• १) मुलभूत स्तर – Basic rigour level (ASER TEST)
  • २) वर्गानुरूप अध्ययन निष्पती स्तर- Grade Appropriate Learning Outcomes rigour level (National Achievement Survey Test)
  • 3) एकविसाव्या शतकातील कौशल्य स्तर – 21st Century Skill rigour level (PISA Test)
  • १) वाचन न करता येणारी किंवा मुलभूत गणितीय क्रिया न करू शकणारी मुले – ASER level च्या मागे
  • २) असर स्तर ओलांडलेली परंतु वर्गानुरूप अध्ययन निष्पती प्राप्त न करू शकलेले – NAS rigour level च्या मागे.
  • ३) NAS स्तर ओलांडलेले परंतु २१ व्या शतकातील कौशल्यात मागे राहणारे – PISA rigour level च्या मागे
  • ४) २१ व्या शतकातील कौशल्यांच्या पुढे असलेली मुले.
  • १) ‘असर’ मूल्यमापनाप्रमाणे देशाची जी विदारक स्थिती दिसते त्यावर मात करता येईल.
  • २) हे उदाहरण आपणास शासकीय व्यवस्थेतील शाळांमध्ये तयार करावयाचे आहेत. तसे उदाहरण तयार करण्यामध्ये ज्या काही अडचणी असतील त्या समोर येतील.
  • ३) ‘असर’ चे मूल्यमापन करणे खूप सोपे आहे.ते कोणत्याही शिक्षक ,अधिकारी,स्वयंसेवक अथवा पालकांकडून सुद्धा करता येते.
  • ४) ‘असर’ प्रमाणे १०० % संपादणुकीचे चे कार्य करतांना शिक्षकांना स्वत:च्या कार्याचे परिणाम मोजण्याची सवय लावता येते.
  • ५) काही शिक्षकांनी १०० % उद्दिष्ट गाठले तर एकूण शिक्षण व्यवस्थे वरचा विश्वास तयार व्हायला मदत मिळते.
  • ६) शासकीय शिक्षण व्यवस्थेबाबत नैराश्य असल्यामुळे समाजात शिक्षकाबाबत आलेली नकारात्मकता दूर करण्यास मदत मिळते. जे शिक्षक सुरुवातीस हे पूर्ण करतील त्यांचा आत्मविश्वासात वाढ होते. त्यांना यशस्वी होण्याची प्रचिती येते व तो आनंदी होतो. प्रत्येक माणसाला आयुष्यात यश व आनंद हवाच असतो. त्यामुळे सुधारणा कार्यक्रम कार्यान्वित करण्याची हि प्रक्रिया माणुसकीला जाऊन भिडते.
  • ७) प्रबंधन शास्त्राचा आधार : या प्रक्रियेस प्रबंधन शास्त्राचा आधार सुद्धा आहे. रोजर्स कर्व्ह च्या नियमाप्रमाणे कोणतीही नवीन प्रक्रिया कार्यान्वित करतांना काही लोक early adopters असतात. येथे आम्ही त्या early adopters ला ओळखण्याची पद्धत तयार केली आहे. जे शिक्षक सुरुवातीस १०० % असर पातळी ओलांडतील ते early achievers असतील. या प्रक्रियेस management science मधील human behavior science चा भक्कम आधार आहे. अत: हि एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे.
  • ८) तात्त्विक आधार : थोड्या खोलात जावून विचार केल्यास प्रत्येक मनुष्य आनंदी राहू इच्छितो हे लक्षात येते. हे आपणास सुद्धा तपासाता येते. स्वतःला प्रश्न विचारल्यास “काय मी आनंदी राहू इच्छितो?” याचे उत्तर “होय” असेच मिळेल असा आपणास अंदाज येईल. अत: जगातील प्रत्येक माणूस आनंदी राहू इच्छितो हे मान्य करायला हरकत नाही.
