला एकत्रित आणून संगणक आज्ञावली तयार केली जाते. या आज्ञावलीद्वारे संगणक मोठ-मोठ्या समस्या निराकरण करते.
संगणक विचारसरणी विकसित झाल्याने प्रत्येक माणूस सुद्धा आपणास ज्ञात असलेली माहिती व उपलब्ध संसाधनांचा वापर करून स्वतःचा आणि आपल्या समाजाच्या समस्या सोडवू शकतात. त्यामुळे COMPUTATIONAL THINKING एक शिक्षण पद्धतीच्या स्वरुपात नाव रुपाला आली आहे. त्याचा ICT शिक्षणाशी तंतोतंत संबंध नाही. आपल्या शाळेतील मुलांना संगणक न शिकविता संगणकीय विचारसरणी शिकवायचे आहे. अतः यासाठी वर्गात किंवा शाळेत संगणकाची आवश्यकता नाही.
यामध्ये मुलांनी हे शिकायचे असते :-
- पृथक्करण (DECOMPOSITION) :- एखाद्या जटील समस्यांचे छोट्या-छोट्या भागात मांडणी करता येणे.
- ALGORITHM :- प्रत्येक भागास ओळखून प्रत्येक पावलांचे विवरण देता येणे.
- DEBUGGING :– या पावलांमध्ये काही तृटी किंवा विसंगतता राहिली असल्यास ते शोधणे आणि काढून टाकणे.
संगणकीय विचारसरणी शिक्षणाचा पाया पक्का झाल्यास कोणताही विषय शिकण्याचा आणि कोणत्याही प्रकारच्या समस्या सोडविण्याचे कौशल्य विकसित होते. हे झाल्याने निम्न प्रकारच्या समस्या सोडविता येणे शक्य होईल.-
- अशा समस्या ज्यांचे अंत दिसत नाही त्या हाताळता येईल.
- आव्हानात्मक परिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता विकसित होईल.
- अमूर्त वस्तूंबद्दल तार्किक मांडणी करता येईल.
- एखादी परिस्थितीची मांडणी करतांना मॉडेल विकसित करता येईल.
- अस्पष्ट असलेल्या बाबी हाताळता येतील.
- दिलेल्या तपशीलावरून योग्य निष्कर्ष काढता येईल.
- दिलेल्या विचार किंवा आव्हानाचे तुकडे पडता येईल.
वर्गात अंमलबजावणी :-
या विषयावर चहा बनविण्याचा अभ्यास काही महिन्यापूर्वी आपण ‘वेध’ मध्ये केला होता. याचप्रकारचे अभ्यास मुलांना करायला लावणे. जगातील विविध भागांत शाळांमध्ये काही वापरल्या जाणा-या कृती :-
- ‘टेकडीवर झाड होत’: कितना ‘इतना बडा पहाड’ सारखे भाषिक खेळ घेणे. त्यात १० विविध बाबी येतील हे पाहणे. मुलांना त्याच क्रमाने त्या बाबी बोलता येतील याचा सराव घेणे.
- मिनाचा नकाशा :- १ ते १०० लिहिलेल्या अंक तक्त्याचा विचार करा. या तक्त्यातील अंक काढून टाकल्यावर शिल्लक राहील त्या तक्त्याचा काही भाग. समजा १० X ७ चा तक्ता निवडा. यातला वेगवेगळ्या खाण्यांमध्ये काहीमध्ये प्राणी तर काहीमध्ये खाण्याचे पदार्थ चित्ररुपात ठेवावेत. मग मुलांना सांगावे एकावेळी एक एक खाना चालता येईल. – वर, खाली, उजवा किंवा डावा. प्राण्याला पदार्थांपर्यंत पोहोचायला कमीत-कमी किती पावले चालावे लागतील. त्यात किती वर, खाली, उजवा आणि डावा पावले चालावे लागले इत्यादी.
- पृथक्करण ( DECOMPOSITION ) कृती :- यामध्ये चहा बनविण्याच्या कृतीसारखे विविध कृतींचे टप्पे पडण्यास मुलांना सांगणे. ते टप्पे त्याच क्रमाने लावता येणे हे शिकवायचे आहेत. काही उदाहरणे:-
- झाड लावणे.
- हात धुणे.
- नाश्ता तयार करणे.
- जोड्याचा लेस बांधणे.
- चहा बनविणे
- दाताला ब्रश करणे.
