FAQ भविष्यवेधी शिक्षणाची पहिली पायरी – मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे

प्रश्न : मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करताना अशा कोणकोणत्या धारणा आहेत त्या अडचणीच्या ठरतात? पूर्वापार चालत आलेल्या धारणा कशाप्रकारे मोडीत काढता येतील?
प्रश्न: शिक्षक म्हणून मी पोटतिडकीने शिकवतो,सराव करून घेतो,परीक्षा घेतो,परीक्षेत नाही आले तर पुन्हाउपचारात्मक अध्यापन वर्ग चालवतो. एव्हढा सारा खटाटोप करूनही मुलांना येत नाही. म्हणजेच मी शिकवूनही 100% मुले शिकत नाहीत तर ते स्वतः कसे शिकतील. 
प्रश्न:एखादा सोपा घटक किवा अश्या बाबी ज्याबद्दल मुलांना पूर्वज्ञान आहे अश्या बाबी स्वतः शिकता येतील पण अपरीचीत बाबी स्वतः  शिकणे अवघड आहे
प्रश्न:वयाने मोठी असलेली मुले  ज्यांना लेखन वाचन कौशल्ये अवगत आहेत ती स्वतः शिकू शकतील परंतु लेखन वाचन क्रिया अवगत नसलेली लहान वयोगटातील मुले स्वतः शिकू शकणार नाहीत.
प्रश्न: जसजसा वर्ग वाढत जातो तश्या कठीण संकल्पना अभ्यासक्रमात समाविष्ट असतात ज्या मुलांनी स्वतः शिकणे अवघड वाटते. बीजगणित,भूमितीसारख्या विषयातील क्लिष्ट संकल्पना शिक्षकाच्या स्पष्टीकरणाशिवाय शिकणे शक्य नाही.
प्रश्न: एखादा पाठ्यांश मुलांना स्वतः शिकण्यास सांगतो तेव्हा मुलांना लागणारा वेळ देण्याची तयारी नसते?
प्रश्न:शिक्षक म्हणून शिकवण्याच्या हौसेवर नियंत्रण कसे मिळवावे?
प्रश्न: वर्गातील काही मुले आव्हाने स्वीकारण्यास कंटाळा करतात अश्या वेळी लक्षात येते कि त्यांना स्वतः शिकण्यास प्रेरित करता आले नाही हि अडचण कशी सोडवता येईल?
प्रश्न: तुम्ही शिकवा तुम्ही शिकलेले लवकर समजते असे म्हणत मुले शिकवण्याचा आग्रह धरतात अशा वेळी काय करता येईल?
प्रश्न: स्वतः शिकण्यासाठीची नैसर्गिक  प्रेरणा कशी जागृत करावी?
प्रश्न: मी  मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करत आहे,मुलांना सोपी सोपी आव्हाने देत आहे हे होत असताना मुलं एकमेकांशी बोलतात खूप गोंधळ होत आहे असे वाटते.सहकारी शिक्षक देखील तक्रार करतात कि तुमच्याच वर्गात फार गोंधळ चालतो अशा वेळी मी काय करावे?
प्रश्न: मुले शिकण्यात तेव्हा प्रेरित होतात जेव्हा ते प्रत्येक बाब,कृती स्वतः करून पाहतात.स्वतः शिकण्यासाठी वर्गात पुरेसे शैक्षणिक साहित्य असावे असे वाटते.अपुऱ्या साधनांमुळे समस्या निर्माण होतात?
प्रश्न: मूल स्वतः शिकेल तेव्हा शिक्षकाचे महत्व कमी होईल असे वाटते?

प्रश्न : पारंपारिक शिक्षण प्रणालीत मुलांना गृहपाठ देण्याची सवय असते आता भविष्यवेधी शिक्षण प्रणालीनुसार आव्हाने द्यायची आहेत हे करत असताना गृहपाठ आणि आव्हाने यातील शास्त्रीय बाबी शिक्षक म्हणून  समजून घेणे का गरजेचे आहे?
प्रश्न: मुलांना गृहपाठ कडून आव्हानांकडे घेऊन जाताना सवय कशी लावावी? काही मुलांना आव्हान पूर्ण करण्यापेक्षा गृहपाठ करणे सोपे वाटते?
प्रश्न: आव्हाने पूर्ण करताना वर्गातील काही मुलांमध्ये आत्मविश्वास फारच कमी जाणवतो या अडचणीवर कशी मात करता येईल?
प्रश्न: सततच्या आव्हानाने विद्यार्थ्यांना कंटाळा येतो तर  मुले कंटाळू नये यासाठी काय करता येईल?
प्रश्न: आव्हानांमध्ये नाविन्यता आणि सातत्य कसे राहील?
प्रश्न: विविध  बुद्धिमत्तेनुसार  आव्हान आपल्याला कसे देता येईल?वेगवेगळ्या बुद्धिमत्ता असणाऱ्या मुलांना आव्हाने देत असताना वेगवेगळी आव्हाने द्यावी लागणार आहे ती आव्हाने देण्यासाठी नियोजन कसे करावे?
  1. भाषिक बुद्धिमत्ता
  2. तार्किक बुद्धिमत्ता
  3. अवकाशीय बुद्धिमत्ता
  4. वैयक्तिक बुद्धिमत्ता
  5. आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता
  6. शरीरस्नायुविषयक बुद्धिमत्ता
  7. सांगीतिक बुद्धिमत्ता
  8. अस्तित्वनिष्ठ बुद्धिमत्ता
  9. नैसर्गिक बुद्धिमत्ता
प्रश्न:शिकण्याच्या प्रक्रियेत आव्हान देत असताना शिक्षक म्हणून काय काळजी घेणे गरजेचे आहे?
  1. आव्हान स्वीकारण्यास प्रेरित करणे तशी तयारी आणि वृत्ती मुलांमध्ये निर्माण करणे –आव्हान या बाबीवर मुलांसोबत काम करत असताना मुलांचे वर्गात ,वर्गाबाहेरील वर्तन ,त्यांच्या सवयी याकडे लक्ष देऊन विश्लेषण करणे तसेच मुलांना प्रेरित करून आव्हान स्वीकारण्याची सवय लावणे,सकारात्मक संवादातून तू हे करू शकतेस/शकतोस या माध्यमातून मुलांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे.सुरवातीला अगदी सोपी सोपी आव्हाने देत मुलांना गोडी लावणे महत्वाचे आहे.
  2. स्व: प्रयत्नांचा आनंद त्याची जाणीव करून देणे – एखादी बाब दुसरा शिकवतो तेव्हा आणि आपण स्वतः करतो यात नेमका फरक काय आहे?कोणती बाब करताना आनंद होतो? हे शोधणे ते मुलांसमोर मांडणे गरजेचे आहे.शिकण्याच्या प्रक्रियेत मुलास स्वप्रयत्नाने मिळवलेला आनंद अधिक प्रेरणादायी ठरतो.असा आनंद ते आव्हानांच्या माध्यमातून शोधू लागतात.कालांतराने छोट्या छोट्या आव्हानातून आनंद मिळवत मोठमोठी आव्हाने सुद्धा सहजपणे पूर्ण करू शकतात. शिक्षकांनी हा स्व प्रयत्नांचा आनंद किती मोठा असतो याची जाणीव करून द्यावी.
  3. नाविन्यपूर्ण गोष्टी आणि सातत्यता – मुलांना सतत काहीतरी नवीन हवे असते,सतत एकाच प्रकारची,एकाच विषयाची आव्हाने देत गेले तर ते कंटाळतात शिकण्यात तोचतोच पणा येतो हे टाळण्यासाठी आव्हानामध्ये नाविन्यता असायला हवी, आभ्यासाबरोबरच अभ्यासाव्यतिरिक्त देखील आव्हाने द्यायला हवीत.आव्हाने देण्यात नाविन्यतेसोबत सातत्य ठेवणे देखील गरजेचे आहे.
  4. खेळ आणि व्यायाम– आपण जितका प्राणवायू आपल्या शरीरात घेतो त्यापैकी एकट्या मेंदूला 20% एव्हढा प्राणवायू लागतो त्यामुळे मुलांना खेळातून शिकणे आणि त्यास व्यायामाची जोड देणे आवश्यक आहे. यासाठी खेळ आणि व्यायाम यांचे रुपांतर आव्हानात करणे आणि मुलांकडून ते आव्हान पूर्ण व्हावे यासाठी सातत्याने मदत पुरवणे हे अतिशय महत्वाचे आहे.
  5. विविधता– आपण जी आव्हाने देत आहोत त्यात विविधता आणने हे कौशल्याचे काम आहे.आव्हानांमध्ये विविधता आणल्यास मेंदूची विविध कार्यक्षेत्रे सतर्क राहून बालकांचा सर्वांगीण विकास घडून येतो.यासाठी फक्त अभ्यासच नव्हे तर कला, क्रीडा, साहित्य, रसास्वाद. मनोरंजन वाचन इत्यादी अनेक छंदास अनुसरून आव्हाने देता येतील आणि आव्हानात विविधता आणता येईल.
  6. नित्यक्रमास फाटा देणे– मुलांना तोचतोचपणा,त्याच त्या कृती नकोश्या वाटतात परिणामी नकारात्मकता वाढीस लागते उदा.पाठ्पुस्तकातील धडा जसाच्या तसा वहीत  उतरवणे,पाठांतर करणे,पुन्हा पुन्हा एकाच प्रकारची गणिते सोडवणे, कडक शिस्त लादणे अशा बाबी त्यांना नकोश्या वाटतात. कारण त्यामध्ये आव्हान शून्य असते.डोक्याला चालना मिळत नाही अश्या वेळी. कृतीत बदल करणे,नित्यक्रमास फाटा देणे गरजेचे आहे.
  7. मुलांच्या मागणीकडे लक्ष देणे– बहुतांशी वेळा आपण आव्हान देतांना मुलांच्या मागणीकडे लक्ष देत नाही व आपणास हवे ती आव्हाने मुलांना देत असतो.मारत हे करत असताना, मुलांना काय हवे आहे? याचा विचार केल्यास आव्हानांची पूर्तता किवा त्यापाठीमागील यशाची शंभर टक्के खात्री असते म्हणून आव्हान देताना मुलांची मागणी त्यांची आवड लक्षात घेणे याची काळजी आपण घ्यायला हवी.
  8. दैनंदिन अभ्यास आव्हानांशी जोडणे– दैनंदिन गृहपाठाचे रुपांतर आव्हानात केल्यास होणारा आनंद आणि मिळणारे परिणाम दुप्पट असतात यासाठी गृह पाठाचे रुपांतर आव्हानात करावे.
  9. विविध आव्हानांची यादी तयार करणे– शिक्षकांनी, पालकांनी, विषय मित्रांनी मुलांस /विध्यार्थ्यांस कोण-कोणती आव्हाने देता येतील? त्यांना काय हवे आहे? याचे चिंतन करून सुरवातीस सोपी नंतर मध्यम व सर्वात शेवटी कठीण आव्हाने देत गेल्यास मुलांची आव्हाने पेलण्याची क्षमता वाढीस लागते व शिकण्याची गती वाढते.
प्रश्न: विद्यार्थी संख्या जास्त असताना आव्हानावर काम कसे करावे?
प्रश्न: वर्गातील असर  स्तरातील मुले  आव्हान स्वीकारत नाहीत त्यांना कसे प्रेरित करावे?
प्रश्न: बऱ्याच वेळा आव्हान देणे हे शिक्षकासाठीच आव्हान होऊन बसते अश्या वेळी काय करावे?
प्रश्न: आव्हान जेव्हा देत असते तेव्हा वेळेचं नियोजन फार विस्कळीत होते अगदी म्हणजे एक तासाचा जर वेळ असेल तर तो वेळ पुरत नाही?
प्रश्न: शिक्षकाला दरवेळी तितक्याच कल्पकतेने दरवेळी तितक्या प्रभावीपणे वातावरण निर्मिती करता येणे आणि मुलांपर्यंत ते आव्हान  का महत्त्वाचे आहे आणि त्याचा मागचा उद्देश कम्युनिकेट  होतो  असं नाही? वातावरण निर्मिती कशी करता येईल?
प्रश्न: आव्हाने देत असताना 100%  विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही. तीनही स्तरातील मुलांना आव्हान देताना कसरत होते.
  1. वर्गातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना देता येतील अशी आव्हाने
  2. ASER स्तरातील विद्यार्थ्यांना देता येतील अशी आव्हाने
  3. NAS स्तरातील विद्यार्थ्यांना देता येतील अशी आव्हाने
  4. PISA स्तरातील विद्यार्थ्यांना देता येतील अशी आव्हाने
  1. वैयक्तिक पातळीवर द्यावयाची आव्हाने
  2. peer /जोडीमध्ये देता येतील अशी आव्हाने
  3. गटामध्ये द्यावयाची आव्हाने
प्रश्न: पिसा पातळीच्या मुलांमध्ये  काही वेळा नास च्या मुलांमध्ये सुद्धा आम्हीच आव्हान लवकर पूर्ण करतो असा अहम भाव निर्माण होतो असर पातळीच्या मुलांवर याचा परिणाम होऊ नये यासाठी काय करता येईल?
प्रश्न: शिक्षकांनी अध्ययन निष्पत्ती नुसार आव्हान कसे द्यावे?
प्रश्न:विद्यार्थ्यांच्या गतीनुसार कोणती आव्हाने द्यावीत
प्रश्न: मुलांच्या आवडीनुसार आव्हाने  कशी द्यायची?
प्रश्न: PISA स्तरातील जी मुलं आहेत त्यांची आव्हान मध्ये रुची कमी दिसते. त्यांची शिकण्याची गती जास्त असल्यामुळे त्यांना कुठेतरी आव्हानांच्या  या कृतीमध्ये खूप वेळ जातोय, त्यांचा टाईमपास होतो असे त्यांना वाटते अश्या वेळी काय करता येईल?
प्रश्न: सोबतच्या सहकारी शिक्षकांना आव्हान देण्यासाठी कसे प्रेरित करावे?
  1. स्व:
  2. समाज
  3. भौतिक सुविधा
  4. प्रशासन
प्रश्न:आव्हान दिल्यानंतर त्याची लेखी स्वरूपात त्याच्या लेखी नोंदी कशा ठेवायच्या? लेखी रेकॉर्ड ठेवणे गरजेचे आहे का?
प्रश्न: माध्यमिक स्तरावर काम करताना तासिका नुसार अध्यापन करावे लागते, 35 मिनिटाच्या कालावधीत आव्हाने देणे या प्रक्रियेला न्याय कसा देता येईल?
प्रश्न: आपण मुलांना आव्हान देतो परंतु सर्व मुलांची आव्हाने तपासणे  शक्य होत नाही अश्या वेळी काय करावे?
प्रश्न: आव्हानामध्ये वेळेचे बंधन दिले तर मोजकेच मुले आव्हाने सोडवतात?
प्रश्न: आव्हान पूर्ण करणाऱ्या मुलांना वस्तूस्वरुपात बक्षीस देणे गरजेचे आहे का?
प्रश्न: आव्हान पूर्ण न करणाऱ्या मुलांना कसे प्रेरित करावे? अशा मुलांशी कसा संवाद साधावा?
प्रश्न: एक शिक्षक free नुसार काम  करतो  आणि दुसरा पारंपारीक तेव्हा काय करता येईल?
प्रश्न: आव्हान पूर्ण करताना मोजकीच  मुले पुढे येतात. बाकीचे मुलं त्यांची कॉपी करतात हि अडचण जाणवते?
प्रश्न:  दररोज आव्हाने आवश्यक आहे का?