  • कोणतेही कार्य करीत असतांना त्यात यश मिळाल्यास आनंदाची अनुभूती होते. हे प्रत्येक माणसाला लागू आहे. हे शिक्षक, शिक्षण विभागातील अधिकारी, IAS अधिकारी प्रत्येकाला लागू आहे. जेवढे शिक्षक असर च्या १००% पातळीपर्यंत पोहचतील त्या सर्व शिक्षकांना आनंद मिळणार आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी यांनी त्यांच्या आनंदाच्या गरजेबाबत बोलून संवाद साधल्यास अधिकाधिक शिक्षकांचा लवकरात लवकर सहभाग या प्रक्रियेत मिळणार आहे. म्हणजेच आपण कार्यान्वित करत असलेली प्रक्रिया आनंद वाढविण्याची प्रक्रिया आहे. संवादाची हि पद्धत अवलंबल्यास कोणत्याही कोपऱ्यातून विरोधाचा स्वर निघणार नाही. अतिरिक्त राशी शिवाय कार्य पुढे जाईल व टिकून राहण्याची शक्यता बळावेल.
  • ९) संविधानातील समानतेचा सिद्धांत – संविधानाच्या preamble मधेच समानतेचा उल्लेख आहे. परंतु कोणत्याही शाळेच्या कोणत्याही वर्गामध्ये १०० % मुले असर पातळीवर नाहीत. मग आपण संविधान राबविले आहे काय? प्रत्येक मुल इंजिनिअर,डॉक्टर किंवा IAS बनणार नाही हे मान्य परंतु प्रत्येक मुल वाचूही शकणार नाही हे मान्य नाही. समानतेच्या सिद्धांताचा उपयोजन केल्यास असेही दिसते.
    • एक शिक्षक १०० % मुलांना असर पातळीवर आणू शकत असेल तर इतरही शिक्षक आणू शकतात.
    • एका वर्गातील १०० % मुले शिकू शकतात तर इतर वर्गातील हि १०० % मुले शिकू शकतात.
    • एक आदिवासी मुल शिकू शकते तर इतर आदिवासी मुले हि शिकू शकतात.
    • या प्रमाणे, मुलांच्या शिक्षणातील ज्या ४०-५० अडचणी सर्वसामान्यपणे मोजल्या जातात त्यापैकी कोणत्याही अडचणीत असलेले एक मुल शिकू शकते तर त्याच अडचणीत असलेली इतर सर्व मुले शिकू शकतात.
  • १०) RTE ची खरं अंमलबजावणी: शिक्षण हक्क कायद्यात कोणत्याही मुलाला वगळले गेले नाही. कायद्याप्रमाणे १००% मुलांना शिक्षणाचा हक्क देण्यात आला आहे. १०० % असर पातळीवर पोहचल्यावर आपण १००%  मुलांना किमान मुलभूत पातळीचा अधिकार दिलेला असू.