- अंघोळ करणे इत्यादी.
१२) आदिवासी बोलीभाषा ज्ञात असलेल्या मुलांच्या शिकण्याची गती वाढविणे :-
आपल्या देशात आदिवासी किंवा अन्य बोलीभाषा बोलणा-या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न अजून मार्गी लागलेला नाही. राज्यांची रचना भाषेच्या आधारे झाली असल्याने प्रत्येक राज्य आपल्या भाषेत प्राथमिक शिक्षण देतो. याने बोलीभाषिक मुलांची गळचेपी होते. याला विविध पर्याय शोधले गेले आहेत. त्यात दुस-या वर्गापर्यंत बोलीभाषेत शिक्षण किंवा पूर्ण प्राथमिक शिक्षण (५ व्या वर्गापर्यंत) बोलीभाषेत शिक्षण असे काही उपाय आहेत.
अमरावती जिल्हा महाराष्ट्र राज्य धारणी तालुक्यात शांतीलाल मुथा फाउंडेशन मार्फत ३० शाळांमध्ये ‘अक्षरसेतू’ नावाच्या प्रकल्प सुरु आहे. त्यात सुरुवातीपासून प्रमाणभाषा मराठी आणि बोलीभाषा कोरकू या दोन्हींच्या शब्दांनी मिश्रित स्वरूपाचे वाक्य तयार करून ते मुलांना वाचण्यास दिले गेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे हे नवीन शिक्षणशास्त्र आहे. याचा परिणाम असा झाला आहे कि पहिली आणि दुसरी वर्गांमध्ये सुद्धा मुलांचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा आहे. याने मुले लवकर वाचायला शिकतात. काही मुलांना वाचायला आले कि ती मुले अन्य मुलांना शिकवू शकतात. त्यामुळे वाचन न येण्याचे प्रमाण फार लवकर शून्यावर आणणे शक्य आहे.
पुढचा मुद्दा आहे, ते मुलांना अधिक वाचनाचे आव्हान कोणत्या भाषेत द्यावे. बोलीभाषेत साहित्यांची कमतरता तर वाचायला शिकून झाल्यावर सुद्धा प्रमाणभाषा वाचून कळणार नाही. पुन्हा वाचायला शिकल्यानंतर वाचन कौशल्याचा वापर होत नसेल वाचायला शिकायचे कशाला ? असा एक नवीन प्रश्न निर्माण होतो. त्यातच जर मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून विकसित देशांच्या मुलांच्या स्पर्धेत उतरायचा असेल तर कोणत्या भाषेला माध्यम म्हणून वापरायचे ? बोलीभाषा, प्रमाणभाषा, इंग्रजी कि अन्य कोणती भाषा जसे जर्मन, चीनी, फ्रेंच, कोरियन, स्पेनिश किंवा अन्य ?
मुलांच्या शिकण्यात कोणतीही मर्यादा नसते हे सर्वमान्य आहेच. मुलांचा आत्मविश्वास वाढविण्यात यश आले कि सर्व काही शिकतील यात हि शंका नाही. मग वाचायला पुढचे मजकूर काय द्यावे हा प्रश्न भारत देशाला सोडवावा लागणार आहे. आम्ही मोबाईल TECHNOLOGY ला माध्यम म्हणून वापरण्याचे वकालत करीत असल्यामुळे हा अशी कोणतीही बाब ज्याची पटकन PDF तयार करता येत असेल ती प्रत्येक बाब मुलांना द्यावयास हवे. त्यातच आम्ही मुलांनाच ज्ञानाचा श्रोत किंवा त्या पातळीवरील साहित्यांचे रचयिता म्हणून सुद्धा विचार मांडत असल्यामुळे जे साहित्य पटकन तयार होऊ शकतील ते खालीलप्रमाणे दिसतात आणि त्यामुळे त्या साहित्यांची झपाट्याने निर्मिती करून त्याची PDF करून ते द्यावयास हवे. धारणीच्या प्रकरणात हे कार्य अगदी एका आठवड्यात करणे शक्य आहे.
- कोरकू समाजात प्रचलित असलेल्या गाणी/गोष्टींचे संकलन.
- मराठी पाठ्यपुस्तकातील शब्द जे कोरकू मुलांना समजणार नाही त्या शब्दांचे वर्गनिहाय शब्दकोश तयार करणे.