भविष्यवेधी शिक्षणाची तिसरी पायरी – Learning Interventions

प्रश्न:सर्वसाधारण पणे peer मध्ये मुलांसोबत काम करताना peer learning म्हणजे एका हुशार मुलान्रे अभ्यासात मागे असलेल्या मुलाला शिकवणे असा अर्थ घेतला जातो त्यातून पुढे समस्या निर्माण होतात peer learning संकल्पना नेमकी कशी समजून घ्यावी?
प्रश्न: मुलांना एकाच प्रकारच्या जोडीसोबत शिकणे कंटाळवाणे वाटते. काही कालावधीनंतर अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही यासाठी Peer learning मध्ये मुलांच्या जोड्या करताना वैविध्य कसे टिकवून ठेवता येईल?
  1. PISA स्तरातील दोन हुशार मुलांची जोडी
  2. NAS स्तरातील दोन मध्यम  मुलांची जोडी
  3. ASER स्तरातील दोन अध्ययन गती कमी असलेल्या मुलांची जोडी
  4. हुशार -मध्यम मुलांची जोडी PISA- NAS
  5. मध्यम –कमी गती असलेल्या मुलांची जोडी NAS –ASER
  6. हुशार- गती कमी असलेल्या मुलांची जोडी PISA-ASER
प्रश्न: मुलांच्या अध्ययन गतीनुसार जोड्या करताना कोणती काळजी घेतली जाणे  आवश्यक आहे?
प्रश्न: जोडीत अध्ययन करताना मित्र सहकार्य करत नाही, त्याला सांगूनही समजत नाही अश्या तक्रारी मुले करतात?
प्रश्न: मुलांच्या अध्ययन गतीनुरूप जोड्या केल्या परंतु आपल्याला/ शिक्षकांना अपेक्षित अध्ययन होत नाही या समस्येवर कशी मात करता येईल?
प्रश्न: जोडीत/गटात शिकताना जास्त वेळ अवधान केंद्रित राहत नाही, काही मुले सतत विचलित होत असतात?
  • मुलांच्या कृतीशिलतेला अधिक संधी मिळेल अश्या बाबी करवून घेणे.
  • सुरवातीला अधिक वेळ देऊन नंतर हळूहळू वेळ कमी करत जाणे.
  • मुलांना आवडतील अश्या कृती देणे.
  • आव्हान पूर्ण करण्यासाठी प्रेरित करणे.
  • वर्गातील इतर जोड्यांसोबत सकारात्मक स्पर्धा लावणे.
  • peer मध्ये बसण्याच्या जागा बदलत राहणे.
  • कृतीत बदल म्हणून खेळ,गाणी,गोष्टी यांचा शिकण्यात उपयोग करून घेणे.
प्रश्न: आपण ठरवून दिलेल्या जोडीनुसार काही जोड्यांमधील मुले सतत गैरहजर असतात आज माझी peer आलीच नाही मग मी काय करू? असे मुले म्हणतात. ही अडचण कशी सोडवावी?
प्रश्न:विषय मित्र म्हणून काम करण्यास मुले सहजासहजी तयार होत नाहीत?
  • मुलांशी सातत्याने सकारात्मक संवाद साधने.
  • विशिष्ट विषयाची आवड असणाऱ्या मुलांचा शोध घेणे.
  • अशा मुलांशी तुम्ही अभ्यासात इतर मित्रांना मदत करू शकतात हा आत्मविश्वास निर्माण करणे.
  • आपण इतरांना एखादी बाब समजावून सांगतो त्यातून आपले शिकणे अधिक होत असते हि बाब मुलांच्या निदर्शनास आणून देणे.
  • विषय मित्र म्हणजे शिकवणे नव्हे तर इतरांना शिकण्यासाठी मदत करणे हे मुलांच्या मनावर बिंबवणे.
  • विषयमित्र म्हणून जबाबदारी घेतल्यास शिक्षक त्यांचे काम आपल्याकडून करून घेतील हा गैरसमज दूर करणे.
  • मुलांना काम करण्याचे स्वातंत्र्य देणे.वर्गातील मुलांच्या शिकण्यातील अडचणी दूर करण्यासाठी काय करता येईल? तू कशी मदत करू शकतोस/शकतेस या माध्यमातून संवाद साधणे.
  • मुलांना दिवसभर त्याच कामात अडकवून न ठेवता त्यांच्या कलाने घ्यावे.
  • सुरवातीला सवय नसते म्हणून दिवसभरातील विशिष्ट वेळ विषयमित्र साठी राखीव ठेवावा. नंतर मुलांचा प्रतिसाद पाहून वेळ वाढवत न्यावा.
  • विषयमित्र म्हणून काम पाहिल्यामुळे अशा मुलांमध्ये 6c मोठ्या प्रमाणात वाढतात ते मुलांच्या लक्षात आणून देणे.
  • विषय मित्र म्हणून एखादा घटक समजून सांगण्यासाठी ,तयारीसाठी लागणारा वेळ उपलब्ध करून देणे
प्रश्न: मुले विषयमित्रांचे ऐकत नाहीत, सर किवा मेडम तुम्हीच सांगा असा आग्रह धरतात?
प्रश्न: विषयमित्र पारंपारिक पद्धतीने शिकवतात?
प्रश्न: विषय मित्रांबाबत अधिकार गाजवणे, शिक्षा करणे अशा तक्रारी वारंवार येतात यासाठी काय करता येईल?
प्रश्न: इतर मुलांबाबत विषयमित्र सारख्या तक्रारी करतात. माझे ऐकत नाहीत, प्रतिसाद देत नाहीत, वारंवार सांगितले तरी यांना येत नाही असे म्हणतात?
प्रश्न: विषयमित्रांचे पालक तक्रार करतात, शिक्षक त्यांचे काम आमच्या मुलांकडून करून घेतात असे म्हणतात अशा वेळी पालकांशी कसा संवाद साधावा?
प्रश्न: Group learning मध्ये मुलांची संख्या वाढवल्यास अपेक्षित परिणाम मिळत नाही?
प्रश्न: गट अध्ययनात विशिष्ट मुलेच पुढाकार घेतात, इतर मुले फारसा रस दाखवत नाहीत यासाठी काय करता येईल?
प्रश्न: मुले आणि मुली मिश्र गटात काम करताना लाजतात तसेच मुली मुलींचीच जोडी, गट करा असे म्हणतात.मुले देखील मुलांसोबतच शिकणे पसंत करतात आश्रम शाळेत काम करताना हि समस्या जास्त प्रमाणात जाणवतेय यासाठी काय करता येईल?
प्रश्न: विषय मित्र म्हणून काम करणाऱ्या मुलांना मुलांसोबत काम करणे जबाबदारीचे वाटते,काही वेळा त्यांच्या मनावर ताण जाणवतो तसे व्यक्त होतात. अशा मुलांसोबत कसा संवाद साधता येईल?
प्रश्न: peer group शिक्षकांनी बनवावे कि मुलांनी तयार करणे अपेक्षित आहे?
प्रश्न: group मध्ये मुले आपापसात बोलत नाहीत अश्या वेळी काय करावे?
प्रश्न: विषय मित्र यांनी मदत करूनही  गटातील काही मुलांना समजले नाही असे निदर्शनास येते अशा वेळी काय करता येईल?
प्रश्न: वर्गातील हुशार मुलेच विषयमित्र म्हणून पुढे येतात इतर मुले पुढे यावी यासाठी काय करता येईल?

भविष्यवेधी शिक्षणाची चौथी पायरी – मुलांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करणे.

प्रश्न: मुलांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करणे म्हणजे नेमके काय करणे अपेक्षित आहे? मुलांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करताना कोणकोणत्या बाबी करणे अपेक्षित आहे?
  • तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे मी लगेच उत्तर दिले असते तर काय झाले असते? असे विचारप्रेरीत करून चर्चा करणे.
  • दैनंदिन जीवनात मुलांना पडणाऱ्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यास, प्रश्न विचारण्यास प्रेरित करणे.
  • मुलांनी विचारलेल्या प्रश्नाबाबत त्याचे कौतुक करणे उदा. अरे व्वा ! तू किती छान विचार करतोस/करतेस.
  • प्रश्न विचारणे हि कृती कौतुकास्पद आहे हे आपल्या वर्तनातून मुलांना जाणवून देणे.
  • विचारलेल्या प्रश्नांचे रेडीमेड किवा त्वरित उत्तर देणे टाळावे.
  • मुलांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आधी त्याला शोधण्यास प्रोत्साहित करणे.
  • मुले उत्तर शोधत असताना शिक्षकांनी सोबत असावे.
  • अपेक्षित उत्तरासाठी विद्यार्थ्यांना माहितीचे स्त्रोत पुरवणे.
  • विशिष्ट कालावधी नंतर मुलांनी विचारलेल्या प्रश्नांवर चर्चा करणे.
  • मुलांनी केलेले प्रयत्न जाणून घेणे.त्याचे कौतुक करणे.
  • अपेक्षित उत्तराबाबत जोडणे अपेक्षित असलेले जोडणे म्हणजेच माहितीत भर घालणे.
  • अपेक्षित उत्तरापर्यंत पोचल्यानंतर मुलांनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांचे शिकणे किती मोठ्या प्रमाणावर झाले हे निदर्शनास आणून देणे.
प्रश्न: मुले शिक्षकांना प्रश्न विचारणे टाळतात या अडचणीवर काय मार्ग असू शकतो?

अनुभवाच्या आधारावर आपल्याला ज्या शंका आहेत त्याचे समाधान शिक्षकांकडून होणार नाही असा मुलांच्या मनात विश्वास असणे.

शिक्षकांशी सहज संवाद करण्याची सवय आणि तसे वातावरण नसणे.

शिक्षकांना आपण विचारलेल्या प्रश्नात काही रस नाही अशी धारणा तयार झालेली असणे.

शिक्षकांशिवाय प्रश्नांची उत्तरे शोधू शकतो असा अहंभाव असणे.

शिक्षकांबद्दल भीती वाटणे.

दुर्लक्ष करण्याची व चालढकल करण्याची सवय असणे.बघू कधीतरी नंतर विचारू असा विचार करणे.

चौकटीच्या बाहेरचा विचार करण्याची सवय किवा तशी वृत्ती नसणे.

स्वतः ची जिज्ञासा शमवण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेणे.

काही बाबी शिक्षकांबाबत….

मुलांसोबत जिव्हाळ्याचे तसेच मैत्रीपूर्ण संबंध नसणे.

शिकवणे एके शिकवणे यापलीकडे विचार न करणे.

अवांतर चर्चा ,संवादाची आवड नसणे.

स्वभाव उदा.एखादा शिक्षक/शिक्षिका खूप तापट स्वभावाचे असले तर प्रश्नच काय मुले त्यांच्याजवळ फिरकणे देखील टाळतात.

मुलांनी प्रश्न विचारल्यास त्याचे योग्य उत्तर देता न येणे किवा विचारलेल्या शंकेचे समाधान न करू शकणे.

मुलांनी विचारलेले प्रश्न निरर्थक आहेत किवा असतात असे वाटणे.शारीरिक हावभावातून तसे प्रकट करणे.

मी शिक्षक आहे तुम्ही विद्यार्थी आहेत शिकवतो तेवढे शिकून घ्या.मला प्रश्न विचारतात का? असा अहंभाव निर्माण होणे.

नेमून दिलेले काम चौकटीत राहून करणे,अवांतर बाबींमध्ये आवड किवा रुची नसणे.

वर दिलेल्या  देखील इतर करणे असू शकतात शिक्षकांनी आपल्याला लागू असलेल्या कारणांचा शोध घ्यावा व तशा उपाययोजना कराव्यात.

प्रश्न: मुले व्यक्त होत नाहीत म्हणून यांच्या मनात नेमके काय चाललेय हे समजत नाही अशा वेळी काय करता येईल? मुले बोलणारच नाहीत तर त्यांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान कसा करता येईल?

मुलांची कौटुंबिक,सामाजिक,सांस्कृतिक पार्श्वभूमी जाणून घेणे. शहरी भागातील मुलांच्या तुलनेत ग्रामीण भागातील मुलांमध्ये बुजरेपणा आढळतो.

पूर्वप्राथमिक वयोगटापासूनच मुलांचे संवाद कौशल्य विकसित करण्यावर भर द्यावा.

शिक्षकांनी मुलांशी जास्तीत जास्त बोलावे,शब्दसंग्रह वृद्धिंगत करावा.

मुलांना निर्भय बनवावे,त्यांच्यातील आत्मविश्वास वाढीस लावणारे उपक्रम हाती घ्यावेत.

शिक्षक विद्यार्थी यांचे नाते मैत्रीपूर्ण होण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात.

पाठ्क्रमाव्यातिरिक्त गप्पांचा तास असे अनौपचारिक कार्यक्रम हाती घ्यावेत.

मुलांना भरपूर चुका करण्याच्या संधी द्याव्यात.

प्रत्येक मूल विशेष आहे त्याच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा आदर आणि स्वीकार व्हावा.

शाळेतील वातावरण सहज ,अनौपचारिक असे असावे.

शाळा या समूहाकडून प्रत्येक मूल शाळा आणि शिक्षकांसाठी महत्वाचे आहे हे मुलांच्या लहानपणपासून निदर्शनास आणून द्यावे.

प्रत्येक मुलाशी वैयक्तिक ,सामुहिक संवाद साधावा त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात.

काही मुले नेहमीच अबोल राहत असल्यास त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधावा.त्यांच्या अश्या वागण्यात काही कौटुंबिक करणे जबाबदार आहेत का याचा शोध घ्यावा.

प्रश्न: मुलांना हल्ली प्रश्नच पडत नाहीत असे वाटते. या समस्येवर कशी मात करता येईल? याचे कारण काय असेल आणि उपाययोजना काय करता येतील?

    स्क्रीन टाइममध्ये वाढ झाल्यामुळे मुलांच्या प्रत्यक्ष संवाद आणि निरीक्षणाच्या संधी कमी होतात.

   त्यांना त्वरित समाधान मिळते, ज्यामुळे ते विचार करणे आणि प्रश्न विचारणे कमी करतात.

2. शिक्षण पद्धतीचे स्वरूप:

   काही शैक्षणिक पद्धतींमध्ये फक्त पाठांतरावर भर दिला जातो, ज्यामुळे मुलांच्या सर्जनशीलतेला वाव मिळत नाही.

   मुलांना प्रश्न विचारण्याची संधी दिली जात नाही किंवा त्यांना स्वातंत्र्य दिले जात नाही.

3. पालक आणि शिक्षकांचा प्रतिसाद:

    मुलांच्या प्रश्नांना पुरेसे महत्त्व न दिल्यास किंवा त्वरित उत्तर देऊन त्यांचे कुतूहल संपवले जाते.

   मुलांना प्रश्न विचारताना हसले जाऊ शकते किंवा त्यांच्या प्रश्नांना गृहित धरले जाते.

4. अतिरेकी मार्गदर्शन आणि संरक्षकता:

   मुलांना सर्व गोष्टींची तयारी आणि सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांची स्वतःहून शोध घेण्याची प्रवृत्ती कमी होते.

   त्यांना स्वातंत्र्य दिले जात नाही.

शिक्षक पालक मित्रानो जर आपली मुले प्रश्न विचारात नसतील तर वरील कारणांवर गंभीरपणे विचार करूया.

आता हि समस्या निर्माण होऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येतील हे समजून घेऊ.

उपाय:

1. तंत्रज्ञानाचा नियंत्रित वापर:

   – मुलांच्या स्क्रीन टाइमवर मर्यादा आणणे  आणि त्यांना प्रत्यक्ष खेळ आणि संवादासाठी वेळ द्यावा .

   – तंत्रज्ञानाचा सर्जनशील वापर कसा करायचा हे  मुलांना शिकवा, जसे की शैक्षणिक अॅप्स, ऑनलाइन संशोधन इ.

2. शैक्षणिक पद्धतीत बदल:

   – शाळांमध्ये मुलांना स्वतंत्र विचार करण्यास प्रोत्साहित करणारी शिक्षण पद्धती अवलंबणे महत्वाचे आहे यासाठी भविष्यवेधी शिक्षण पद्धतीचा अंगीकार करावा लागेल .

   – शाळा आणि कुटुंबात मुलांच्या  कुतूहल आणि सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी प्रकल्प, प्रयोग, आणि सहकार्यात्मक शिक्षणाचे आयोजन करणे.

3. प्रोत्साहन आणि समर्थन:

   – मुलांनी प्रश्न विचारल्यास त्यांचे कौतुक करावे  आणि त्यांना उत्तरे शोधण्यासाठी प्रोत्साहित करावे .

   – त्यांना उत्तरे कशी शोधायची याबद्दल मार्गदर्शन करणे  आणि  आपल्या प्रश्नांची उत्तरे स्वतः शोधण्याची प्रक्रिया शिकवणे.

4. स्वातंत्र्य आणि स्वावलंबन:

   – मुलांना स्वातंत्र्य द्यावे. आणि त्यांना स्वतःचे निर्णय घेण्याची संधी देणे हि बाब कटाक्षाने पालन करणे आवश्यक आहे .

   – मुलांना त्यांच्या  समस्या सोडवण्यासाठी शाळेत तसे कुटुंबात  विविध साधने उपलब्ध करून देणे.

5. समूह चर्चा आणि कार्यशाळा:

   – मुलांना एकत्रितपणे विचारविनिमय करण्यासाठी आणि प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित करणे .

   – शाळेत आणि घरी नियमितपणे समूह चर्चा आणि कार्यशाळांचे आयोजन करणे .

6. सृजनशील उपक्रम:

   – मुलांना सृजनशील उपक्रमांमध्ये सहभागी करावे  जसे की चित्रकला, संगीत, शैक्षणिक खेळ, वाचन, आणि विज्ञानाचे प्रयोग. यांचे आयोजन करावे.

   मुलांना  त्यांच्या आवडीच्या क्षेत्रांमध्ये शोध आणि संशोधन करण्यासाठी प्रोत्साहित करावे. त्यांच्यातील विशेष गुणांची ओळख करून देणे.

7. चुका आणि शिकणे:

   – मुलांना चुकांमधून शिकण्याची संधी द्यावी आणि चुकणे हि बाब चांगली असते कारण चुकले नाही तर शिकणे होणार नाही हे मुलांना लहानपणीच समजावून देणे.चुकणे वाईट नाही.काहीच न करणे वाईट असते या बाबी मुलाच्या मनावर बिंबवणे.

प्रश्न: मुलांच्या कौटुंबिक वातावरणाचा मुलांच्या वर्तनावर एकंदरीत व्यक्तिमत्वावर फार मोठा प्रभाव असतो, मुलांच्या भावविश्वाचा कसा स्वीकार करावा?

मुलांच्या वर्तनावर आणि एकंदरीत व्यक्तिमत्वावर त्यांच्या कौटुंबिक वातावरणाचा खूप मोठा प्रभाव असतो. त्यांचे भावविश्व समजून घेण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी खालील काही महत्त्वपूर्ण बाबी  आपल्याला शिक्षक आणि पालक म्हणून लक्षात ठेवाव्यात लागतील.

1. सकारात्मक संवाद:

   मुलांसोबत खुल्या आणि सकारात्मक संवाद साधावा . त्यांचे विचार, भावना, आणि प्रश्न ऐकावेत  आणि त्यांना महत्त्व द्यावे .

2. प्रेम आणि आधार:

   मुलांना आपल्या प्रेमाची आणि आधाराची जाणीव करून द्यावी . त्यांच्या योग्य कृतींचे  नेहमी समर्थन करावे  आणि त्यांच्या यशाचं कौतुक करावे.प्रसंगी चुका झाल्याच तर त्यावर संयमाने मार्ग काढावा. नकारात्मकता टाळावी.

3. सन्मान आणि आदर:

   मुलांच्या भावना आणि विचारांचा सन्मान करावा . त्यांना त्यांचे विचार व्यक्त करण्याची संधी देणे फार गरजेचे आहे.मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी  शिक्षक पालक यांनी नेहमी प्रोत्साहित करावे.

4. कौटुंबिक मूल्ये:

   घरात सकारात्मक आणि नैतिक मूल्यांचे पालन करावे . मुलांमध्ये सद्गुण आणि नैतिकता विकसित करण्यासाठी त्यांच्यासमोर आदर्श  उदाहरण निर्माण करावेत.

5. समाजिक आणि भावनिक विकास:

   मुलांना समाजिक आणि भावनिकदृष्ट्या सक्षम बनवावे . त्यांच्या मित्र-परिवाराशी योग्य संबंध ठेवण्याचे महत्त्व समजुन सांगावे .

6. शिक्षण आणि सर्जनशीलता:

   मुलांच्या शैक्षणिक आणि सर्जनशील विकासासाठी अनुकूल वातावरण तयार करावे . त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात त्यांना प्रोत्साहन द्यावे .

7. शिस्त आणि नियम:

   मुलांना शिस्त आणि नियमांचे पालन करण्याची सवय लावावी .आपण त्यांच्यासमोर प्रदर्शित करत असलेले वर्तन व नियम  स्पष्ट आणि न्याय्य नियम असावेत जेणेकरून ते समजतील आणि स्वीकारतील.