  1. १०० % मुले शिकूच शकत नाहीत : इतिहास याचा पुरावा आहे. कोणत्याही बोर्डाचा निकाल १००% लागत नाही. लागला तर त्या बोर्डावर समाजाचा विश्वास संपेल. अत: काही मुलांचे न शिकू शकणे नैसर्गिक बाब आहे. परंतु शिक्षण हक्क कायद्यामध्ये कोणत्याही मुलाला वगळण्याचे प्रावधान नाही. वगळायचे झालेच तर कोणाच्या मुलाला वगळावे (हा माझा खोडसाळ पणाचा प्रश्न ) दलितांच्या ,गरिबांच्या, आदिवासींच्या ,CWSN कोणत्या मुलांना वगळावे. महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत एक दोन वर्षाच्या चर्चेनंतर सर्वाना मान्य झाले कि १०० % मुले शिकली पाहिजेत. परंतु अडचणी उभ्या होत्याच…
  2. मुले सतत गैरहजर असतात. मुले शाळेतच येत नाहीत तर शिकणार कसे . हे कारण  कोणालाही पटेल. प्रत्येक शाळेच्या प्रत्येक वर्गात १,२ मुले असे असतात. अर्थात ५ ते १० टक्के मुले शिक्षणापासून वंचित होणार वंचितांची मुले आहेत म्हणून नाही तर शाळेत येत नाहीत म्हणून वंचित. हि मुले शिकू शकतात हे खरे पण शाळेत येत नाहीत म्हणून शिकत नाहीत. रोजगाराच्या निमित्ताने स्थलांतरीत होणारी कुटुंब,भटक्या समाजाची मुले, डोंबारी समजाची मुले इत्यादी. या मुलांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणे शक्यच नाही. या प्रश्नांची सोडवणूक खूप खर्चिक किंवा व्यवहार्य नाही. मग या मुलांचे काय करावयाचे. महाराष्ट्रात अशा मुलांसाठी यशस्वी कार्य केलेले शिक्षकांचा शोध घेण्यात आला. त्या शिक्षकांना ‘बालरक्षक’ असे संबोधण्यात आले. नंतर इच्छुक शिक्षकांना प्रशिक्षण देवून ‘बालरक्षक चळवळ’ उभी करण्यात आली. प्रशिक्षणाचे मुद्दे होते- समता,मानवता,challenge (हे तुम्ही करू शकता),शासकीय योजनावरचे अवलंबित्व कमी करणे इत्यादी.
  3. नियमित मुलांपैकी सुद्धा काही मुलांना शिकविणे आमच्या आवाक्याबाहेर आहे. हि मुले CWSN म्हणून ओळखले गेलेले नसतात. परंतु उत्कृष्ट शिक्षकांचे शिकविणे सुद्धा या मुलांना शिकविण्यात यशस्वी होत नसते. हि मुले आमच्या उत्कृष्ट शिक्षकांना दाखवून देतात कि त्यांनी आपले कौशल्य अजून वाढविण्याची आवश्यकता आहे. या वर्षीच्या सर्व मुलांना शिकविण्यात यश आलाच तर पुढील वर्षी पुन्हा एखादे मुल येईल ज्याच्यासाठी आपल्या उत्कृष्ट शिक्षकांना नवीन काही तरी शिकावे लागणार. अत: शिक्षकांना फक्त शिक्षित प्रशिक्षित राहून चालत नाही तर सतत शिकावे लागते कारण कि प्रत्येक मुल ‘विशिष्ट’ असते.
  4. CWSN मुले : हि CWSN म्हणून ओळख पटलेली मुले आहेत. समग्र शिक्षा अभियानांतर्गत यासाठी व्यवस्था आहे. मात्र यश अजून हाती यावायचे आहे. मात्र हे काम प्रगती पथावर आहे.
  5. मागे राहिलेल्या मुलांना केंव्हा शिकवावे? हा मुद्दा फार मोठा आहे. या अडचणीचे कारणे बरीच आहेत:
    • एका वयाच्या मुलांना सोबत बसविण्याची आवश्यकता
    • वर्ग व्यवस्था असणे ज्याच्यात साधारणपणे एका वयाची मुले असतात.
    • एका वयाची मुले एका वर्गात बसत असले तरी प्रत्येक मुल वेगवेगळ्या पातळीवर असते  म्हणून प्रत्येक मुलाला शिकवताना वर्ग पद्धत किंवा बहुस्तर पद्धतीने शिकवायची आवश्यकता असते. शिक्षण शास्त्रात याची जाणीव असली तरी शिक्षकांना त्याच्यात  प्रविणता आणणे शक्य झालेले नाही. विकसित शिक्षण व्यवस्था जसे फिनलंड, इंगलंड इत्यादी ठिकाणी हि बऱ्यापैकी विकसित झाली आहे. भारत देश्यात अजून अधिकांश शिक्षक पाठ्यपुस्तकाचा वापर करून शिकवतात. त्यामुळे एकावेळी एक धडा शिकवावा  लागतो म्हणून वर्गातील प्रत्येक मुलाला एकाच पातळीवर समजून शिकवावे लागते . शिक्षकांना बहुस्तर अध्यापन न जमणे त्यात पर्यवेक्षकीय यंत्रणेकडून पाठ्यक्रम पूर्ण करण्याच्या नावाने पाठ्यपुस्तकातील धडे संपविण्यासाठी पाठपुरावा केले जाणे या दोन अडचणीतून १०० % मुलांना शिकणे भारत देशात तरी फार अवघड आहे.