- वर्गात घडणा-या बाबींचा मुलांना जमेल तसे विवरणात्मक गोष्टी तयार करणे आणि ते दोन्ही भाषेत ( मुलांच्याच मदतीने ) प्रसारित करणे.
- याचप्रमाणे मुलांना फार लवकर इंग्रजी वाचनाच्या पातळीवर नेऊन वरील सर्व प्रकारचे साहित्य इंग्रजी वाचनासाठी सुद्धा करणे.
- हे सर्व PDF APP च्या माध्यमातून GOOGLE PLAY वर उपलब्ध करून देणे जेणेकरून छापण्याचा आणि आनुषंगिक बाबींच्या अडचणी राहणार नाही.
शिक्षणासाठी पालकांच्या मोबाईलचा उपयोग :-
आता हे सिद्ध झाले आहे कि सध्याची मुले आणि शिक्षक मोबाईलच्या माध्यमातून –
- १. स्वतःचा गणित विषय सुधरवतात.
- २. SPOKEN ENGLISH शिकण्याकरिता.
- २.१ INDIAN TED TALK ऐकून अधिक ENGLISH LISTENING ची PRACTICE करतात.
- २.२ GOOGLE बोलो APP चा वापर करून वाचनाची PRACTICE करतात.
- २.३ विविध RHYMES ऐकतात.
- २.४ इसापनीति / पंचतंत्र /हितोपदेश च्या गोष्टी वाचतात.
- २.५ दैनंदिन जीवनातील घडणा-या विविध घटना इंग्रजीत बोलण्याची अभ्यास करण्याकरिता मोबाईलचा GOOGLE TRANSLATE APP मध्ये मराठीत DICTATION देतात. यांने तो APP, ENGLISH मध्ये TRANSLATE करून टाईप करतो. त्यास मुले वाचतात आणि त्याप्रमाणे त्या घटनेबाबत इंग्रजीत बोलतात.
- ३. YOU TUBE चे VIDEO पाहून….
- ३.१ RADAR तयार केले आहे.
- ३.२ MUSIC शिकले आहे.
- ३.३ PAINTING शिकले आहे.
- ४. मुलांनी स्वतःचे WHATS APP गृप जसे SUPER 150 चालवले आहेत. त्याच्या माध्यमातून…
- ४.१ COMPUTER PROGRAMMING शिकले आहेत. COMPUTER PROGRAMMING चा SYLLABUS काय असावा हे ठरविले आहे.
- ४.२ एकमेकांना इंग्रजी व अन्य विषय शिकण्यास मदत केली आहेत.
- ४.३ SCHOLARSHIP EXAM, OLYMPIAD आणि PISA च्या प्रश्नांचा PATTERN शोधून अभ्यास करण्यासाठी वापरले आहेत.
- ५. शिक्षकांनी पालकांचा WHATS GROUP तयार करून….
- ५.१ मुलांनी वर्गात केलेल्या विविध नोंद घेण्यासारखा फोटो / व्हिडीओ शेअर केले आहेत.
- ५.२ मुलांनी इंग्लिश बोलल्याचा व्हिडीओ गृपमध्ये शेअर केले आहे. त्याने पालक आणि मुले दोन्ही अधिक प्रेरित होऊन इंग्रजी बोलण्यासाठी अधिक PRACTICE करण्याची कामगिरी केल आहे. त्याने मुलांचे SPOKEN ENGLISH सुधारण्यासाठी शाळेपलीकडील वेळेचा उपयोग करण्यास मदत मिळाली आहे.
- ६.शिक्षकांनी शिक्षक आणि अधिका-यांचे WHATS APP गृप तयार करून….
- ६.१ वर्गात येणा-या यशाचा ‘SELFIE WITH SUCCESS’ या सदराखाली यशस्वी झालेल्या मुलांसोबत स्वतःचा SELFIE काढून शेअर केले आहे. याने मुले आणि शिक्क अधिक प्रेरित होण्यासोबतच इतर शिक्षक आणि अधिका-यांना यश मिळविण्याचे विविध विचार मिळाले आहे.
- ६.२ शिक्षकांना मुलांना शिकविण्यात येणारी एखादी अडचण गृपमध्ये विचारले आहेत आणि गटातील लोकांनी त्या अडचणीवर मात करण्यासाठी त्यांनी केलेल्या उपाय शेअर केले आहे.