8. धैर्य आणि सहनशीलता:

   मुलांच्या समस्यांवर धैर्याने आणि सहनशीलतेने विचार करावा सामानानुभूतीचे तत्व अंगीकारावे  . मुलांना योग्य मार्गदर्शन करावे तसेच त्यांची चूक सुधारण्यासाठी त्यांना सर्वतोपरी  मदत करावी.

मुलांचे भावविश्व स्वीकारणे आणि समजून घेणे म्हणजे त्यांना एक सुरक्षित, प्रेमळ, आणि सन्मानजनक वातावरण देणे होय. यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व आणि वर्तन अधिक सकारात्मक आणि मजबूत होईल.

प्रश्न: मुलांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनीच शोधावीत यासाठी काय करता येईल?

मुलांना स्वतःच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी स्वावलंबी बनवणे हे त्यांच्या बौद्धिक आणि भावनिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी काही प्रभावी उपाय पुढीलप्रमाणे आहेत:

1. प्रोत्साहन आणि प्रेरणा द्या:

   मुलांना त्यांच्या कुतूहलाला प्रोत्साहित करा. जेव्हा ते एखादा प्रश्न विचारतात, तेव्हा त्यांना थेट उत्तर देण्याऐवजी त्यांना विचार करायला लावा की ते उत्तर कुठे आणि कसे शोधू शकतील.

2. संसाधनांचा वापर:

   मुलांना विविध संसाधने उपलब्ध करून द्या जसे की पुस्तकं, इंटरनेट, शैक्षणिक खेळ, विज्ञानाच्या साधनांसह प्रयोग किट्स इ. त्यांना यांचा वापर कसा करायचा हे शिकवा.

3. प्रश्न विचारण्याची कला:

   मुलांना प्रश्न विचारण्याची आणि त्यांच्या मुद्द्यांचा शोध घेण्याची कला शिकवा. “का?”, “कसे?”, “कुठे?” अशा प्रश्नांना उत्तरे शोधण्यास त्यांना प्रोत्साहित करा.

4. समूह चर्चा आणि कार्यशाळा:

   मुलांना समूह चर्चांमध्ये आणि कार्यशाळांमध्ये सहभागी होण्याची संधी द्या. इतर मुलांशी संवाद साधून आणि त्यांच्या दृष्टिकोनातून शिकून, त्यांची शंका निरसनाची क्षमता वाढते.

5. स्वतंत्र प्रकल्प आणि संशोधन:

   मुलांना स्वतंत्र प्रकल्प देऊन त्यांना त्यांच्या आवडीच्या विषयांवर संशोधन करण्याची संधी द्या. हे त्यांना अधिक खोलवर जाण्याचे आणि स्व-अभ्यासाचे कौशल्य शिकवेल.

6. दिग्दर्शन आणि मार्गदर्शन:

   जर मुलांना काहीतरी शोधण्यात अडचण येत असेल तर त्यांना योग्य दिशा दाखवा. त्यांना सखोल संशोधनासाठी सोप्या पद्धती शिकवा, जसे की शोधण्याची योग्य पद्धत, साधनांचा वापर इ.

7. सृजनशील खेळ आणि कृती :

   मुलांसाठी सृजनशील खेळ आणि कृती  आयोजित करा ज्यामुळे त्यांची बौद्धिक क्षमता वाढेल. उदाहरणार्थ, विज्ञान मेळावे, कुटुंबातील कथा सांगणे, किंवा कोडी सोडवणे.

8. चूक करण्याची मुभा:

   मुलांना चूक करण्याची मुभा द्या आणि त्यांच्या चुका सुधारण्याची प्रक्रिया शिकवा. चूकांमधून शिकण्याची संधी त्यांना देऊन त्यांची आत्मनिर्भरता वाढवा.

या उपायांद्वारे मुलांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे स्वतः शोधण्याची क्षमता विकसित करता येईल आणि त्यांची स्वावलंबी बनण्याची प्रक्रिया सुलभ होईल.

प्रश्न: मुलांनी शिक्षकांना  प्रश्न विचारले तर तुम्हीच शोधा असे शिक्षक सांगतात अशा वेळी मुले प्रश्न विचारणेच टाळतात असे घडू नये यासाठी काय करता येईल?

लहानपणी मुले खूप प्रश्न विचारतात कारण  लहानपणी त्यांची कुतूहल प्रवृत्ती तीव्र असते. पण जसजसे ते मोठे होतात तसतसे प्रश्न विचारण्याचे प्रमाण कमी होत जाते. याला काही प्रमुख कारणे असू शकतात:

1. भीती आणि संकोच: मुलांना आपले प्रश्न चुकीचे वाटतील किंवा त्यांच्यावर हसले जाईल अशी भीती वाटू शकते.

2. अपर्याप्त प्रोत्साहन: काही वेळा मोठ्यांनी मुलांच्या प्रश्नांना महत्त्व न दिल्यामुळे किंवा त्यांचे प्रश्न समजून न घेता  टाळल्यामुळे मुलांचा उत्साह कमी होतो.

3. शिक्षण पद्धती: काही शैक्षणिक पद्धतींमध्ये फक्त उत्तरांचे महत्त्व दिले जाते, प्रश्न विचारण्याचे प्रोत्साहन नसते.

4. स्वतंत्रतेची कमी भावना: मुलांना स्वातंत्र्याने विचार मांडण्याची किंवा प्रश्न विचारण्याची संधी न मिळाल्यास त्यांची कुतूहल वृत्ती कमी होऊ शकते.

 प्रश्न विचारण्याचे प्रमाण कायम राहण्यासाठी खालील उपाय योजता येतील :

1. सकारात्मक वातावरण निर्माण करा:

   मुलांच्या प्रश्नांचे स्वागत करावे आणि त्यांना प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित करावे . प्रत्येक प्रश्नाला महत्त्व द्या आणि त्यांचा आदर करावा .

2. प्रश्न विचारण्याचे प्रोत्साहन द्या:

   शाळेत आणि घरी प्रश्न विचारण्याचे प्रोत्साहन द्यावे . मुलांना कोणतेही प्रश्न विचारण्यासाठी मोकळीक देणे गरजेचे आहे .

3. जिज्ञासा प्रज्वलित करणारे उपक्रम:

   मुलांना विविध उपक्रमांमध्ये सहभागी करावे  जसे की विज्ञान प्रयोग, प्रकल्प कार्य, ग्रुप डिस्कशन्स, कोडी, आणि खेळ. यामुळे त्यांची कुतूहल वृत्ती आणि सर्जनशीलता वाढेल.

4. उत्तरे शोधण्याची प्रक्रिया शिकवा:

   मुलांना उत्तर कसे शोधावे याबद्दल मार्गदर्शन करावे . त्यांना संशोधनाचे तंत्र, इंटरनेटचा वापर, पुस्तकांचा संदर्भ इ. शिकवता येईल .

5. उदाहरण सेट करा:

   स्वतःच्या कुतूहल वृत्तीचे उदाहरण देऊन मुलांना प्रेरित करावे . आपणही विविध विषयांवर प्रश्न विचारून उत्तरे शोधा, यामुळे मुलांना त्यांचे कुतूहल वाढवण्याची प्रेरणा मिळेल.

6. खुला संवाद ठेवा:

   मुलांशी नियमित संवाद साधावा . त्यांची आवड, विचार आणि शंका समजून घेण्याचा प्रयत्न करावा .

7. सृजनशीलता वाढवणारे साधने:

   मुलांना विविध सृजनशील साधने उपलब्ध करून द्यावे जसे की कलात्मक साहित्य, विज्ञानाचे किट्स, पुस्तकं, शैक्षणिक खेळ इ. यामुळे त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळेल.

8. समूह कार्य आणि चर्चा:

   शाळेत आणि घरात समूह कार्य आणि चर्चा आयोजित करावी . यामुळे मुलांना एकमेकांच्या विचारांशी परिचित होण्याची संधी मिळेल आणि त्यांची कुतूहल वृत्ती जागृत राहील.

मुलांच्या प्रश्न विचारण्याच्या सवयीला प्रोत्साहन देणे हे त्यांच्या बौद्धिक आणि सर्जनशील विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. यासाठी सकारात्मक वातावरण आणि योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.

प्रश्न: जिज्ञासूवृत्ती जागृत होण्यासाठी जागतिक दर्जाच्या भविष्यवेधी शिक्षणप्रणाली नुसार कोणकोणत्या बाबी करणे आवश्यक आहे?
  1. आवड निर्मिती : आवड हा जिज्ञासेचा गाभा आहे.म्हणून शाळेत शिक्षकांकडून कुटुंबात कुटुंबियांकडून मुलांच्या आवडीच्या गोष्टी, छंद यांचा पाठपुरावा केला जाणे अपेक्षित आहे.प्रत्येक विद्यार्थ्याची आवड निवड, त्याचे कुतूहल जाणून घेऊन तश्या प्रकारच्या गोष्टी करण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना शालेय वातावरणात देणे गरजेचे आहे. आवड निर्माण करणे व मुळात आवड असणे या दोन भिन्न गोष्टी आहेत.बालकाची नैसर्गिक आवड त्यास वेगाने पुढे नेते तर निर्माण केलेली आवड तितक्याच प्रभावाने वातावरण निर्मिती केली तर तीसुद्धा तितक्याच वेगाने शिकण्यास मदत करते. म्हणून नैसर्गिक आवड जोपासणे याचबरोबर निर्माण केलेली आवड विविध उपक्रमांच्या माध्यमातून जोपासणे शक्य आहे.
  2. बालकांच्या भावविश्वाचा स्वीकार : विश्वातील प्रत्येक मूल अपूर्व आहे ,वेगळे आहे त्याच्या जिज्ञासा वृतीला समजून घ्यावयाचे असेल तर सर्वात आधी ते मूल कोणत्या परिस्थितीतून आलेले आहे त्याचे भौतिक कौटुंबिक वातावरण कसे आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे.कारण मुलांच्या भावविश्वाचा स्वीकार झाला तरच त्याच्यातील जिज्ञासू वृत्तीचा सन्मान होणार आहे. कोणत्याही परीस्थितीतून आलेल्या मुलाला शाळा,शिक्षक,वर्गातील मुले आपली वाटावी प्रत्येक मुलाला वर्गप्रक्रियेतील त्याचे स्वतः चे महत्व लक्षात आले किवा त्याची जाणीव निर्माण करून देणे जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करताना लक्षात घ्यावे लागेल.
  3. वर्गप्रक्रियेत मुक्त प्रश्नांचा उपयोग: जिज्ञासू वृत्तीचा विकास होण्यासाठी वर्गप्रक्रियेत विद्यार्थ्यांना गाणी, गोष्टी, कथा, संवाद, पाठ, कविता, खेळ यावर आधारित विविध प्रकारचे मुक्त प्रश्न विचारणे,प्रश्न तयार करणे व त्यावर चर्चा करणे उत्तरे शोधणे इत्यादी बाबी करता येतील.
  4. नित्यक्रमास फाटा देणे: विद्यार्थ्यांचा ,शिक्षकांचा जो दैनंदिन कार्यक्रम असतो त्यास फाटा देऊन आवडीच्या गोष्टी व विद्यार्थ्यांचे कुतूहल जागृत करणाऱ्या बाबी करून घेता येतील.कामात बदल हीच विश्रांती या उक्तीनुसार आपण यामध्ये विविधता आणू शकतो.
  5. मुक्तपणे विचार करण्यासाठी पुरेसा वेळ देणे : मुलांमध्ये जिज्ञासावृत्ती निर्माण होण्यासाठी त्यांना मुक्तपणे काम करता यावे यासाठी त्यांना पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे.
  6. शालेय ग्रंथालयाचा /उपलब्ध पुस्तकांचा जास्तीत जास्त उपयोग करणे : प्रत्येक शाळेत विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध असते.ग्रंथालयात अनेक वाचनीय पुस्तके असतात अशा वेळी शालेय ग्रंथालय,पुस्तक पेढी,मासिके,जुनी पुस्तके यांचे वारंवार प्रदर्शन व वाचन लेखन यातून मुलांच्या जिज्ञासूवृत्तीला बहर आणता येतो.पुस्तके मुलांना विचारप्रवण करतात आणि त्यांच्यातील शोधक वृत्तीला जागृत ठेवतात यासाठी लहानपणापासुन मुलांना पुस्तकांच्या सानिध्यात आणणे तसे वातावरण उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
  7. अध्ययन, अध्यापन प्रक्रियेत कल्पक गोष्टींचा समावेश: कल्पकता हि मुलांच्या उपजत व्यक्तीमत्वात दडलेली असते हे समजून घेऊन नवनवीन प्रयोग, कल्पकता यांचा वापर करून मुलांना आश्चर्य `वाटतील अशा गोष्टी वर्गात, शालेय वातावरणात घडून येणे आवश्यक आहे.
  8. प्रश्नांची उत्तरे शोधणे व ती गरजेनुरूप देता येण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करणे :विद्यार्थी जेवढे प्रश्न विचारतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपणाकडे असली तरी मुलांना स्वतःच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यास प्रेरित करणे.बहुतांशी प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना शोधायला लावणे.अशा दृष्टिने विद्यार्थ्यांना प्रश्न व त्यांची उत्तरे शोधण्याची संधी जास्तीत जास्त वेळा उपलब्ध करून द्यावी.
  9. मुलांना प्रश्न विचारण्यासाठी प्रेरित करा: विद्यार्थी चौकस व्हावे याचबरोबर त्यांच्याकडे चिकित्सक विचार करण्याची करण्याची क्षमता निर्माण व्हावी यासठी मुलांनी विचारते होण्याची गरज आहे.का? कसे? कशासाठी? काय? कोणते? असे विविध प्रश्न प्रसंगानुरूप त्यांनी सहजपणे विचारले पाहिजेत.
  10. प्रवासास व नवीन ठिकाणांना भेटी देण्यासाठी प्रोत्साहन: मुलांना नवनवीन ठिकाणी भेटी देणे,वेगवेगळ्या ठिकाणी प्रवासास जाणे या गोष्टींची संधी शाळा, कुटुंब यांच्या माध्यमातून घडायला हवे. कारण प्रवासात निरीक्षणाच्या माध्यमातून जिज्ञासा वृत्तीचा विकास होत असतो.
  11. शाळा,शाळेबाहेर निरीक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, मुलांच्या आवडीचे निरीक्षण करणे: हि बाब शिक्षक,पालक यांच्या दृष्टिने अत्यंत महत्वाची असून मुलांच्या आवडी निवडी जर आपणास समजल्या तर त्या प्रकारे विविध उपक्रम,कार्यक्रम,प्रकल्प,संशोधने आपल्याला राबवता येतील.

भविष्यवेधी शिक्षणाची पाचवी पायरी- शिकण्यात तंत्रज्ञानाचा उपयोग करणे.

प्रश्न: शिकण्यासाठी मोबाईल किंवा तंत्रज्ञानाचा उपयोग केल्याने मुलांची स्वतंत्र विचारशक्ती कुंठीत होईल अशी भिती वाटते

1. संतुलन साधणे:   मुलांची स्वतंत्र विचारशक्ती अबाधित राहण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापरासोबत मुलांना प्रत्यक्ष अनुभव, शारीरिक कृती  आणि सामाजिक संवाद यांसारख्या गोष्टींमध्ये सहभागी करून घेणे गरजेचे आहे.असे केले तर त्यांच्या विचारशक्तीला चालना मिळेल.

2. निर्धारित वेळ:  मोबाईल,इंटरनेट सारख्या साधनांचा अनिर्बंध वापर केला तर नक्कीच समस्या निर्माण होऊ शकतात यासाठी मुलांना तसेच आपण मोठ्यांनी सुद्धा  मोबाईल आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी ठराविक वेळ मर्यादा ठेवावी. तशी स्वतःला तसेच मुलांना शिस्त लावावी उर्वरित वेळात मुलांना वाचन, लेखन, चित्रकला आणि इतर सर्जनशील कृतींमध्ये गुंतवून ठेवावे. मुलांना आवडीच्या गोष्टी करण्यासाठी प्रेरित करावे.

3. स्वतंत्र अभ्यासासाठी प्रोत्साहन देणे : मुलांना स्वाध्याय आणि स्वतःचा अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे . त्यांना प्रश्न विचारायला आणि त्यांच्या उत्तरांचा शोध स्वतः घेण्याची संधी द्यावी .

4.  चिकित्सक विचार आणि समस्या सोडवण्याच्या कौशल्यांचा विकास: मुलांना समस्या सोडवण्याच्या विविध पद्धती शिकवाव्यात . त्यांना प्रश्न विचारायला आणि त्यांच्या उत्तरांचा शोध लावण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा हे शिकवावे .

5. कौटुंबिक संवाद:  शाळेत तसेच कुटुंबात रोजच्या कामकाजात कौटुंबिक संवाद वाढवा. एकत्र बसून चर्चा करणे, विचार मांडणे आणि मतांची देवाणघेवाण करणे मुलांच्या विचारशक्तीला चालना देते. यासाठी संवादावर जास्तीत जास्त भर द्यावा.

6. शिकण्याच्या पद्धतींमध्ये विविधता: शिकण्याची एकाच एक पद्धत रटाळवाणी वाटते,मुलांना तंत्रज्ञानाचे आकर्षण असले तरी तीच पद्धत नेहमी वापरल्यास ते शिकणे निरस होईल यासाठी  तंत्रज्ञानाच्या वापरासोबतच पारंपरिक शिकण्याच्या पद्धतींचा उपयोग करावा . पुस्तके, शैक्षणिक खेळ, चर्चा आणि गट कार्य या सर्व गोष्टींना महत्त्व द्यावे .

7. शिक्षक आणि पालक यांनी मुलांसमोर आदर्श ठेवावा : मोबाईल तसेच सोशल मेडिया वापराबाबत  पालक आणि शिक्षकांनी मुलांसमोर स्वतःचा योग्य उदाहरण घालून द्यावे. जर ते स्वतः तंत्रज्ञानाचा संतुलित वापर करत असतील, तर मुलंही त्यांचे अनुकरण करतील.

8. कौशल्यविकास कार्यक्रम आयोजित करणे : मुलांना विविध कौशल्यं शिकण्यासाठी विविध कार्यशाळा आणि कार्यक्रमांत सहभागी करून घ्या, ज्यामुळे त्यांच्या स्वतंत्र विचारशक्तीचा विकास होईल.