    • प्रत्येक मुल विशिष्ट असते त्यामुळे एका वर्गातील सर्व मुले शिकण्याच्या एकाच पातळीवर राहणार नाही हा निसर्गदत्त नियम आहे.
    • भारत देशात मोठ्या प्रमाणवर शासकीय शाळा लहान म्हणजे ६० पेक्षा कमी पटाच्या आहेत. या शाळांमध्ये दोन किंवा तीन वर्गातील मुलांना एका शिक्षकास शिकवावे लागते. पाठ्यपुस्तक हे शिकविण्याचे एक मात्र साधन आहे असे गृहीत धरल्यामुले शिक्षकांना  बहुवर्ग अध्यापण जमत नाही. मुलांचे मागे राहण्याचे एक महत्वपूर्ण कारण हे हि आहे. हे जर कारण असले तर त्याचे  निदान याच व्यवस्थेत शोधणे तरी अशक्य आहे. खरे म्हणायचे झाल्यास शिक्षकांना बहुस्तर अध्यापन जमत असल्यास बहुवार्ग अध्यापन त्याचा उपसम्मुचय आहे. त्यामुळे ती समस्या नाहीच. शिक्षण तंत्र तेवढे विकसित आहेच. भारत देशात शिक्षकांमध्ये बहुस्तर अध्यापन कौशल्य वाढविण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणवर हाती घ्यावयाची आवश्यकता आहे. त्यावर अजून देशाचे लक्ष गेलेले नाही.
    • बहुस्तर अध्यापनाचे कौशल्य प्राप्त करण्याकरिता प्रथमता पाठ्यपुस्तक सोडावे लागेल. तरी प्रत्येक शिक्षकाला अभ्यासक्रम दिला जाईल व त्याच्यातून शिक्षक पाठ्यक्रम तयार करेल. विविध साहित्य तयार करेल आणि शिकवेल. या प्रमाणे केल्यास म्हणजे शिक्षकाला वर्तनवाद सोडून ज्ञानरचनावादामध्ये शिरावे लागणार. शिक्षण हक्क कायदा तसेच NCF २००५ मध्ये याची आवश्यकता स्पष्ट केली गेली असताना शिक्षकामध्ये ते रुजविणे शक्य झाले नाही. देशाच्या शिक्षकामध्ये एक मोठ्या विचार परीवार्तांणाची चळवळ उभी करण्याची आवश्यकता आहे.
    • प्रशासक आणि धोरणकर्त्याचे याकडे लक्ष गेले नसावे किंवा शिक्षकांचे विचार परिवर्तन त्यांना अशक्य वाटत असावे. म्हणून मागे राहणाऱ्या मुलांना शिकविण्यासाठी शिक्षकांनी शाळा सुरु होण्यापुर्वी किंवा शाळा सुटल्यानंतर थांबवून शिकवावे अशी सूचना केली जाते. याचा शिक्षक विरोध करतात आणि मग परिस्थिती जैसे थेच राहते.
    • याला तोड म्हणून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षकांच्या मदतीकरिता इतर माणसे दण्याचे सुचविण्यात आले आहे. त्यासाठी दोन कार्यक्रम राष्ट्रीय ट्युटरशीप  कार्यक्रम (national tutorship programme ) व RIAP ज्याच्यात समाजातील लोकांना मागे राहणाऱ्या मुलांना शिकाविण्याचे कार्य दिल्या जाईल. नविन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी पर्यंत काय करावे हा प्रश्न उभा राहतो.