या व अशा प्रकारच्या भरपूर बाबी मोबाईल आणि WHATS APP GROUP वापर केल्याने करता येतात. त्याने शिक्षण साचेबद्धपणा पासून मुक्त होतो आणि अमर्याद शैक्षणिक प्रगतीचा मार्ग सुकर होतो. यास आंतरराष्ट्रीय शिक्षण विचाराच्या ६ पाय-या जोडल्या कि आपली मुले जगातील कोणत्याही बेस्ट शिक्षण व्यवस्थेच्या बरोबरीला जाऊन शिकू शकतात असे आशावाद निर्माण होते. त्यामुळे सर्व शिक्षक आणि पालकांची जबाबदारी आहे कि मुलांच्या शैक्षणिक विकासाकरिता सर्वांनी मोबाईल TECHNOLOGY पुरेपूर वापर करावा.
मोबाईल TECHNOLOGY वापराबाबत विचार करतांना येणा-या काही संभाव्य अडचणी आणि त्यावर केले गेलेले उपाय खालील प्रमाणे आहेत:
- मुले वाईट बाबी बघतील :- असे पालक आणि शिक्षक दोघांना वाटते. यावरून ते स्वतः मोबाईल चा कसे वापर करतात हे दिसून येते. तथापि मुलांना पालकांचेच मोबाईल वापरायचे असल्यामुळे आपल्या देखरेखीखाली वापरण्यास देता येते. तसेही हे पुरेसे कारण असू शकत नाही कारण की हीच मुले आयुष्यात केव्हातरी मोबाईल वापरणारच आहेत. त्यामुळे दत्तात्रय वारे सर म्हणतात त्याप्रमाणे मुलांनी मोबाईल मध्ये ‘काय बघू नये’ हे सांगत बसण्यापेक्षा ‘काय बघावे’ हे सांगणे केव्हाही उत्तम.
- मुलांचे डोळे खराब होणार :- मुलांना पालकांचेच मोबाईल द्यावयाचे असल्यामुळे पालकांद्वारे मोबाईल वापरण्याचे वेळ कमी होऊन पालकांचे डोळे सुरक्षित राहतील. त्यामुळे हे पुरेसे कारण नाही तथापि मुले आयुष्यात केव्हातरी मोबाईल वापरणारच आहेत त्यामुळे हे ठिसूळ कारण आहे.
- मुले फक्त GAMES खेळतील :- एकदा शिकण्याचा लळा लागला कि मुलांचे GAMES खेळणे बंद होईल किंवा शिकण्याच्या बाबींचे GAMES खेळतील. हि बाब सध्या उलट आहे. बरेचशी मुले सध्या हट्ट करून पालकांचे मोबाईल घेतात आणि फक्त GAMES खेळतात. या लेखात दिलेल्या विचाराने ही परिस्थिती सुधारेल.
- सर्व पालकांकडे मोबाईल नाही :- ही खरी परिस्थिती आहे. हळू – हळू पालकांकडे मोबाईल वाढत असेल तरी ब-याच पालकांकडे मोबाईल नाहीत किंवा छोटे मोबाईल (ANDROID नसलेले) आहेत. ज्याच्यामध्ये WHATS APP आणि YOU TUBE चालत नाहीत. मुलांच्या शिक्षणासाठी मोबाईल उपयोगी साधत आहे हे लक्षात आणून आणि विशेष करून ‘माझ्या मुलाला सुद्धा ENGLISH बोलता यायला पाहिजे’ पालकांच्या या विचाराचा उपयोग करून प्रत्येक पालकाला आज किंवा उद्या ANDROID मोबाईल विकत घेण्याकरिता शिक्षक प्रेरित करू शकतात. हे घडत नाही तोपर्यंत १००% मुले मोबाईल वापरण्याबाबत आपले मानसिक अडसर दूर करण्यासाठी जि.प.शाळा उखळीच्या (ता.सोनपेठ, जि.परभणी,महाराष्ट्र) पाचव्या वर्गाच्या १००% मुलांनी GOOGLE BOLO APP वापरतांना घडलेली गोष्ट येथे उद्दृत केले जात आहे.