शिक्षक पालक मित्रानो वरील  उपाययोजनांद्वारे, तंत्रज्ञानाचा उपयोग करताना मुलांची स्वतंत्र विचारशक्ती कायम ठेवता येईल आणि त्यांना एक समृद्ध शिक्षण अनुभव मिळेल आपल्याला वाटणारी भीती चिंता कमी होण्यास मदत होईल.

प्रश्न: मोबाईल, संगणक याच्या  अतिरीक्त वापराने मुलांमध्ये मानसिक तसेच शारिरीक आजार उद्भवण्याची समस्या निर्माण होईल अशी ओरड पालक वर्गाकडुन किंवा समाजाकडून  केली जाते

हो, हे खरे आहे की मोबाईल आणि संगणकाच्या अतिरीक्त वापरामुळे मुलांमध्ये मानसिक तसेच शारीरिक आजार उद्भवण्याची समस्या निर्माण होऊ शकते. इथे एक बाब आपण सर्वांनी समजून घेणे नितांत आवश्यक आहे ती  म्हणजे  आपले विद्यार्थी आणि पाल्य यांच्या शिकण्यात मदत व्हावी या उद्देशाने आपण मोबाईल किवा तंत्रज्ञान उपयोगात आणावयाचे आहे. शिकण्यासाठी मोबाईल वापरल्याने मानसिक शारीरिक समस्या निर्माण होतील आणि मनोरंजन म्हणून पहिले तर काही होणारच नाही असे अज्जिबात नाही मूळ मुद्दा हा आहे कि अनेक प्रयत्न करून देखील मोबाईल पासुन हल्लीच्या पिढीला लांब ठेवणे शक्य होत नाही आणि तसे भविष्यातही होणे असंभव आहे म्हणून याच तंत्रांचा सदउपयोग व्हावा म्हणून भविष्यवेधी शिक्षणाची 5 वी पायरी मांडण्यात आली ज्याला आपण म्हणतोय शिकण्यात तंत्रज्ञानाचा उपयोग करणे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो त्याला तंत्रज्ञान हे काही अपवाद नाही तरी शिक्षक आणि पालक यांनी उद्देश समजून घेत त्यावर योग्य कार्यवाही करणे अपेक्षित आहे.आपण योग्य उपयोग केल्यास अश्या समस्या निर्माण होणार नाहीत परंतु अतिरेकाने समस्या निर्माण होत असतील यासाठी  या समस्यांना तोंड देण्यासाठी खालील उपाययोजना उपयुक्त ठरू शकतात:

 मानसिक आरोग्याचे संरक्षण

1. स्मार्टफोन डिटॉक्स: मुलांना ठराविक वेळेसाठी मोबाईलपासून दूर ठेवून त्यांच्या मानसिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी शिक्षक आणि पालकांनी प्रयत्न करावेत.

2. समस्या सोडवण्याची कौशल्ये: मुलांना त्यांच्या भावनांचा योग्य प्रकारे सामना करायला आणि ताणतणावाचे व्यवस्थापन शिकवणे योग्य राहील.

3. सामाजिक संवाद: मुलांना सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे , जेणेकरून त्यांना प्रत्यक्षात लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळेल.

शारीरिक आरोग्याचे संरक्षण

1. व्यायाम आणि खेळ: मुलांना दररोज किमान एक तास शारीरिक क्रियाकलापात सहभागी होण्याची संधी द्यावी .

2. योग्य बसण्याची पद्धत: संगणक किंवा मोबाईल वापरताना योग्य बसण्याची पद्धत आणि पॉश्चर याबाबत मार्गदर्शन करावे .कारण चुकीच्या बैठक व्यवस्थेमुळे देखील शारीरिक व्याधी उत्पन्न होऊ शकतात.

3. डोळ्यांचे आरोग्य: मोबाईल आणि संगणक वापरताना दर 20 मिनिटांनी 20 सेकंदासाठी 20 फूट दूरच्या वस्तूंकडे पाहण्याची सवय लावा (20-20-20 नियम).

 तंत्रज्ञानाचा संतुलित वापर

1. वेळ मर्यादा: मुलांच्या तंत्रज्ञान वापरासाठी ठराविक वेळ मर्यादा ठेवा. उदाहरणार्थ, दररोज दोन तासांपेक्षा जास्त वेळ मोबाईल किंवा संगणकावर घालवू नये.

2. शैक्षणिक वापर: तंत्रज्ञानाचा वापर मुख्यतः शैक्षणिक उद्देशांसाठी करावा  आणि मनोरंजनासाठी कमी वेळ द्यावा .

3. पालकांचे नियंत्रण: पालकांनी पॅरेंटल कंट्रोल्सचा वापर करून मुलांच्या तंत्रज्ञान वापरावर देखरेख ठेवावी.

 शिक्षण आणि जाणीवजागृती

1. प्रशिक्षण आणि मार्गदर्शन: मुलांना तंत्रज्ञानाच्या योग्य वापराचे महत्त्व समजवून सांगावे  आणि मुलांना डिजिटल साक्षरतेबद्दल मार्गदर्शन करावे .

2. कौटुंबिक नियम: घरात तंत्रज्ञान वापरासंबंधी स्पष्ट नियम ठेवावेत  आणि कुटुंबातील सर्वांनी त्यांचे पालन करावे.

 शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे नियमित निरीक्षण

1. आरोग्य तपासणी: नियमितपणे मुलांची शारीरिक आणि मानसिक आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे.

2. तज्ञांचे मार्गदर्शन: आवश्यकतेनुसार बालरोगतज्ञ, मानसिक आरोग्य तज्ञ यांच्याशी सल्लामसलत करावे  .

या उपाययोजनांद्वारे, तंत्रज्ञानाचा संतुलित वापर करून मुलांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य राखणे शक्य होईल.

प्रश्न: आम्ही शिक्षक घरचा अभ्यास तंत्रज्ञानाचा उपयोग करून करण्याबाबत काही आव्हाने देतो तेव्हा पालक म्हणतात मोबाईलवरच शिकवायचे असते तर मग शिक्षकांचे काय काम?

शिक्षक आणि पालकांना वाटणाऱ्या  या चिंता अतिशय रास्त आहेत. आताची मुले फावला वेळ मिळाला कि लगेच मोबाईल कडे धाव घेतात.अभ्यासाच्या निमित्ताने तरी काही वेळ मोबाईल पासुन दूर जाने शक्य होते ,पालक म्हणून पुस्तक वाचून अभ्यास करणे मोबाईल च्या तुलनेने समाधान देणारे असते कारण मोबाईल हातात पडल्यावर ते अभ्यासाच्या बाबी बघायला महत्व देतातच असे नाही म्हणून शाळेतून असा अभ्यास दिला जावा ज्येने मुले प्रत्यक्ष पुस्तकात रमावे असे प्रत्येक पालकांना वाटत असते.अशा वेळी शिक्षकांनीच असे काही आव्हान दिले जे मोबाईल चा उपयोग करण्यावर आधारित असेल तर पालकांचा गैरसमज होतो त्यांना हेच वाटते कि मोबाईल वरच माझे मूल शिकणार असेल तर मग शिक्षक काय करतात तर अशा वेळी पालकांच्या या चिंतेचा आपण आदर करायला हवा याबरोबरच शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व पटवून देणे आणि तंत्रज्ञानाचा शिक्षणात कसा योग्य वापर केला जाऊ शकतो हे स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे. यासाठी खालील उपाययोजना करता येतील.

शिक्षकांचे महत्व पटवून देणे.

1. शिक्षकांचे मार्गदर्शन: तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिकवताना शिक्षकांचे मार्गदर्शन, त्यांच्या अनुभवाचे आणि कौशल्यांना  महत्व आहे. शिक्षक मुलांना विषय नीट समजावून सांगतात आणि शंका निरसन करतात. जर मोबाईलचा उपयोग करण्याबद्दल शिक्षक सुचवत असतील तर त्यात नक्कीच आपल्या पाल्याचे अधिक शिकणे होणार असेल. शिक्षकांनी एखादा घटक अधिक स्पष्ट होण्यासाठी मोबाईल वापरण्यास सांगितला असेल हा विश्वास पालकांच्या मनात निर्माण करावा लागेल.

2. मुलांच्या प्रगतीचे निरीक्षण: तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षकांना मुलांच्या प्रतिसादाचे मूल्यमापन करणे शक्य होते. शिक्षक मुलांच्या प्रगतीचे निरीक्षण करून त्यानुसार  एखादे मूल विशिष्ट विषय शिकण्याच्या बाबतीत नेमके कुठे आहे याचा फीडबॅक देऊ शकतात,  तसेच ज्या विषयांमध्ये मूल मागे पडत आहे त्यासाठी पूरक करावयाच्या कृतींचे नियोजन करता येतात.

3. शिकण्याच्या पद्धती: पालक बऱ्याच वेळा त्याच्या काळातील शिक्षण आणि आताचे शिक्षण यांची तुलना करत असतात.त्यांना नेहमीच वाटते कि आम्ही शिकलो तो काळ चांगला होता ,परंतु आता तसा विचार करून चालणार नाही. सध्याचे  युग तंत्रज्ञानाचे आहे कालानुरूप शिक्षक विविध पद्धती आणि संसाधनांचा वापर करून शिकवतात, ज्यामुळे शिकण्याचा अनुभव समृद्ध होतो. हे लक्षात आणून द्यावे लागेल.

पालकांसोबत संवाद

1. पालकांची जागरूकता: पालकांना तंत्रज्ञानाचा उपयोग कसा आणि का केला जातो याबद्दल जागरूक करावे. उदा. गृहपाठासाठी विशेष अॅप्स, ऑनलाइन संसाधने आणि शैक्षणिक खेळ यांचा उपयोग शिकण्याच्या प्रक्रियेला पूरक कसा  असतो हे प्रत्यक्ष उदाहरणातून पटवून द्यावे.शक्यतो  जे पालक मोबाईल बद्दल सतत तक्रार करतात अशा पालकांना त्यांच्या मुलांची प्रगती लक्षात आणून द्यावी.

2. पालकांशी संवाद: पालकांसोबत नियमित संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन करावे. बऱ्याच अडचणी शिक्षक आणि पालक यांच्यात असलेल्या संवादाच्या अभावामुळे निर्माण होत असतात.हे टाळण्यासाठी शिक्षकांनी सतत पालकांच्या संपर्कात राहावे.आपण मुलांसाठी करत असलेली धडपड त्यांच्या लक्षात आणून द्यावी.याबरोबरच  तंत्रज्ञानाच्या उपयोगाचे फायदे स्पष्ट करावे  आणि  तंत्रज्ञानाचा योग्य  उपयोग करण्यासाठी शिक्षक महत्वाचा आहे हे समजावून सांगावे.

संतुलित पद्धती

1. ऑफलाइन आणि ऑनलाइन अभ्यास पद्धतींचा समन्वय : शिक्षक सारखेच  मुलांना  मोबाईल वर आधारित आभास देत असतील तर ते योग्य होणार नाही मुलांच्या सर्वांगीण प्रगती साठी ऑफलाइन  आणि ऑनलाइन अभ्यास किवा सराव या दोघांचे  संतुलन साधावे लागेल उदा. काही गृहपाठ ऑनलाइन पूर्ण करण्यासाठी आणि काही प्रत्यक्ष वह्या किंवा पुस्तके वापरून करण्यासाठी असावा.असे केले तर पालकांना वाटणारी चिंता कमी होणार आहे.

2. समस्या सोडवण्याचे कौशल्य: तंत्रज्ञान हे  शिकण्यास पूरक साधन आहे यावर मुलांनी पूर्णपणे अवलंबून राहणे योग्य नसणार आपल्याला मुलांना स्वतंत्रपणे विचार करायला आणि समस्यांचे निराकरण करायला शिकवावे लागेल. तंत्रज्ञानाचा वापर फक्त एक साधन म्हणून  मुख्यतः शिकण्याच्या प्रक्रियेस पूरक म्हणून. करणे आवश्यक आहे.

 पालकांसाठी साधने आणि प्रशिक्षण

वरील सर्व  उपाययोजनांसोबतच पालकांना तंत्रज्ञानाचा योग्य वापर कसा करता येतो आणि शिक्षकांची भूमिका किती महत्वाची आहे हे समजावणे यासाठी तसेच पालकांना मुलांच्या शिकण्यात योगदान देता यावे यासाठी पालक प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करणे परिणाम देणारे असेल.आजमितीला ज्या शाळा मुलांच्या गुणवत्तेबाबत विशेष कामगिरी करू शकत आहे त्यांचा अभ्यास केला तर ते करत असलेल्या कामात पालकांचा सहभाग हि बाब महत्वपूर्ण आहे पालकांना फक्त सोबतच घ्यायचे नाही तर त्यांनी मुलांच्या शिकण्यात योगदान कसे द्यावे याबाबत प्रशिक्षित करावे लागेल. वाबळेवाडीचे उदाहरण आपणा सर्वांसमोर आहे, तेथील प्रत्येक पालक मुलांच्या शिकण्याबाबत जागरूक आहे. शिक्षकांनी अतिशय कुशलता पूर्वक पालकांना प्रशिक्षित केले आहे.

प्रश्न: शाळेचे मुख्याध्यापक मोबाईलचा उपयोग करून  शिकवण्यावर बंदी घालतात त्यांना वाटते की संगणक, मोबाईल चा उपयोग करून शिक्षक आळशी बनतील

वरील प्रश्नाचे निरसन करताना तेथील मुद्दे या प्रश्नासाठी देखील लागू होतात. जसे पालकांच्या मनात मोबाईल वापरण्यासंदर्भात अनेक संभ्रम आहेत तसेच आपल्या मुख्याध्यापक यांच्या मनात असू शकतील.असे कोणकोणते संभ्रम असू शकतात पाहूया

  • शिक्षकांना मोबाईल वापरण्यास परवानगी दिली तर ते प्रत्यक्ष शिकवणे ,मुलांशी संवाद ,विविध कृती यांपासून दूर जातील
  • मुलांच्या शिकण्यासाठी मोबाईलचा उपयोग न करता ते स्वतः च्या वैयक्तिक कामांसाठी उदा. फोन कॅल करण्यासाठी  फोन वापरतील.
  • मोबाईल मुळे  शिक्षक भरकटतील शैक्षणिक प्रक्रियेपासून दूर जातील.परिणामी मुलांचे नुकसान होईल.
  • बरेच शिक्षक मोबाईल मध्ये whats app सारखे बघत असतात. त्यात महत्वाचा शैक्षणिक वेळ वाया जातो.
  • काही शिक्षक नुसतेच मोबाईल किवा संगणकावर एखादा पाठ लाऊन देतात आणि स्वतः मात्र दुसरेच काम करत बसतात.
  • शिक्षक त्यांचा शिकवण्याचा ताण आणि श्रम कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करतात.
  • अशाप्रकारचे अनेक संभ्रम आपल्या मुख्याध्यापकांचे असू शकतात.अजून एक महत्वाची बाब म्हणजे कोणत्याही शाळेतील मुख्याध्यापक हे वयाने तसेच अनुभवाने वरिष्ठ असल्याने ते त्यांच्या विचारप्रक्रियेनुसार निर्णय घेतात. बऱ्याच जणांचा तंत्रज्ञानाला विरोध असतो जो कि अज्ञानातून किवा भीतीतून तयार झालेला असतो.
  • यासोबतच एक महत्वाची बाब म्हणजे तुमचे मुख्याध्यापक हे शाळेचे प्रमुख आणि जबाबदार व्यक्ती असतात.शाळेला मिळणाऱ्या प्रत्येक वस्तूचा हिशेब आणि लेखाजोखा ठेवणे हि त्यांची जबाबदारी असते. डेडस्टोक मधील वस्तू गहाळ होणे, नादुरुस्त होणे,चोरीला जाणे अशा अनेक संभाव्य बाबींसाठी  शाळेचे मुख्याध्यापक यांनाच जबाबदार धरले जाते.एका शाळेतून दुसऱ्या शाळेत बदली होताना चार्ज सुपूर्त करताना सर्व बाबी,वस्तू  पुढील मुख्याध्यापक यांच्याकडे सुपूर्त करायच्या असतात म्हणून वस्तू खराब होण्याच्या भीतीने वापरूच नये अशी भूमिका घेतली जाते.
  • वैयक्तिक स्वभाव,पूर्वानुभवातून घेतलेले निर्णय.

वरील सर्व बाबींवर चिंतन करा यापैकी कोणती बाब आपल्या संदर्भात लागू होतेय ते पाहूया.

असे घडू नये यासाठी  काय उपाययोजना करता येतील?

मित्रानो! वरील सर्व मुद्यांवर विचार केला असता सर्वात महत्वाची बाब समोर हि येते कि मोबाईल किवा तंत्रज्ञानाच्या मदतीने मुलांच्या गुणवत्तेबाबत सकारात्मक परिणाम मिळतील कि नाही याबाबत शंका असणे हि सगळ्यात मोठी अडचण आहे.कारण मुख्याध्यापक म्हणून काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपली शाळा गुणवत्तेच्या बाबतीत पुढे नेण्याची प्रामाणिक अपेक्षा असते.जी  शिक्षकांना देखील असते. असा एकही शिक्षक किवा मुख्याध्यापक अस्तित्वात नाही ज्यांना आपली मुले गतीने शिकू नये असे वाटते.प्रत्येकाला मूल गुणवत्ता पूर्ण घडवायचे असते. अडचण फक्त आपण कोणते पर्याय वापरतो हे समजणे महत्वाचे आहे.मग तुम्ही शिक्षक म्हणून तंत्रज्ञानाच्या मदतीने मुलांना अधिक बाबी शिकवू पाहत आहेत तर अशा काही बाबी कराव्या लागतील ज्यातून तुमच्या वर्गातील मुलांना शिकण्यात फायदा होत आहे,मुले गतीने शिकत आहेत, चला खाली काही बाबी दिल्या आहेत त्या बघूया

  • तुम्ही मुलांना आव्हान देत आहात आणि आव्हान पूर्ण करणाऱ्या मुलांसोबत सेल्फी घेत आहात याने तुमच्या वर्गातील मुलांमध्ये सकारात्मक स्पर्धा तयार झाली आहे आणि मुले खुश आहेत,
  • तुम्ही शाळेच्या गृप वर पाठवलेले सेल्फी पाहून पालक खुश होत आहेत त्यांच्या मुलांच्या प्रगतीबद्दल बोलत  आहेत.
  • तंत्रज्ञान वापराचे तुमचे कौशल्य पाहून तुमच्या शाळेतील इतर शिक्षक देखील प्रेरित होत आहेत.
  • मुलांची दैनंदिन उपस्थिती वाढली आहे तसेच ते अधिक क्रियाशील झालेले आहेत.
  • मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होत आहे.