    • नवीन शैक्षणिक धोरणामध्ये peer learning चाही उल्लेख आहे. अर्थाथ गट पद्धतीने त्याच वर्गातील विविध पातळीवरील मुलांनी एकमेकाकाडून शिकणे व शिक्षकांनी फक्त मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारणे या पद्धतीत पाठ्यपुस्तक बाजूला ठेवावे लागते तसेच वर्तनवादी विचारधारा सोडावी लागते.
    • महाराष्ट्रात वाबळेवाडी शाळा (ता.शिरूर जिल्हा.पुणे ) या आंतरराष्ट्रीय शाळेने (मराठी माध्यमाची शासकीय शाळा ) peer learning ची परिभाषा बदलवीलेली आहे. येथे मुलांना स्वतःचा पाठ्यक्रम लवकर पूर्ण करण्यासाठी आव्हान दिले जाते. सुरवातीस काही विद्यार्थी आपला पाठ्यक्रम पूर्ण करतात मग या विद्यार्थ्यांच्या साहाय्याने  इतर विद्यार्थ्यांचा पाठ्यक्रम पूर्ण केल्या जातो. सर्व विद्यार्थ्यांचे पाठ्यक्रम तीन महिन्यात पूर्ण होतात. मुले स्वतः शिकत असल्यामुळे त्यांच्या शिकण्याच्या गतीत प्रचंड वाढ होते. याच प्रक्रियेच्या जोडीला शाळेने ‘विषयमित्र’ योजना पण राबविली आहे. यात मुले शाळेत आणि शाळेबाहेर सुद्धा आपल्या विषय मित्राकडून मदत घेवू शकतात. व आलेल्या शंका विचारू शकतात त्यामुळे जिज्ञासा असलेली मुले मागे राहू शकत नाहीत. शिक्षणशास्त्रा प्रमाणे प्रत्येक मुल जिज्ञासू असतेच. अशी प्रक्रिया राबविणाऱ्या शिक्षकांचा मुलांच्या निसर्गदत्त शिकण्याच्या क्षमतेवर प्रचंड विश्वास असावा लागतो. हे शिक्षक वर्तनवादी असू शकत नाहीत तसेच पाठ्यपुस्तकावर अवलंबून राहणाऱ्या शिक्षकाना हे जमणे शक्यच नाही. कारण कि शासनाने दिलेले पाठ्यक्रम तीन महिन्यात पूर्ण होत असेल तर पुढील सात महिन्याचे पाठ्यक्रम शिक्षक किंवा शाळेलाच तयार करावा लागतो  या देशाला त्या पातळीचे शिक्षक तयार करण्याची आवश्यकता आहे.
    • वरील प्रकारचे peer learning  प्रकल्पावर आधारित शिक्षण( project based learning) ची जोड दिली की शिक्षक, शाळा आणि सर्व विद्यार्थी वर्गपद्धती , पाठ्यपुस्तक तसेच शासनमान्य पाठ्यक्रमाच्या पुढे निघून जातात. तेंव्हा भविष्याची (future ready ) मुले तयार होतात. हि अवस्था असर १०० % किंवा NAS च्या हि पलीकडे असते.

        वरीलपैकी शिक्षण प्रक्रिया शिक्षकांना पटल्यास ते राबवू शकतात. या पातळीवरील कार्यास सुरवात करणे.त्यातील सर्वाना पटेल अशी शिक्षण प्रक्रिया खाली दिलेल्या आहेत.

  1. विषय मित्र (peer learning )
  2. मुलांना आव्हान देणे.
  3. मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे.
  4. मुलांच्या जिज्ञासू वृतीचा सन्मान करणे.
  5. इंग्रजी शिकण्यासाठी प्रक्रिया राबविणे.
  6. भविष्यात येणाऱ्या तंत्राबाबत शिकण्यास संधी उपलब्ध करून देणे.
  7. पर्यावरण विषयीचे शिक्षण ‘प्रत्येक्ष जगणे’ याच्यातून करणे.