१६ डिसेंबर २०१९ रोजी मी सोनपेठ येथे भेट दिली असता उखळी शाळेच्या मुले आणि शिक्षकांना तेथे बोलाविण्यात आले होते. मला माहिती दिली गेली कि या वर्गातील मुले GOOGLE BOLO APP वापरतात. तेव्हा मी मुलांना विचारले की कोण-कोण वापरतात. बरेच हात वर आले. माझा पुढचा प्रश्न होता की कोण-कोण वापरत नाहीत. तेव्हा ४ हात वर आले. त्यातील एका मुलीला विचारले की ती का वापरात नाही. तिने सांगितले कि त्यांच्या आई-वडिलांकडे मोबाईल नाही. मग मी वापरणा-या मुलांना विचारले कि तुमच्यापैकी काही आहेत काय ज्यांच्या पालकांकडे मोबाईल नाही. पुन्हा ४ (योगायोग) हात वर आले. त्यात मुले काका, इतर नातवाईक किंवा मित्रांचे मोबाईल वापरत होते. याप्रमाणे या समस्येचा हल निघत होता. शिक्षक आणि अधिका-यांना तसे जुगत करून १००% मुले APP वापरतील हे निश्चित करा आणि मला कळवा अशी सूचना केली. २५ डिसेंबर २०१९ रोजी (१० दिवसांत) मला १००% मुले वापरायला लागली याचा निरोप आला. आपले मासिक अडसर दूर केल्याने या प्रश्नांचा हल निघाला आहे.
- शाळेत नेटवर्क नाही. लांब जावे लागते. कालेखेत शाळा ( ता.घडगाव, जि.नंदुरबार,महाराष्ट्र ) या गावात शिक्षक आणि काही तरुण मुले WHATS APP आणि YOU TUBE वापरतात. मात्र गावात नेटवर्क नाही. ३ किमी अंतरावर मुख्य रस्त्यावर नेटवर्क मिळते पण एवढी गती नाही. १० किमी अंतरावर तालुका मुख्यालयी नेटवर्क चांगले आहे. तरीपण ते लोक वापरतात. तसेच इतर पालक आणि मुले वापरू शकतात. योग्य CONTENT DOWNLOAD करण्यासाठी थोडे अंतर जावे लागेल. GOOGLE BOLO आणि बरेच अन्य APP OFFLINE चालतात. त्यास जास्त MEMORY लागू शकते. तशी व्यवस्था करावी. त्यास बरेच मार्ग आहेत. शिकून घ्यावेत. जि.प.शाळा पष्टेपाडा ( ता.शहापूर, जि.ठाणे, महाराष्ट्र ) या शाळेत वीज नाही व नेटवर्क ही नाही. तरीसुद्धा शाळेने सौरउर्जा आणि LOCAL WI-FI वापरून प्रत्येक मुलाच्या हातात TABLET देऊन TECHNOLOGY चा वापर मागील ५ वर्षांपासून केला आहे हे सर्वाना ज्ञात आहेच .
- दूर-दूरपर्यंत नेटवर्क नाही. देशातील छत्तीसगड मध्ये खूप मागासलेला भाग बस्तर, दंतेवाडा, बिजापूर इत्यादी जिल्हे. या जिल्ह्यांच्या ब-याचशा गावांमध्ये वर्षानुवर्षे नेटवर्क नव्हते. आता हळू-हळू पसरत आहे. तेथे गावांमध्ये रेडीओ किंवा TV ची सुद्धा सुविधा नाही. गावांमध्ये राहतात ती माणसेच. त्यांना विरांगुळाची गरज असतेच. त्यांनी छोटा मोबाईल ( फक्त फोन आणि SMS वाले) घेतले. कुठेतरी फोनसाठी त्रोटक नेटवर्क लागत असेल पण VIDEO DOWNLOAD एवढे नाही. एवढेच नाही तर त्यांचा आठवडी हाट – बाजार लागतात अशा मोठ्या गावांमध्ये सुद्धा VIDEO DOWNLOAD होईल एवढे POWERFUL नेटवर्क नाही. तेथील लोक हलबी आणि गोंडी गाणी हाट – बाजारामध्ये विकत घेतात. अनाज घ्यायला बाजारात आले असतांना त्यांना गाणे विकणारे सुद्धा भेटतात. तो विकणारा BLUETOOTH च्या माध्यमातून संबंधितांच्या मोबाईल मध्ये गाणी TRANSFER करतो. कारण तेथे सुद्धा मोबाईल नेटवर्क नाही, म्हणायचा अर्थ एवढाच की, ‘जहा चाह वहा राह’. शाळा/शिक्षक/पालक या प्रकारे नेटवर्क नसलेल्या मोठ्या भागात सुद्धा मोबाईल वापरू शकतात.