 शिक्षक मित्रानो अशा अनेक सकारात्मक बाबी आपण समोर आणल्या त्या सिद्ध करून दाखवल्या तर तेच मुख्याध्यापक तुमचे कौतुक करतील आणि तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहन देतील एका गोष्टीची स्पष्टता आणूया.

“ समाजात जेव्हा जेव्हा वाईट किवा नकारात्मक  गोष्टींबाबत तक्रारी केल्या जातात किवा त्यांचे प्राबल्य वाढते  अशा वेळी समजावे कि  चांगल्या गोष्टींचा प्रसार करण्यात काटकसर होत आहे. जाणकार लोकं  हे जाणतात आणि नकारात्मक चित्र बदलण्यास पुढाकार घेतात.  कदाचित  असे व्यक्ती  तुम्हीच असाल.”

प्रश्न: शिकण्यात तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग कशा पद्धतीने करून घेता येईल

शिक्षणात तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग विविध पद्धतींनी करून घेता येऊ शकतो. यामध्ये खालील काही उपाय सुचवले आहेत सर्व शिक्षक मित्रांनी याचा आपले विद्यार्थी आणि पाल्य यांच्यासाठी उपयोग करावा

1. ऑनलाइन शैक्षणिक  प्लॅटफॉर्म्स: Cours-era, edu X, Khan Academy यांसारखे अनेक  प्लॅटफॉर्म्सवर विविध विषयांचे अभ्यासक्रम उपलब्ध असतात. यांचा उपयोग करून  विद्यार्थी स्वतःच्या गतीने शिकू शकतात.

2. व्हिडिओ लेक्चर्स: YouTube, Zoom, Teams यांसारख्या माध्यमांतून शिक्षक व्हिडिओद्वारे शिकवू शकतात, एका पेक्षा जास्त शिक्षक उपलब्ध होतात  ज्यामुळे विद्यार्थ्यांना शिकण्याचा अनुभव अधिक आकर्षक वाटतो. शिकणे रंजक  आणि गतीने होते.

3. शैक्षणिक अॅप्स: Duolingo,  read Along , Diksha ,Byju’s, Photomath यांसारखे अॅप्स विशिष्ट विषयांवर लक्ष केंद्रित करून शिक्षण अधिक सोपे आणि मजेदार बनवतात. यासोबतच अनेक शैक्षणिक अॅप्स उपलब्ध आहेत.शिक्षकांनी विषयाची गरज लक्षात घेऊन त्यांचा उपयोग करावा,या विविध शैक्षणिक अॅप्स च्या मदतीने मुले शाळेबाहेरच्या वेळात देखील स्वतः शिकू शकतील आणि इतर गेम किवा तत्सम विचलित करणाऱ्या बाबींपासून दूर जातील.

4. ई-बुक्स आणि ऑनलाइन संसाधने : सध्या इंटरनेटवर अनेक ई-बुक्स आणि शैक्षणिक साहित्य मोफत उपलब्ध आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना विविध विषयांवर खोलवर अभ्यास करता येतो. वारंवार हि साधने अपडेट होत असल्यामुळे मुलांच्या ज्ञानात सतत भर पडत राहते.

5. गेमिफिकेशन: शिक्षणातील संकल्पना मजेदार आणि खेळाच्या स्वरूपात शिकविण्यासाठी Kahoot!, Quizizz यांसारख्या प्लॅटफॉर्म्सचा वापर करून शिक्षण अधिक आकर्षक बनवता येते. कमी वेळात अधिक शिकणे होते.यांच्या उपयोग करून मुले कमी वेळात आपापल्या वर्गाचा पाठ्यक्रम पूर्ण करतात आणि उरलेल्या वेळात त्यांच्या आवडीचे कौशल्य शिकतात तसेच पुढील वर्गाचा पाठ्यक्रम देखील पूर्ण करतात.

6. वर्चुअल रियालिटी (VR) आणि ऑग्मेंटेड रियालिटी (AR):  तंत्रज्ञानाचा उपयोग करून VR आणि AR तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकण्यातील  वास्तविक अनुभव देऊन शिक्षण दिले जाते. उदा. विज्ञान प्रयोगशाळेत किंवा ऐतिहासिक स्थळांच्या दौऱ्यांमध्ये जे शिकणे होणार असते ते प्रत्यक्ष त्या ठिकाणी न जाता घरी बसल्या किवा शाळेत VR च्या मदतीने अनुभव दिला जातो. शिकणे हे माहितीपुरते मर्यादित न राहता त्याला कृतीची जोड देता येते.भूगोल ,इतिहास यांसारखे विषय या तंत्राच्या मदतीने अधिक दर्जेदारपणे शिकण्यासाठी मदत होते.

7. स्मार्ट क्लासरूम्स: स्मार्ट बोर्ड, प्रोजेक्टर्स आणि इंटरनेटच्या सहाय्याने पारंपरिक शिक्षण पद्धतीला तंत्रज्ञानाची जोड दिली जाऊ शकते.

8. ऑनलाइन असेसमेंट्स: Google Forms, Microsoft Forms यांसारख्या साधनांचा वापर करून नियमितपणे विद्यार्थ्यांचे मुलांचे मूल्यमापन करता येते.

अशा प्रकारे विविध  मार्गाने शिकण्यात तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग  करून घेता येईल.

प्रश्न: मोबाईलचा अतिरिक्त वापर मुलांना पुस्तकांपासून दूर ठेवत असेल तर, त्यावर मात करण्यासाठी काही उपाययोजना राबवता येऊ शकतात. खालील उपायांचा विचार करावा:

हल्ली मुलांना मोबाईल च्या अतिरिक्त वापर करण्यापासून दूर नेऊन त्यांना पुस्तकांची आवड निर्माण करणे हे कौशल्याचे काम आहे. खाली काही उपाययोजना सुचवल्या आहेत त्यांचा उपयोग करून या समस्येवर मत करता येईल.

1 वाचनाचे फायदे: मुलांना पुस्तक वाचनाचे फायदे समजावून सांगावे . यामध्ये भाषिक कौशल्य, कल्पनाशक्ती, आणि एकाग्रता यांचा समावेश करावा.

2 पालक यांनी मोबाईलपासुन स्वतः काही काळ दूर राहून स्वतः ला वाचनाची सवय लावून घ्यावी-  मुलांनी पुस्तके वाचावीत हि अपेक्षा आपण करत असू तर पालक म्हणून आपण स्वतः मुलांसमोर आदर्श ठेवायला हवा.आई वडील मोबाईल वर मनोरंजन करवून घेत आहे आणि मुलांना पुस्तके वाचायला सांगत आहेत असे केल्यास मुले कधीच वाचणार नाहीत,मुलांनी वाचते व्हावे असे आपणास मनापासून वाटत असेल तर घरी तसे वातावरण तयार करावे लागेल. शेवटी आपली मुले आपलेच अनुकरण करतात.ज्या घरात पालक पुस्तके वाचतात त्या घरातील मुले देखील वाचनाची आवड जोपासतात.

3 वाचनाची आवड वाढवणे: विविध आणि रोचक पुस्तके उपलब्ध करून मुलांच्या वाचनाची आवड वाढवावी  मुलांच्या  वयानुसार आणि आवडी-निवडींनुसार पुस्तके निवडावीत.

 4  वाचनासाठी विशेष वेळ राखून ठेवणे

5 नियोजित  वेळ: दररोज ठराविक वेळ वाचनासाठी राखून ठेवा. मुलांना नियमित वाचनाची सवय लावावी.

वाचन सत्र : शाळेत किंवा घरी वाचन सत्र आयोजित करावे, जिथे मुलं एकत्र बसून वाचन करू शकतील.

6  शाळा तसेच वसतिगृहात  वाचनालयाची सुविधा उपलब्ध करून देणे. ग्रंथालय रजिस्टर ठेवावे.मुलांनी वाचलेल्या पुस्तकांच्या नोदी ठेवाव्यात तसेच मुलांना त्यांनी वाचलेल्या पुस्तकाबद्दल परिपाठात माहिती देण्यास प्रोत्साहित करावे,नियमित वाचन करणाऱ्या मुलांचा “वाचक मित्र” म्हणून सन्मान करावा

7 वाचनालयाची स्थापना: शाळेत किंवा वसतीगृहात वाचनालय स्थापन करावी , जिथे मुलांना विविध पुस्तके उपलब्ध असतील. वाचनाची आवड असणारी मंडळी घरी देखील वाचनालय तयार करतात ज्याने मुलांना लहान पणापासूनच विविध पुस्तके वाचनाची सवय लावता येते.

8 वाचनालयाचे सदस्यत्व: मुलांना स्थानिक वाचनालयाचे सदस्य बनवण्यासाठी प्रोत्साहित करावे.मुलांना स्वतः पुस्तके आणायला आणि परत करायला पाठवावे असे केल्यास ते जाणीवपूर्वक वाचन करण्यास शिकतील.

9  पुस्तक भेट : मुलांच्या वाढदिवसाला तसेच विशेष प्रसंगी खेळणी ,वस्तू भेट देण्यापेक्षा त्यांच्या वयोगटाला अनुसरून उत्कृष्ट  पुस्तक द्यावी.

 शाळेत वाचन संस्कृती विकसित करण्यासाठी पालकांचा सहभाग

1 पालकांना प्रोत्साहन:  शाळेने पालकांना मुलांसोबत पुस्तक वाचनासाठी प्रोत्साहित करावे ,कारण  मुलांच्या वाचनातील सहभागात पालकांची भूमिका महत्त्वाची आहे ti समजून सांगावी त्यासाठी विशेष प्रयत्न करावेत.

2 वाचनाच्या विविध उपक्रमांमध्ये  पालक सहभाग: पालक आणि मुलांनी एकत्र वाचनाचे कार्यक्रम आयोजित करता येतील  जसे की पुस्तक चर्चा, वाचन स्पर्धा इ.

3 तंत्रज्ञानाचा संयमित वापर:  तंत्रज्ञान आणि पारंपारिक वाचन यामध्ये संतुलन साधावे . तंत्रज्ञानाचा उपयोग मुख्यतः शैक्षणिक उद्देशांसाठीच कसे करता येईल यासाठी पालक शिक्षक दोघांनी मिळून प्रयत्न करावेत.

4 वेळ मर्यादा: मुलांच्या मोबाईल वापरावर वेळ मर्यादा ठेवावी.उदाहरणार्थ, दररोज ठराविक वेळेपर्यंतच मोबाईल वापरण्याची परवानगी द्यावी. झोपण्यापूर्वी मोबाईल पार्किंग अशी विशिष्ट जागा नियोजित करावी जिथे घरातील सर्व सदस्य आपापले मोबाईल ठेवतील आणि संवाद आणि गप्पा यांना प्राधान्यक्रम द्यावा.

5 वाचनाच्या प्रोत्साहनासाठी विविध उपक्रम: शालेय स्तरावर  वाचन स्पर्धा, पुस्तक मेळावे लेखकांच्या भेटीचे आयोजन करावे, ज्यामुळे मुलांना वाचनाची आवड वाढेल.

6 पुस्तकांशी संबंधित अॅप्स:  पुस्तकांशी संबंधित काही शैक्षणिक अॅप्स वापरावेत  ज्यामुळे मुलांना वाचनाची आवड निर्माण होईल, जसे की ऑडिओबुक्स, ई-बुक्स इ.

या उपाययोजनांद्वारे, मुलांना पुस्तके वाचण्याची आवड निर्माण करता येईल आणि त्यांचा मोबाईल वापर नियंत्रित ठेवता येईल.पुस्तक वाचनाची आवड निर्माण करता येईल.

प्रश्न: वसतीगृहात मुलांना टॅब उपलब्ध करून दिले असता किशोरवयीन मुलांनी त्याचा गैरवापर केला. मुलांचे काऊंसिलिंग कसे करावे

किशोरवयीन मुलांनी टॅबचा गैरवापर केला असेल, तर त्यांना योग्य मार्गदर्शन आणि काऊंसिलिंग करून त्यांच्या वर्तनात सुधारणा घडवून आणणे आवश्यक आहे. मुलांना स्वातंत्र्य मिळाले कि ते त्यांना हवे ते पाहत असतात अर्थात ते ज्या काही कृती करतात त्या जीज्ञासेतूनच करत असतात.बऱ्याच वेळा मुलानी नेमके काय पाहावे याचे पुरेपूर पर्याय देण्यात आपण कुठेतरी कमी पडत असतो म्हणून अशा समस्या निर्माण होतात. वाबळेवाडी शाळेचे उदाहरण घेतले तर असे दिसून येईल कि 24 तास मुलांकडे tab उपलब्ध आहेत  शिक्षक ,पालक यांचे कोणतेही नियंत्रण नसतानाही मुले फक्त अभ्यासाच्या बाबी पाहतात. असे का होत असेल याचा अभ्यास केला असता हि बाब लक्षात आली कि त्यांच्या tab मध्ये हजारोंच्या संख्येने विविध विषयांचे app आहेत जे अतिशय मनोरंजक पद्धतीने शिकण्यास मदत करतात म्हणून त्या मुलांना इतर काही पाहण्याची जिज्ञासा निर्माण होत नाही आणि आपल्याला पालक आणि शिक्षक म्हणून मुलांच्या हातात मोबाईल दिल्यावर ते त्याचा गैरवापर करतील हि जि काळजी वाटते त्यातून सुटका होते. तर वाबळे वाडी शाळेकडून आपण हि बाब शिकलो तर नक्कीच या अडचणींवर मत करता येईल. यासोबतच किशोरवयीन मुलांबाबत  काऊंसिलिंगच्या काही प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक असेल खालील मुद्यांच्या अनुषंगाने ते समजून घेऊया.

विश्वासार्ह वातावरण निर्मिती: आपल्या शाळेतील किवा वसतिगृहातील मुले मोबाईलचा उपयोग शिकण्यासाठी न करता मनोरंजन किवा तत्सम आक्षेपाहार्य बाबींसाठी केला असे आपणास लक्षात आले तरी मुलांना तडकाफडकी तोडून बोलू नका त्यांच्या अडचणी समजून घ्या.किशोरवयीन मुलांमध्ये हार्मोनल बदल होत असतात हे सुद्धा महत्वाचे कारण असू शकते अशावेळी  मुलांसोबत असा संवाद साधा त्यांना आपली शंका आणि भावना मोकळेपणाने व्यक्त करता येतील असे वातावरण तयार करण्यासाठी पुढाकार घ्या.आपल्या सर्वाना हे पटेल कि जे शिक्षक किवा शिक्षिका मुलांना समजून घेतात त्यांच्यासोबत ते मनातील गोष्टी शेयर करतात.त्यांच्या चुकीच्या कृतीचे समर्थन न करता आधी संवाद साधावा.

 संवाद तंत्राचा उपयोग करून घेऊन  मुलांशी बोलताना त्यांचे दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करावा  आणि त्यांना योग्य दिशेने मार्गदर्शन करावे

गैरवापराचे परिणाम: टॅबचा गैरवापर केल्यास होणाऱ्या परिणामांबद्दल  आपल्या वसतिगृहातील तसेच शाळेतील मुलांना स्पष्ट आणि सुस्पष्ट माहिती द्या. उदाहरणार्थ, शैक्षणिक नुकसान, मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम हे सर्व त्यांच्या लक्षात आणून द्या.

योग्य वापराचे महत्त्व:  मोबाईल च्या गैरवापराचे परिणाम लक्षात आणून दिल्यानंतर तंत्रज्ञानाचा योग्य वापर कसा करायचा, याबद्दल  मुलांना शिकवा. यामध्ये शैक्षणिक साधनांचा वापर, इंटरनेट सुरक्षा, आणि वेळेचे नियोजन समाविष्ट असावे जेणेकरून मुलांना स्पष्ट दिशा मिळेल.

साधने /मोबाईल वापरासंबंधी नियमावली:  आपल्या वसतिगृहात  टॅब वापरासाठी स्पष्ट आणि सुस्पष्ट नियमावली तयार करा. प्रत्येक विद्यार्थ्याला या नियमांबद्दल माहिती असावी आणि त्यांचे पालन करावे. यासाठी वसतिगृहातील मुलगा मुलगी यांसाठी स्वतंत्र गटप्रमुखांची नेमणूक करावी जे या बाबींवर नियंत्रण ठेऊन नेतृत्व करू शकेन.

गटप्रमुख यांच्यासोबत वसतिगृह अधीक्षक यांनी  टॅब वापरताना मुलांचे पर्यवेक्षण करावे . योग्य पद्धतीने पॅरेंटल कंट्रोल्स आणि सुरक्षितता साधने वापरावीत.योग्य पर्यवेक्षण झाल्यास मुलांना योग्य सवयी आणि नियंत्रित वापर करण्याबाबत जागरूक करता येईल.

वैयक्तिक काऊंसिलिंग:  याबरोबरच वसतिगृहातील प्रत्येक मुलाशी वैयक्तिक काऊंसिलिंग सेशन घ्यावे . त्यांच्या समस्यांचा आढावा घ्यावा  आणि त्यांना योग्य मार्गदर्शन द्यावे .

समूह काऊंसिलिंग: वैयक्तिक काऊंसिलिंग सेशन्स एकत्रित काऊंसिलिंग सेशन्स घ्यावीत  ज्यात मुलांना एकमेकांच्या अनुभवांमधून शिकण्याची संधी मिळेल.

प्रशंसा आणि प्रोत्साहन: मुलांच्या चांगल्या वर्तनाचे कौतुक करावे  आणि त्यांना प्रोत्साहन द्यावे . उदा. tab चा योग्य वापराचे उदाहरण म्हणून इतर मुलांचे नाव घ्या असे आपण देखील करू शकता असे प्रेरित करावे.

वैकल्पिक सहशालेय उपक्रम : मुलांना विविध शारीरिक, सर्जनशील आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये  सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे . यामुळे तंत्रज्ञानाचा गैरवापर कमी होईल.