  8. Syllabus एक तृतीयांश वेळेत पूर्ण करणे.
  9. Syllabus लवकर संपल्याने उपलब्ध झालेल्या वेळेचा उपयोग syllabus बाहेरील परंतु जीवनावश्यक शिकण्यासाठी वापरणे.
  10. जगातील व देशांतील इतर भाषा शिकण्याची संधी उपलब्ध करून देणे.
  11. शहरामधील व इतर देशातील शाळेसोबत partnership करणे.
  12. क्रीडा साठी मुलांना संधी उपलब्ध करून देणे.
  13. संगीत,नाट्य व विविध कला शिकण्याची व व्यक्त होण्याची संधी उपलब्ध करून देणे.
  14. पुढील वर्गाचा syllabus शिकण्याची संधी उपलब्ध करून देणे.
  15. विविध प्रतियोगिता परीक्षेची तयारी करून घेणे.
  • मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे : यात शिक्षकांनी मुलांना सांगावे कि पाठ्यपुस्तकाचे विविध धडे ते स्वतः अभ्यास करून शिकू शकतात. त्यासाठी शिक्षकाच्या मार्गदर्शनाची आवश्यकता नाही. तथापि काही अडचण आल्यास शिक्षक मदतीला आहेत. मात्र प्रथम प्रयत्न मुलांचेच असले पाहिजे.
    • अशाने काही मुले स्वतः स्वतः अभ्यास करून पुढे जायला लागतील. आतापर्यंत मुलांना असी सवय नसल्यामुळे काही दिवस ते चाचपडतील .परंतु शिक्षकाने योग्य प्रोस्ताहन दिल्यास ती मुले स्वशिक्षण करायला लागतील.
  • मुलांना challenge देणे : एकदा मुल स्वतः शिकायला लागले की त्यांना त्यांची गती वाढविण्यास प्रोस्ताहन देणे. शिक्षकांनी यासाठी मुलांना प्रोत्साहनात्मक challenge द्यावे.
  • विषय मित्र योजना (peer learning ) : आतापर्यंतच्या peer learning च्या संकल्पनेपेक्षा विषय मित्र योजना थोडी वेगळी आहे. Peer learning मध्ये मुले गटात बसून शिकणे अपेक्षित होते. विषयमित्र योजनेत मुले गरज पडल्यावर वर्गाध्यापन सुद्धा करतात.तसेच मुलांना मार्गदर्शना करिता ते 24 *७ उपलब्ध असतात. विषय मित्र योजनेमुळे मुले विषय मित्रांना हवे तेंव्हा आणि हव्या तेवढ्या वेळा शंका विचारू शकतात. शिक्षकांसोबत साधारण पणे एवढे स्वातंत्र उपलब्ध नसते.
    • शिक्षण प्रक्रियेतील या तीन बाबी राबविल्या गेल्यास १०० % असर पातळीवर पोहचणे सोपे जाईल.शाळेत नियमित न राहू शकणाऱ्या मुलांना सुद्धा विषय मित्र योजनेमुळे असर पातळीवर आणणे शक्य होईल.
  1. अध्ययन स्तर : वेगवेगळ्या मुलांचे ‘असर’ प्रमाणे वेगवेगळ्या स्तराचे monitoring करणे. जिल्हा /तालुका प्रशासनाचे dash board वर ते येवू शकते. google sheet च्या माध्यामतून हे करणे शक्य होते. महाराष्ट्रात शिक्षकांनी असे google sheet तयार केले व संपूर्ण यंत्रणेने यात periodically dada feed केला . यासाठी वेगवेगळ्या  computer programme  ची गरज भाषत नाही.
  2. प्रक्रिया : प्रत्येक शाळेने १) इयात्तानुसार मार्गदर्शन करणारी मुले २) मुलांच्या मार्गदर्शना शिवाय शिकणारी मुले ३) मुलांच्या मार्गदर्शनाखाली शिकणारी मुलांची टक्केवारी सुद्धा द्यावी.