स्वतंत्र विचारसरणी: मुलांना स्वतंत्र विचार करायला आणि त्यांच्या निर्णयांचा विचार करायला शिकवावे .चांगले वाईट यांची निवड कारण याबाबत संवादाच्या माध्यमातून विविध उदाहरणे देऊन प्रशिक्षित करावे.

पालकांशी संवाद: पालकांशी संवाद साधून त्यांना त्यांच्या मुलांच्या वर्तनाबद्दल माहिती द्यावी  आणि त्यांचे  सहकार्य घ्यावे.

या उपाययोजनांद्वारे, किशोरवयीन मुलांना टॅबच्या योग्य वापराबद्दल मार्गदर्शन करणे आणि त्यांचा गैरवापर टाळणे शक्य होईल.

प्रश्न: शिकण्यात तंत्रज्ञान आले तसे मुले मैदानी खेळापासुन दुर जात आहे. यावर काय उपाय योजावेत

आपल्याला भेडसावणारी  हि समस्या अतिशय रास्त आणि वास्तव आहे.मुलांना तंत्रज्ञानाचे उपयोग करण्याचे शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे, परंतु मैदानी खेळापासून दुर जाण्यास तंत्रज्ञान कारणीभूत ठरू शकते हि सुद्धा दुसरी बाजू आहे. खेळाचे आपल्या जीवनातील स्थान अतिशय महत्वाचे असून बालपणाचा काळ हा अनेक खेळांच्या माध्यमातून प्रत्येकासाठी आठवणीचा ठरतो.पान हाच काळ आणि बालपणातील संस्कारक्षम मन निसर्गाच्या सानिध्यात वेगवेगळ्या खेळात  रमण्याऐवजी मोबाईल सारख्या तत्सम तंत्रज्ञानाच्या कृतींमध्ये अडकला जात असेल तर आपल्याला शिक्षक आणि पालक या नात्याने वेळीच सावध होण्याची गरज आहे. तंत्रज्ञानामुळे आपले मूल संपूर्ण जगाशी जोडले जाणार आहे तर खेळामुळे त्याचे शरीरस्वास्थ्य उत्तम राहणार आहे यासाठी आपल्याला दोन्ही बाबींचे संतुलन साधावे लागेल.  खेळाची गतिविधींमध्ये सामाजिक संवाद, स्वास्थ्य, आणि ताण इ. कंपन्या आहेत ज्यामुळे ते अत्यंत महत्त्वाचे आहे. खालील काही बाबी सुचवल्या आहेत कृपया आपल्या मुले आणि विद्यार्थी यांच्या बाबतीत त्याचा अंगीकार केल्यास आपल्याला मदत मिळेल.

नियोजन करणे-  हल्लीच्या काळात शाळेतील अभ्यास ,पूरक कृती यासाठी शाळेव्यतिरिक्त देखील मुलांचा बराच वेळ मोबाईल,संगणक या साधनंसोबत व्यतीत होत असतो यासाठी मुलांना या वस्तूंच्या वापराचे योग्य नियोजन करून द्यायला हवे.सायंकाळचा वेळ हा मुलांना आवडणाऱ्या खेळांसाठी राखून ठेवा.आपल्या आजूबाजूला असे मित्र जोडण्याची त्याला सवय लावा कि जे सायंकाळी खेळ खेळतात. कारण हल्ली मुलेसुद्धा एकत्र आली म्हणजे ते मोबाईल घेऊन बसतात.असा मित्र परिवार उपलब्ध होत नसेल तर आता अनेक मैदानी खेळांचे class उपलब्ध आहेत कोणत्याही एका खेळासाठी मुलांचा class लाऊन घ्या मित्रानो अभ्यासाचे class प्रत्येक मुलांचे असतात पान खेळाचे class सुद्धा तेवढीच आवश्यक बाब झाली आहे.आपण ग्रामीण भागात राहत असाल तिथे अशा सुविधा नसतील तर खेळाची साधने विकत घ्या.आपण स्वतः मुलांना वेळ द्या आणि खेळाची सवय लावा.असे केल्याने त्यांना खेळाची आवड निर्माण होईल आणि काही काल ते तंत्रज्ञानापासून दूर राहतील.

अति मोबाईल वापराचे दुष्परिणाम लक्षात आणून देणे–  मोबाईल चा अतिरिक्त वापर केला तर विविध  शारीरिक ,मानसिक समस्या उपस्थित होऊ शकतात याबाबत आपल्या मुलांशी संवाद साधा.अति मोबाईल वापरून समस्या निर्माण झाल्याची उदाहरणे मुलांसमोर ठेवा यातून मुले विचारप्रेरीत होतील आणि गरजेपुरताच वापर करतील.

अनेक खेळ आणि खेळाडू यांचा परिचय करून देणे – कधी कधी मुलांना बाहेर जाऊन काय खेळावे हा प्रश्न पडतो.पालक आणि शिक्षक म्हणून आपण आपल्या देशातील तसेच परदेशातील ख्यातनाम खेळाडूंचा परिचय करून द्यावा.खेळात सुद्धा उत्तम करियर करता येते हि बाब त्यांच्या लक्षात आणून द्या.जेणेकरून त्यांच्या मनात खेळाविषयी प्रतिष्ठा निर्माण होईल आणि ते दिवसातील काही वेळ खेळ खेळतील.

फावल्या वेळात इनडोअर खेळ खेळणे – आपल्या मुलांना नेहमीच मैदानी खेळ खेळण्यासाठी बाहेर जाने शक्य होईलच असे नाही अशा वेळी कॅरम , बुद्धिबळ ,पत्ते, नवा व्यापारी  असे खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.

अशाप्रकारे वरील उपाययोजना करून आपल्याला वाटणाऱ्या काळजीतून नक्कीच मुक्त होता येणार आहे.

प्रश्न: शिक्षकाला तंत्रज्ञानाची आवड नसेल तर ते मुलांना मोबाईल , संगणक  या बाबीपासुन दूर ठेवतात अशा वेळी मुलांचे नुकसान होण्याची काळजी वाटते 

शिक्षकांना तंत्रज्ञानाची आवड नसल्यास किंवा त्यांच्याबाबतीत तंत्रज्ञानाबद्दल कमी आत्मविश्वास असेल, तर मुलांचे नुकसान होऊ शकते, कारण तंत्रज्ञानाच्या उपयोगातून विद्यार्थ्यांना अनेक फायदे मिळतात. शिक्षकांना तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यास मदत करण्यासाठी खालील उपाययोजना करता येऊ शकतात:

शिक्षकांचे तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण: तंत्रज्ञान हाताळण्याबद्दल बरेचसे शिक्षक उत्साही दिसत नाहीत किवा त्यांना त्याची गरज वाटत नाही यासाठी  शिक्षकांना तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराबद्दल प्रशिक्षण द्यावे लागेल. हे करत असताना यामध्ये विविध शैक्षणिक अॅप्स, सॉफ्टवेअर आणि ऑनलाइन संसाधनांचा वापर शिकवावा जेणेकरून शिक्षक तंत्रस्नेही होतील आणि त्यांना तंत्रज्ञानाबद्दल आवड निर्माण होईल.

संवाद प्रशिक्षण कार्यशाळा: वरील समस्येवर मात करण्यासाठी आपल्याला प्रशासनाशी योग्य संवाद आणि समन्वय साधून  नियमितपणे तंत्रज्ञानविषयक कार्यशाळाचे  आयोजन करता येईल ज्यामुळे शिक्षकांना नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेता येईल.

निरुत्साही शिक्षकांना प्रेरणा  आणि प्रोत्साहन :- तंत्रज्ञानाबाबत आपले शिक्षक निरुत्साही असतील तर ते मुलांपर्यंत ते पोचवण्यास कंटाळा करतील यासाठी अशा  शिक्षकांना तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराबद्दल वेळोवेळी प्रोत्साहन द्यावे लागेल आपल्या शाळेतील अशा शिक्षकांना आपण अशी प्रेरणा नक्कीच देऊ शकतो ज्याने त्यांच्यात सुधारणा होऊन ते देखील तंत्र्स्नेही होतील.

यशोगाथा शेअर करणे : जे शिक्षक  तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ घडवून आणत आहेत अशा शिक्षकांच्या यशोगाथा  whats app तसेच विविध साधनांच्या मदतीने शेअर करावे , ज्यामुळे शिक्षकांना तंत्रज्ञानाच्या उपयोगाचे फायदे समजतील.

तंत्रज्ञानाचा पूरक वापर करण्याबाबत जाणीव जागृती : पारंपारिक शिक्षण पद्धतींसोबत तंत्रज्ञानाचा पूरक वापर कसा करता येईल यावर चर्चा करावी . उदा. शिक्षणाच्या विविध टप्प्यांवर तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत शिक्षकांमध्ये जाणीवजागृती करावी,

या उपाययोजनांद्वारे शिक्षकांना तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यास मदत करता येईल आणि विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून शिक्षणाची गती वाढवता येईल.

प्रश्न: मोठ्या शाळांमध्ये शिक्षक संख्या जास्त असते सिनियर शिक्षक आणि नवनियुक्त शिक्षक यांच्यात तंत्रज्ञान वापरासंदर्भात मतभेद होत असतात. नवीन शिक्षक तंत्र स्नेही आहेत तर जुने शिक्षक प्रत्यक्ष पुस्तकावर भर देत तंत्रज्ञान वापरावर बहिष्कार टाकतात. दोघेही आपापल्या शिक्षण पद्धतीचे समर्थन करतात. ही समस्या कशी सोडवता येईल

अतिशय रास्त अशी समस्या आपण मांडली आहे.मोठ्या शाळेमध्ये शिक्षक संख्या जास्त असते.शिक्षकांमध्ये देखील व्यक्ती तितक्या प्रव्रुती हा मानस शास्राचा नियम लागू होतो.  अनुभवी शिक्षकांना पेन पेपर मेथड तसेच प्रत्यक्ष पुस्तक आधारित शिकणे या प्रणाली चे समर्थन करतात. हार्ड वर्क हि यांच्या कामाची पद्धत असते.पाठांतर ,घोकंपट्टी यांचा पुरस्कार कारणही हि मंडळी तंत्रज्ञानाबाबतीत काहीसे उदासीन दिसतात( हे 100% शिक्षकांसाठी लागू होईलच असे नाही अपवाद असू शकतात) याउलट तरुण शिक्षक मंडळी मात्र तंत्रस्नेही असून यांचा संपूर्ण भर स्मार्ट वर्क करण्यावर असून ते मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा पुरस्कार करतात.बाहेरच्या जगात काय सुरुय याचा परामर्श घेऊन त्या गतीने मुलांना या सर्व सोयीसुविधा असाव्यात यासाठी आग्रही असतात.एकाच शाळेत जेव्हा अशा दोन विचारांची माणसे एकत्र आल्यावर मत मतांतरे होतातच शिवाय काही वेळा वादाचे प्रसंग देखील उद्भवतात.इथे या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण हा विचार करूया कि दोन्ही पकारच्या शिक्षकांचे ध्येय एकच आहे जे म्हणजे मुले शिकली पाहिजेत.फक्त विचार करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते.अशा वेळी एक माणूस म्हणून आपण या समस्येच्या मुळाशी जाऊन उपाययोजना करायला हव्यात.खाली उदाहरणादाखल काही मुद्दे सुचवले आहेत त्याची मदत घेऊन मार्ग काढता येईल.

मला काय आवडते यापेक्षा मुलांसाठी काय योग्य असेल याचा विचार करणे :- आपले अनुभव आपल्या आवडी निवडी यांचा विचार बाजूला ठेऊन मी शिक्षक म्हणून कोणत्या बाबी स्वीकारणे योग्य होईल याचा सर्व शिक्षकांनी विचार करावा.सध्याचे युग तंत्रज्ञानाचे आहे म्हणून शिकण्यात तंत्रज्ञान आणणे त्याचा योग्य उपयोग करणे आणि आपल्या शाळेतील मुलांचे शिकणे गतिमान करणे यात एकमत आणावे.

संवाद कार्यशाळेचे आयोजन:-  नवे जुने दोन्ही प्रकारच्या शिक्षकांनी संवाद शाळेच्या निमित्ताने एकत्र येणे अतिशय गरजेचे असेल.या संवाद कार्यशाळेत प्रत्येक शिक्षकाला आपली मते निर्भीडपणे मांडण्याची संधी मिळावी. वाद विवाद न करता  तसेच एकमेकांवर आपली मते न मांडता शांतपणे सर्वाना ऐकून घ्यावे.शेवटी शाळेच्या प्रगतीच्या दृष्टीने योग्य निर्णय घ्यावा.आपल्या शिक्षण क्षेत्रात बऱ्याच अडचणी अपुऱ्या संवादामुळे घडतात.योग्य वेळी संवाद घडला तसेच प्रत्येक घटकाच्या मतांचा आदर केला तर अनेक अडचणी शाळास्तरावर सोडवल्या जाऊ शकतात.ज्या शाळा प्रगतीपथावर आहेत त्या शाळेच्या यशात संवाद कौशल्याचा फार मोठा वाट आहे हे चिंतनातून आणि निरीक्षणातून,वाचनातून आपल्या लक्षात येईल.टीम वर्क असणे महत्वाचे आहे.

पेन पेपर मेथड तसेच नवीन तंत्रज्ञान युक्त अध्यापन पद्धती यांचा ताळमेळ साधने:- सर्वांगीण प्रगतीचे उद्दिष्ट गाठायचे असेल तर कोणतीही एकच एक पद्धत वापरून चालणार नाही. प्रत्यक्ष पुस्तकाच्या मदतीने संबोध स्पष्टीकरण आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने सराव,अधिक शिकणे असे केले तर मुले आनंदाने शिकतील आणि शिकणे कंटाळवाणे होणार नाही.

समुपदेशन सत्रे: वरिष्ठ आणि नवीन शिक्षकांसाठी समुपदेशन सत्रांचे आयोजन करून, त्यांच्या ताणतणावाचे निराकरण करणे.या समस्येवर मार्ग काढण्याच्या दृष्टिने हितकारक असेल.

प्रोत्साहन आणि समर्थन:  कोणत्याही एका गटाच्या शिक्षकांच्या मतांचे समर्थन न करता दोन्ही गटांना त्यांच्या कामात प्रोत्साहन देणे आणि योग्य मार्गदर्शन करणे योग्य असेल.

मुले पालक यांची मते विचारात घेणे:-  तंत्रज्ञान वापर तसेच पुस्तक पद्धतीवर भर याबाबत मुले पालक यांची  काय मते आहेत? मुलांना कोणती पद्धत अधिक आवडणार आहे? पालक याबाबत काय विचार करतात या सर्व बाबी बारकाईने शिक्षक पालक सभेत चर्चिल्या गेल्या तर योग्य निर्णय घेता येईल.ज्या शिक्षकांचा खूपच विरोध असेल अशनी मुले पालक यांच्या मताशी समन्वय साधून निर्णय घेणे सोपे जाईल.

संयुक्त प्रशिक्षण: वरिष्ठ आणि नवीन शिक्षकांसाठी संयुक्त प्रशिक्षण आणि कार्यशाळा आयोजित कराव्यात . यामुळे एकमेकांच्या पद्धती आणि तंत्रज्ञानाचा वापर शिकण्याची संधी मिळेल.

नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण: वरिष्ठ शिक्षकांना तंत्रज्ञानाच्या नवीन साधनांबद्दल प्रशिक्षण देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवल्यास त्यांचा विरोध कमी होईल. कारण बऱ्याच वेळा तंत्रज्ञान हाताळता येत नाही म्हणून विरोध निर्माण होत असतो.अशा वेळी आपल्या वरिष्ठ शिक्षकांना प्रशिक्षित केल्यास ते आपल्या सोबत येतील.नवीन तंत्र शिकून घेऊन त्याचा उपयोग करतील.

अशाप्रकारे वरील उपाययोजनांच्या माध्यमातून वरिष्ठ आणि नवीन शिक्षकांमध्ये तंत्रज्ञानाच्या वापराबाबत समन्वय साधता येईल आणि विद्यार्थ्यांना विविध पद्धतींचा लाभ मिळेल.

प्रश्न: सध्या अनेक देश  ऑनलाईन शिक्षा प्रणालीला विरोध करत असुन पेन पेपर मेथड चा उपयोग करण्यावर भर देत आहेत . अशा वेळी संभ्रमावस्था निर्माण होत आहे

ऑनलाइन शिक्षण प्रणाली आणि पारंपारिक पेन- पेपर पद्धतीमधील संभ्रमावस्था अनेकांच्या मनात आहे. दोन्ही पद्धतींमध्ये काही फायदे आणि तोटे आहेत, आणि संतुलन साधणे महत्त्वाचे आहे. खालील उपाययोजनांनी या संभ्रमावस्थेवर मात करण्याचा प्रयत्न करता येईल:

दोन्ही पद्धतींचे फायदे समजावणे

ऑनलाइन शिक्षणाचे फायदे:  ऑनलाइन शिक्षण प्रणाली चा सर्वात मोठा फायदा म्हणजे विद्यार्थी कधीही आणि कुठेही शिक्षण घेऊ शकतात. एकाच  शिक्षकाकडून शिकण्यापेक्षा अनेक पर्याय उपलब्ध होतात.आपले मूल जगाशी जोडले जाते म्हणून विचारप्रक्रिया देखील व्यापक होते. तंत्रज्ञान घरी बसल्या उपलब्द्ध होत असल्याने बाहेर जाऊन शिक्षण घेण्यात खर्च होणारा वेळ वाचवता येतो. ऑनलाइन शिक्षण प्रणाली चे असे अनेक फायदे आपल्याला सांगता येतील.

विविध संसाधनांची उपलब्धता:  विविध ऑनलाइन  platforms वर विविध शैक्षणिक साधने, व्हिडिओ, ऑडिओ, ई-बुक्स इत्यादींची सहज  उपलब्धता होते ज्यातून विविध विषयांचे ज्ञान मिळवणे सोपे होते.

तंत्रज्ञानाशी परिचय: ऑनलाइन शिक्षण प्रणाली मुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या वापराची ओळख होते, ज्यामुळे त्यांची डिजिटल साक्षरता वाढते.

पेन-पेपर पद्धतीचे फायदे:

लिखाणाची सवय:  पेन-पेपर पद्धतीमध्ये जास्तीत जास्त भर प्रत्यक्ष वाचन आणि लेखन कृतींवर असल्यामुळे मुलांना  लिखाणाची सवय होते आणि हस्ताक्षर सुधारते,सोबतच मुलांना एका जागी बसून अभ्यासाची सवय लागून एकाग्रता वाढते.

व्यक्तिगत संपर्क: पेन-पेपर पद्धतीमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष संपर्क आणि संवाद होतो हा अतिशय महत्वाचा फायदा या पद्धतीचा आहे,प्रत्यक्ष संवाद केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील शंका प्रश्न प्रत्यक्ष भेटून दूर करता येतात.शिक्षक आणि मुलांमध्ये संभाषण  होत असल्याने त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित होतात त्यातून आत्मविश्वास निर्माण होऊन सर्वांगीण  प्रगतीचे लक्ष्य प्राप्त करता येते.

डिजिटल थकवा कमी होतो: पेन-पेपर पद्धतीमुळे मुलांचा स्क्रीन टाईम वाचतो तसेच  स्क्रीनवर कमी वेळ घालवल्यामुळे , डोळ्यांचे आणि मानसिक आरोग्याचे संरक्षण होते.

संमिश्र  पद्धतीचा अवलंब :

दोन्ही पद्धतींचे फायदे वरीलप्रमाणे असून शिक्षक म्हणून आपण कोणत्याही एकाच पद्धतीने मुलांसोबत काम न करता संतुलित शिक्षण पद्धतीचा अवलंब केला तर मिळणारे परिणाम दर्जेदार असतील तसेच दोन्ही पद्धतींचे जे काही तोटे आहेत त्यावर सहज मात करता येईल. यासाठी शिक्षकांनी वरील दोन्ही पद्धतींचा संमिश्र पद्धतीने उपयोग करायला हवा.यासाठी काही विषय किंवा अभ्यासक्रम ऑनलाइन शिकवणे, तर काही विषय पेन-पेपर पद्धतीने शिकवणे.असे नियोजन असायला हवे.

साप्ताहिक नियोजन : आठवड्यातील काही दिवस ऑनलाइन शिक्षण आणि काही दिवस पारंपारिक शिक्षण ठेवणे. असे नियोजन केल्यास दोन्ही पद्धतींचा समन्वय साधला जाऊन शिकण्याच्या प्रक्रियेत वैविध्य आणता येईल. पारंपारिक पद्धतींचा वापर करून शिक्षणात विविधता आणता येईल  जसे की प्रकल्प, प्रयोग आणि कृती आधारित शिक्षण.

शिक्षकांचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन: शिक्षकांना तंत्रज्ञानाचा योग्य वापर शिकवावा लागेल , ज्यामुळे ते प्रभावीपणे ऑनलाइन शिक्षण देऊ शकतील.

विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे समुपदेशन: पालक आणि विद्यार्थी या दोघांसोबत प्रत्यक्ष संवाद साधून आपल्याला दोन्ही पद्धतींचे फायदे आणि तोटे स्पष्ट करावे लागतील कारण पालक शिक्षक यांच्या मनात दोन्ही पद्धतींबाबत काही प्रश्न किवा सूचना असू शकतील ज्या संवादाच्या मदतीने समजून घेता येतील.कोणत्याही एकाच पद्धतीचा आग्रह न धरता समन्वय कसा साधावा याचे दोन्ही घटक म्हणून नियोजन आणि व्यवस्थापन करता येईल.तसेच

प्रत्यक्ष भेटून पालकांची भूमिका  शिक्षकांनी समजून सांगावी यासाठी पालकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांच्या शंकांचे निरसन करणे आवश्यक असेल.

अशाप्रकारे दोन्ही पद्धतींचे फायदे आणि तोटे लक्षात घेता, संतुलित शिक्षण प्रणालीचा अवलंब करणे सर्वात योग्य ठरू शकते. शिक्षक, पालक, आणि विद्यार्थी यांचा सहभाग आणि संवाद यांद्वारे योग्य मार्ग शोधता येईल.आणि शिक्षक आणि पालक यांच्या मनातील संभ्रवस्था दूर करता येईल.

प्रश्न: आम्ही VJNT शाळेत मुलांना शिकवतो शासनाने मुलांना टॅब दिले आहेत. परंतु ते ऑफिसमध्ये जमा करून घेतले जातात.

मुलांना शासनाने दिलेले टॅब ऑफिसमध्ये जमा करून घेतल्यास त्यांचा शैक्षणिक उपयोग होण्याची संधी कमी होते. या समस्येचे समाधान शोधणे आणि टॅबचा योग्य वापर सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे. खालील उपाययोजना विचारात घेता येऊ शकतात:

मुख्याध्यापक आणि प्रशासनाशी संवाद- आपले मुख्याध्यापक किवा शाळाप्रमुख यांच्या मोबाईल जमा करून घेणे याबाबत नेमके काय विचार आहेत अशी कोणती करणे आहेत ज्याने त्यांनी हा निर्णय घेतला याबाबत मुख्याध्यापक आणि प्रशासनाशी  सकारात्मक संवाद साधून त्यांना टॅबच्या उपयोगाचे महत्त्व समजावून सांगावे लागेल. टॅबच्या वापराचे फायदे स्पष्ट करा, जसे की अभ्यासक्रमात विविधता, सुलभ शिक्षण साधने, आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे प्रभावी मोजमाप करता येणे.यासोबतच त्यांच्या लक्षात आणून द्यावे कि शासनाने जर मुलांना हि साधने उपलब्ध करून दिली असतील तर त्याचा उपयोग करणे अपेक्षित असेल.

काळजीतून बाहेर काढा– आपल्या मुख्याध्यापकांच्या मनात tab विषयी अनेक प्रश्न तसेच त्याच्या वापरासंबंधी संभ्रम असतील जसे मुले tab खराब करतील नादुरुस्त वस्तू दुरुस्तीसाठी अनुदान येत नाही , मुले tab वर शिकतील तर शिक्षक रिकामे बसतील त्यांना काम नसेन, प्रत्यक्ष पुस्तक शिकवणे योग्य आहे मोबाईल ची काही गरज नाही इ.अशी अनेक करणे असू शकतात हि कारणे समजून घेऊन त्यांना वाटणाऱ्या काळजीतून बाहेर काढावे आणि त्यांना विश्वास द्यावा कि tab मुळे मुलांचे गतीने शिकणे झाले तर आपली शाळा पुढे जाणार आहे तंत्रज्ञान हि काळाची गरज आहे आणि उपलब्ध झाले आहे तर मुलांना त्याचा फायदा करून द्यायला हवा. आणि यासोबतच वस्तू खराब झाल्यास त्याची जबाबदारी स्वतः शिक्षकांनी घेण्याची तयारी दर्शवावी.कदाचित आपण जबाबदारी घेणार असाल तर ते tab देण्यास तयार होतील. तसेच tab हे इलेक्ट्रॉनिक साधन आहे ते वापरले नाही पडून राहिले तर असेही खराब होणार आहे हि बाब लक्षात आणून द्यावी.

मुलांचे शिकणे आणि फायदे लक्षात आणून द्यावे– आपल्या समूहातील ज्या शाळांवर tab उपलब्ध आहेत आणि मुलांना दिले आहेत त्या शाळेतील मुलांना शिकण्यात  त्याचा कसा फायदा होत आहे याची उदाहरणे आपल्या मुख्याध्यापक सरांसमोर ठेवावीत. त्या शाळेची मुले कशी अधिक गतीने शिकत आहेत याची उदाहरणे द्यावी शक्य असल्यास अशा शाळेच्या प्रमुखांशी आपल्या मुख्याध्यापक सरांचे बोलणे करून द्यावे.

पालकांना सोबत घेणे – tab वापराचे फायदे पालकांना समजावून द्यावे. पालकांना मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधून मुलांना या वस्तू उपलब्ध करून देण्याबाबत संवाद करण्यास सांगावे. पालकांना निवेदन देण्यास सांगावे.कदाचित पालक सोबत आले तर या अडचणीवर मार्ग निघेन.

प्रशासनाशी संपर्क – शक्यतो सुरवातीला आपल्या स्तरावर बोलणी करावी.सामोपचाराने समस्या सोडवावी.सर्व पर्याय वापरून झाले तरी यश येत नसल्याचे दिसत असेल तर आपल्या वारीष्टांशी बोलावे आपल्या शाळेत tab वापराबाबत जि अडचण येत आहे ते त्यांना लेखी कळवावे.

प्रश्न: मुलांच्या शिकण्याची गती वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाचा उत्तम प्रकारे उपयोग कसा करून घ्यावा

मुलांच्या शिकण्यासाठी तंत्रज्ञान तर उपलब्ध झाले पण त्याचा योग्य आणि परिणामकारक उपयोग करून घेणे हि देखील महत्वपूर्ण बाब आहे.आपल्याला अशा काही बाबी शोधाव्या लागतील त्याने आपल्या मुलांच्या शिकण्याची गती वाढेल. उदा.बीड जिल्ह्यातील मझालगाव तालुक्यातील  vjnt मुलांची आश्रमशाळा वारोळा येथील मुले google ट्रान्सलेशन या app च्या मदतीने जपानी भाषा शिकत आहेत. या app च्या मदतीने मुलांची इतर भाषा शिकण्याची गती झपाट्याने वाढली असून त्या संपूर्ण शाळेचा गुणात्मक दर्जा वाढला आहे.खाली काही पर्याय सुचवले आहेत त्याचा अभ्यास करूया.

वेगवेगळ्या interactive platform चा शोध घेणे- विविध अभ्यासक्रमाच्या बाबतीत आता अनेक interactive platform उपलब्ध झालेले आहेत.घरी बसल्या मुलांना जगतीत उत्तम शिक्षकांकडून शिकणे शक्य झाले आहे याचा उपयोग आपल्या मुलांसाठी करून घ्यावा अशा sites चा शोध घेऊन आपल्या मुलांच्या शिकण्याला गती द्यावी.

गतीपूर्ण आणि सामग्रीपूर्ण शिक्षण साधने– गतिपूर्ण आणि सामग्रीपूर्ण शिक्षण साधने वापरून मुलांना विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता, कल्पनाशक्ती, आणि स्मरणशक्ती वाढेल.

इंटरऍक्टिव्ह लर्निंग साधनांचा उपयोग करणे– इंटरऍक्टिव्ह लर्निंग साधनांचा वापर करून मुलांना शिक्षण प्रक्रियेत सक्रिय सहभागी करून  घेतली जाते आणि त्यांच्या ज्ञानात भर पडून समज विकसीत होते .परिणामी शिकण्याची गती देखील वाढते.

तंत्रज्ञानाची विविधता आणि वापर – तंत्रज्ञानाची खोली आणि व्यापकता मोठी आहे इथे जेवढा शोध घेतला जाईल तेवढी विविधता दिसणार आहे.हि बाब आपण शिक्षक पालकांनी लक्षात घ्यावी.परदेशातील मुले उत्तम तंत्रज्ञानाचा त्यांच्या शिकण्यात उपयोग करून घेतात.जापान ,चीन सारखे देश यासाठी उदाहरण समजले जातात.या देशांकडून आपली मुले किवा आपली शिक्षण व्यवस्था काय शिकू शकते हा विचार केंद्रस्थानी ठेवावा त्याचा मुलांच्या शिकण्यात उपयोग करून घ्यावा.

अशाप्रकारे तंत्रज्ञानात कुशल व्यक्ती वरील पर्यायासोबत अधिकचे मार्ग शोधू शकतील आणि आपल्या मुलांचे शिकणे गतीने व्हावे यासाठी उत्तम नियोजन, व्यवस्थापन आणि नेतृत्व करू शकतील.

भविष्यवेधी शिक्षणाची सहावी पायरी- Selfie With Success

प्रश्न: लहान वयोगटातील मुले सेल्फिला उत्तम प्रतिसाद देतात परंतु मोठ्या वर्गातील मुले सेल्फिच्या प्रेरणेने अभ्यास करत नाहीत या अडचणीवर कशी मात करता येईल?

भविष्यवेधी शिक्षण प्रक्रियेला यशस्वी आणि परिणामकारकतेचा दर्जा मिळवून देण्यात सेल्फी विथ सक्सेस या उपक्रमाचा अतिशय मोठा वाटा आहे. या  शिक्षण प्रक्रियेतील दुसरी पायरी म्हणजे शिकण्याच्या प्रक्रियेत आव्हान देणे या बाबीवर काम करत असताना मुलांनी पूर्ण केलेल्या आव्हानांच्या मोबदल्यात तसेच दैनंदिन वर्गाप्रक्रियेत मुले जे  लहान मोठे यश मिळवत असतात ते यश साजरे करणे आणि त्याचे सार्वत्रिकीकरण करणे याचे काम सेल्फी विथ सक्सेस या उपक्रमाच्या माध्यमातून होत असते. शिक्षकांनी सेल्फी विथ सक्सेस या प्रक्रियेवर काम करण्याआधी त्याचे महत्व समजून घेणे अतिशय गरजेचे आहे.मुलांचे फोटो काढणे एव्हढाच मर्यादित अर्थ याचा नाही.आपल्या वर्गात शिकणारे मूल हे आपल्या संपूर्ण प्रक्रियेतील महत्वाचा घटक असून मुलांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा आणि त्यांच्या शिकण्याच्या नैसर्गिक पद्धतीला चालना देणे आणि प्रोस्ताहन देण्याचे काम सेल्फिच्या माध्यमातून होत असते. वरील प्रश्नाच्या अनुषंगाने काही शिक्षकांना अशा समस्येचा नक्कीच सामना करावा लागू शकतो.लहान मुले अतिशय निरागस असतात इयत्ता पहिली ते चौथी या वर्गात शिकणाऱ्या मुलांना सेल्फिच्या मदतीने प्रेरित करताना अडचण येत नाही कारण मुले लहान असतात.त्यांना आपले कौतुक झालेले आवडत असते.आपल्या बाई किवा सरांसोबत फोटो निघणे हि बाब त्यांना मोठी वाटते म्हणून या वयोगटातील मुले सेल्फिच्या प्रेरणेने अशक्यकोटीची कामे पूर्ण करून दाखवतात परंतु हीच मुले जेव्हा वयाने मोठी होत जातात तेव्हा किवा भविष्यवेधी प्रणालीचा पुरेसा कालावधी लोटून गेल्यानंतर हि प्रक्रिया त्यांना तोच तोच पणा वाटू शकते.आव्हान पूर्ण केल्यावर सेल्फी चा आनंद नेहमीच सारखाच असेल असे नाही. यासाठी सेल्फिसोबत इतरही बाबी आपल्याला शोधून काढाव्या लागतील.खालील काही बाबींची मदत घेता येईल.

सेल्फिचे महत्व पटवून देणे : आपल्या शिक्षकांसोबत सेल्फी काढणे हि बाब आपल्या शिकण्याच्या प्रक्रियेसाठी किती लाभदायक आहे हे मुलांना पटवून सांगणे. आपण काढलेले सेल्फी शाळा ,प्रशासन ,पालक यांच्यापर्यंत जातात म्हणजे तुमच्या शिकण्याची प्रक्रिया अनेक ठिकाणी शेयर होते ज्याने विद्यार्थी आणि शिक्षक दोघांचा नावलौकिक वाढतो हि बाब मोठ्या वर्गातील मुलांच्या लक्षात आणून द्यावी.

मुलांच्या कलाने घेणे: मोठ्या वर्गातील मुलांना सेल्फी घेणे आवडतेच असे नाही पण हि मुले आव्हाने मात्र पूर्ण करतात अशा वेळी शिक्षकांनी सेल्फिचा आग्रह टाळावा.शेवटी मुलांचे शिकणे महत्वाचे आहे हि बाब लक्षात घ्यावी,मुलांची आवड आणि कल लक्षात घेऊन कार्यवाही करावी.

सेल्फी ऐवजी नवीन मार्ग शोधावेत:- मुलांना प्रेरित करण्याचे मार्ग विविधांगी असू शकतात आपापल्या कार्यक्षेत्राप्रमाणे शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधावेत.उदा. मुलानो विज्ञान विषयातील हा पाठ तुम्ही दिलेल्या वेळात peer learning ने शिकून पूर्ण केला तर मी तुम्हाला आपल्या गावच्या नदीवर पोहण्यासाठी नेणार आहे असे जर एखाद्या  शिक्षकांनी सांगितले तर मुले प्रेरित होऊन वेळेत काम पूर्ण करतील .अशा वेळी सेल्फी घ्यावीच असे नाही.वर्गातील प्रत्येक मूल आपापल्या गतीने शिकण्याचा भाग पूर्ण करेल.

संवाद साधावा :- आपल्या  शाळेतील मोठ्या वर्गातील मुले सेल्फी काढण्यात रस दाखवत नसतील तर त्यांचे याबाबतीत नेमके काय विचार आहेत हे जाणून घेणे आपल्यासाठी महत्वाचे ठरेल यासाठी मुलांशी सातत्याने संवाद साधावा. त्यांचे विचार अनुभव जाणून घ्यावे आणि सेल्फिचे महत्व आणि उद्देश पटवून द्यावा.

     अशाप्रकारे कल्पकतेने आपल्या कार्यक्षेत्राचा अंदाज घेऊन वरील अडचणीवर मार्ग काढता येईल.

प्रश्न: वर्गाची पटसंख्या जास्त असली तर खूप मुले आव्हाने पूर्ण करतात.सर्वांची सेल्फी घेण्याच्या प्रक्रियेत खूप वेळ जातो?

खरतर तुम्ही खूप खुश व्हायला हवे कि तुमच्या वर्गात जास्त मुले आहेत आणि आव्हान पूर्ण करण्याची चुरस मुलांमध्ये लागलेली आहे. तुम्हाला फक्त प्रेरणेच्या पातळीवर मुलांसोबत राहायचे आहे. अशी स्थिती उपस्थित होत असेल तर आपल्या वर्गात भविष्यवेधी शिक्षण प्रणालीवर अतिशय उत्तम काम सुरु आहे आणि त्यासाठी आपण अभिनंदनास पात्र आहात. ज्या प्रक्रीयेने वर्गातील मुलांच्या शिकण्याची गती वाढत असेल अशा वेळी जास्त मुले असतील तरी सेल्फी विथ सक्सेस घेणे आपल्या दृष्टिने हितकारक आहे. कारण आपल्याला जरी वाटत असेल कि वेळ बराच जातो तर असर पातळीच्या मुलांसाठी पारंपारिक पद्धतीने शिकवताना आपली होणारी स्थिती आणि परिश्रम प्रत्येक शिक्षकाने आठवून पाहावा. सेल्फी हे एक प्रकारचे एनर्जी बुष्टर सारखे काम करते.माझ्या मित्राने आव्हान पूर्ण केले तसे मी सुद्धा करायला हवे म्हणजे माझा देखील सेल्फी काढला जाईल हि भावना मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार करते आणि वर्गात मुलांमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण होते.आपणास मदत व्हावी या उद्देशाने काही मुद्दे सुचवत आहे.

गृप सेल्फी घेणे :- वर्गाची पटसंख्या जास्त आहे अशा वेळी आव्हान पूर्ण करणाऱ्या प्रत्येक मुलाचा स्वतंत्र  सेल्फी काढण्याऐवजी पहिले आव्हान पूर्ण करणारी 5 मुले नंतर 5 च्या गटाने सेल्फी घ्यावा. तो गटावर तसेच स्वतःच्या whats app status ,इंष्टाग्राम स्टोरी च्या माध्यमातून प्रसारित करावे जेणेकरून मुलांना प्रोत्साहन मिळेल,मुलांमध्ये समूह भावना निर्माण होईल.याचा अजून एक फायदा म्हणजे वैयक्तिक आव्हानासोबत मुले गटाने आव्हाने पूर्ण करण्यास प्रेरित होतील.

सेल्फी उपक्रमात  विषयमित्र ,शाळेचे मुख्याध्यापक यांची मदत घ्यावी :- वर्गाची पटसंख्या जास्त आहे अशा वेळी एकटा शिक्षक सेल्फिची प्रक्रिया राबवत असेल तयार त्यात जाणारा वेळ कमी करण्यासाठी आपल्या वर्गातील विषय मित्र यांची मदत घ्यावी त्यांना देखील या कृतीने आनंद मिळतो कारण मुलांच्या आव्हान पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत विषयमित्रांचे मोठे योगदान असते.याचबरोबर काही मुलांचे सेल्फी साठी आपले मुख्याध्यापक तसेच वरिष्ठ शिक्षक यांना आमंत्रित करावे.या कृतीने मुलांना आनंद होईल अधिक प्रोत्साहन मिळेल.याबरोबरच आपल्या मुख्याध्यापक सरांना देखील आपण सन्मानित करण्याचा आनंद मिळेल. पालकांना प्रोत्साहन:- अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन करत असताना या प्रक्रियेत पालकांना सामावून घेणे महत्वाचे आहे.पालक सभांच्या माध्यमातून पालक आपल्या पाल्याच्या अभ्यासात कशी मदत करू शकतात याबाबत प्रबोधन करावे. मुलांना शाळेच्या वेळेव्यतिरिक्त देखील शिक्षकांनी वेगवेगळी आव्हाने पूर्ण करण्यासाठी दिलेली असतात या उपक्रमात घरी आव्हान पूर्ण केले असता पाल्यासोबत सेल्फी काढून शाळेच्या गृप वर शेयर करण्यास पालकांना प्रोत्साहन द्यावे. या माध्यमातून पालकांना सोबत घेता येईल,शिक्षकांवरचा भार कमी होईल.

प्रश्न: असर पातळीच्या मुलांची अभ्यासात गती कमी असल्याने त्यांना कमी प्रमाणात सेल्फी ची संधी मिळते अशा वेळी मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होण्याची भीती वाटते?

प्रशिक्षणात आपण शिकलो की प्रत्येक वर्गात  खालील तीन प्रकारची मुले असतात.

ज्यांची शिकण्याची गती कमी आहे अशी मुले ASER पातळी

ज्यांची शिकण्याची गती मध्यम  आहे अशी मुले NAS  पातळी

ज्यांची शिकण्याची गती जास्त  आहे अशी मुले PISA  पातळी

या तीनही पातळीच्या मुलांच्या शिकण्याची गती भिन्न असल्याने यांना दिले जाणारे काम सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे त्यांच्या शिकण्याच्या गतीनुसार द्यायला हवे. जर आपल्याला प्रश्नात उल्लेख केल्याप्रमाणे असर च्या मुलांना सेल्फी ची संधी कमी मिळते असे अनुभवास येत असेल तर सर्वात आधी आपण याबाबत स्पष्टता आणावी कि असे घडत असेल तर आपल्याकडून मुलांच्या शिकण्याच्या गतीनुरूप आव्हाने दिली जात नाहीयेत यासाठी खालील उपाययोजना कराव्यात,

आव्हाने देताना मुलांच्या शिकण्याच्या गतीचा विचार करावा:- वर्गस्तरावर काम करताना बऱ्याच वेळा एकाच प्रकारचे आव्हान वर्गातील तीनही प्रकारच्या मुलांना दिले जाते.सर्वाना सरसकट आव्हान दिल्यामुळे पिसा पातळीची मुलांना ते सोपे वाटते कारण त्यांच्या शिकण्याची गती जास्त असते,नास पातळीची काही मुले आव्हान पूर्ण करतात पान असर स्तरातील मुले मात्र या प्रक्रियेत मागे पडतात कारण त्यांना जे येते त्यावर आधारित हि आव्हाने असतीलच असे नाही. याचा परिणाम म्हणजे त्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो कारण आव्हान पूर्ण करण्यात त्यांना अपयश आलेले असते.असे आपल्या विद्यार्थ्यांबाबत होवू नये यासाठी आव्हाने देताना मुलांच्या शिकण्याच्या गतीचा विचार करावा.स्तरनिहाय सोपी ,मध्यम,अवघड अशी आव्हाने द्यावीत. मुलांना जे येते त्याच्या एक पाऊल पुढचे उद्दिष्ट गाठणारे आव्हान असावे.

अभ्यासेतर विषयांचे आव्हाने द्यावीत :- सुरवातीच्या टप्यात असर पातळीच्या मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अभ्यासेतर विषयांची आव्हाने द्यावीत जी पूर्ण करणे या मुलांना शक्य होईल. असे केल्याने या मुलांसोबत सेल्फी घेणे शक्य होईल. एकदा कि मुले आव्हान स्वीकारण्यास तयार झाली कि मग त्यांना अभ्यास विषयांची आव्हाने द्यावीत .

प्रोत्साहनपर संवाद साधावा:- मुलांच्या आभासाची गती वाढवण्यात संवाद कौशल्याचे महत्व मोठ्या प्रमाणावर आहे. ज्या ज्या वेळी मुलांमध्ये नकारात्मकता येत असेल तसेच त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होण्याची लक्षणे दिसत असतील अशा प्रत्येक वेळी शिक्षकांनी जाणीवपूर्वक मुलांशी संवाद साधावा.तुम्ही करू शकतात हा विश्वास निर्माण करावा.

प्रश्न: सर्व विषयांची आव्हाने पूर्ण करण्यात पिसा पातळीची मुले पुढे असतात त्यांच्यात आम्हीच आव्हाने पूर्ण करतो अशाप्रकारचा अहंगंड निर्माण होतो अशावेळी त्या मुलांसोबत कोणत्या कृती करायला हव्यात?

अशी स्थिती निर्माण होते तेव्हा वेळीच सावधानता बाळगली तर पिसा पातळीच्या मुलांसोबत न्यायप्रिय व्यवहार आपल्याला करता येईल.

स्तरानुरूप आव्हाने देणे, आव्हानांची काठीण्यपातळी :- पिसा स्तरातील मुलांच्या शिकण्याची गती जास्त असते अशा वेळी त्यांना अधिक वेळ गुंतवून ठेवता येईल तसेच त्यांच्या बुद्धीला खाद्य मिळेल अशी आव्हाने देण्याचे नियोजन शिक्षकांनी करणे आवश्यक आहे. मुलांना त्यांच्या हुशारीचा गर्व होतो किवा आम्हीच आव्हाने पूर्ण करतो या भावनेने ते वर्गातील इतर मुलांना कमी समजत असतील किवा त्यांच्यात अहंपणा निर्माण होत असेल तर त्यांना इतर मुलांसोबत सोपी किवा कमी काठीण्य पातळी असलेली आव्हाने दिली गेली असल्याची शक्यता आहे.आपण पडताळून पाहावे कि या मुलांना दिलेले आव्हान खरच आव्हानात्मक आहे का? कारण तसे असले तर अहंकार निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही.

21 व्या शतकातील कौशल्य विचार:-  पिसा स्तरातील मुलांना आव्हान देताना 21 व्या शतकातील कौशल्ये जसे क्रिटीकल थिंकिंग ,क्रियेटीव  थिंकिंग ,काम्युनिकेशन, कोल्याबोरेशन ,कोन्फिडन्स, कम्पेशन इत्यादी कौशल्ये विकसित व्हावीत या अनुषंगाने आव्हाने द्यावीत,असे केल्याने या मुलांच्या बुद्धीला योग्य खाद्य मिळेल आणि आपल्याला सुद्धा खूप काही शिकण्याची गरज आहे हे त्यांच्या लक्षात येईल.

पाठ्यक्रम पूर्ण करून इतर वेळेचे नियोजन:- पिसा स्तरातील मुलांना वर्षभरातील पाठ्यक्रम कमीत कत्यांच्या  जसे कि संगीत,नृत्य,इतर कला ,परदेशी भाषा शिकता येतील यासाठी शिक्षक नियोजन करणार आहेत असे प्रेरित करावे.

संवाद साधने:- मुलांमध्ये अहंकाराची भावना निर्माण होत असेल,आपल्या वर्गमित्रांना कमी लेखत असतील  अशा वेळी त्यांचे वागणे किवा आपल्या मित्रांशी होत असलेला चुकीचा व्यवहार वेळीच मुलांच्या लक्षात आणून द्यावा.मुले जाणीव पूर्वक असे करत असतील तर त्यांच्या पालकांशी संपर्क करून त्यांचे देखील कौन्सिलिंग करावे.

विषय मित्र म्हणून नेमणूक करणे:- पिसा  स्तरातील मुलांच्या शिकण्याची गती जास्त असल्यामुळे ते वर्गातील इतर मुलांना शिकण्यात उत्तम पद्धतीने मदत करू शकतात, म्हणून या मुलांना विषय मित्र म्हणून जबाबदारी घेण्यास प्रोत्साहित करावे. असे केल्याने मुलांमध्ये सहकार्य वृत्ती विकसीत होईल. अहंपणा कमी होऊन कम्पेशन च्या पातळीवर सर्व मुलांसोबत राहतील.

प्रश्न: खाजगी शाळांमध्ये शिक्षकांचे मोबाईल मुख्याध्यापक कार्यालयात जमा करून घेतले जातात त्यामुळे मुलांसोबत सेल्फी घेतले जात नाही,त्यांनी केलेल्या कृतीला प्रोत्साहन देता येत नाही?

भविष्यवेधी शिक्षण प्रक्रियेवर काम करत असताना मुलांना प्रोत्साहित करणे तसेच त्यांनी मिळवलेल्या यशाचा उत्सव साजरा करणे या दृष्टिने सेल्फी विथ सक्सेस या उपक्रमाचे महत्व अनन्य साधारण आहे.या निमित्ताने मुलांचे शिकणे आणि शिक्षक आपल्या मुलांसोबत करत असलेले काम ,प्रत्येक मुलाच्या शिकण्याचे नियोजन ,व्यवस्थापन आणि नेतृत्व करताना शिक्षकांना येत असलेले सकारात्मक अनुभव सोशल मेडियाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोचवला जातो,शिक्षक आणि शिक्षण क्षेत्राबद्दल समाजामध्ये निर्माण झालेली नकारात्मकता कमी करण्याचे महत्वाचे काम सेल्फी विथ सक्सेस च्या माध्यमातून केले जाते.असे असले तरी वरील प्रश्नात उपस्थित केलेली परिस्थिती निर्माण होऊ शकते यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे करता येतील.

शाळाप्रशासन/ मुख्याध्यापक यांच्याशी संवाद साधने :-  शाळेतील सर्व शिक्षकांचा मोबाईल कार्यालयात जमा करण्याचा निर्णय मुख्याध्यापकांनी घेताना काय विचार केला आहे किवा त्यांना असे का करावेसे वाटले हे प्रत्यक्ष  भेट घेऊन जाणून घ्यावे. कोणत्याही प्रकारचा वाद न घालता त्यांनी केलेली कृती योग्य आहे कि अयोग्य यावर स्टाफ मधील सर्व शिक्षकांना व्यक्त होण्याची संधी देवून जाणून घ्यावीत.

सेल्फी विथ सक्सेस चे महत्व पटवून देणे:- आपल्या शाळेतील मुख्याध्यापक सरांना सेल्फी विथ सक्सेस चे मुलांच्या शिकण्यात काय महत्व आहे? सेल्फी घेतल्याने मुलांच्या शिकण्याची गती कशी वाढते या बाबी उदाहरणासह पटवून द्यावेत.

अनावश्यक कामांसाठी मोबाईल चा उपयोग करणार नसल्याचे आश्वासित करावे:-  मुख्याध्यापकांनी मोबाईल जमा करून घेतले आहेत याचा एक अर्थ असा देखील असू शकतो कि त्याचा उपयोग शिक्षक मुलांच्या शिकण्यासाठी करत नसून स्वतःचे मनोरंजन तसेच खाजगी कामासाठी करतील आणि मुलांचे शैक्षणिक नुकसान होईल होईल याची त्यांना भीती आणि काळजी वाटत असेल अशा वेळी आपण मुलांच्या शिकण्याची गती वाढण्यासाठी तसेच वर्गात सुरु असलेली शिक्षण प्रक्रिया सर्वांसोबत शेयर करण्यासाठी मोबाईल चा उपयोग करू,अनावश्यक कामे तसेच शालेय वेळेत स्वतःचे मनोरंजन करण्यासाठी शक्यतो करणार नाही असे आपल्या मुख्याध्यापकांना आश्वासित केल्यास आपणास मदत होऊ शकते.

प्रश्न: शाळेतील सर्व शिक्षक सेल्फी उपक्रमात सहभाग घेत नाहीत.सेल्फी घेतलीच पाहिजे असे त्यांना वाटत नाही.जे घेतात त्यांना ते चिडवतात तसेच आपल्या कामाची बढाई मारतात असे म्हणून हिणवतात. काम करणाऱ्यांचा हिरमोड होतो?

असे वर्तन आपल्या सहकारी बंधू भगिनी कडून होत असेल तर मुळात सेल्फी हा उपक्रम कशासाठी आहे किवा त्याचे महत्व त्यांना समजले नाही असे म्हणावे लागेल. अशा शिक्षकांचे भविष्यवेधी शिक्षण प्रक्रियेवर आधारित चार दिवसांचे अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन हे प्रशिक्षण होणे गरजेचे असेल. आपण आपल्या स्तरावर आपल्या स्टाफ मधील बंधू भगिनी यांना प्रशिक्षणावर आधारित व्हिडियो पाहणे तसेच वाचन साहित्य आणि आव्हान पुस्तिका अभ्यासन्यास प्रेरित करू शकलात तर संपूर्ण प्रकिया त्यांना ज्ञात होईल आणि तुम्ही करत असलेल्या प्रत्येक बाबीला शास्त्रीय आधार आहे हे सर्वाना पटवून देता येईल तर आपणास विनंती असेल कि या समस्येचे निराकरण करण्यासाठी स्व: पातळीवर आधारित प्रयत्न करावेत.आपल्या सहकारी बंधू भगिनी यांना प्रशिक्षित करावे, जेणेकरून आपल्या कामामध्ये एकसूत्रीपणा येईल.

सेल्फी विथ सक्सेस या कृतीला वैज्ञानिक महत्व आहे .सेल्फिचा संबंध मानवी शरीरात स्त्रवणाऱ्या विविध संप्रेरके यांच्याशी आहे सेल्फीच काय तर भविष्यवेधी शिक्षण प्रक्रियेतील सहा पायऱ्या यांना शास्त्रीय आधार आहे तो कसा हे खालील पोस्ट वाचून समजून घेऊ.

Wow  आता आपण मोठ्या प्रमाणावर हे बोलायला हवेय की आम्ही सेल्फी विथ सक्सेस घेतोय म्हणते नैसर्गिक  रित्या  मुलांमध्ये हे  चारही हार्मोन तयार होण्याच्या प्रक्रियेवर काम करतोय.

Dopamine   हे एकप्रकारचे Reward chemical आहे. मग वर्गात मुलांनी मिळवलेले   छोटेछोटे यश आपण सेल्फी माध्यमातून साजरे करतोय. यशाची व्याख्या आपण शिक्षक भूमिकेतून न समजुन घेता मुलांच्या पातळीवर जाऊन समजुन घ्यायला हवी. बऱ्याच वेळा आपल्याला गोष्टी साध्या वाटतात पण त्या मुलांमध्ये हे हार्मोन वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतात. जसे एखाद्या मुलाने आपल्या मित्राला आपली पेन्सिल दिली ही कृती लहान वाटू शकते पण माझी वस्तु मी दुसऱ्याला देणे  ही बाब मूल पातळीवर मोठी असणार आहे. मग  आज  रागिणी ने तिची पेन्सिल योगिता ला दिली म्हणुन एखादा सेल्फी घेतला तर तो रिवार्ड असणार आहे. असे खूप छोटे छोटे प्रसंग आपण सेल्फीच्या माध्यमातून साजरे करत असतो. जे डोपामाईन तयार होण्यात मदत करणार आहे. असर पातळीच्या मुलांसोबत सुरवातीला अभ्यासाव्यतीरीक्त अशा कोणकोणत्या क्रिया मूल करत आहे हे शोधुन त्यांचे  मोठ्या प्रमाणावर सेलिब्रेशन केले तर त्याचा फायदा पुढे अभ्यासात आणि FLN पूर्ण करण्यासाठी होणार आहे.

Oxytocine  ला love Hormone   देखिल म्हणतात भविष्यवेधी शिक्षण प्रक्रियेतील learning interventions  हे love  Hormone वाढवणारे आहेत. मुलं एखादी कृती peer आणि Group मध्ये करतात तेव्हा शिकण्याची जी प्रक्रिया असते ती अत्यंत नैसर्गिक आणि निर्भय असते. जोडी , गटात किंवा विषयमित्र यांच्यासवे  शिकण्यासोबत मुलांचा मुलांशी जो संवाद होतोय त्यातुन त्यांचे एकमेकांशी संबंध प्रस्थापित होऊन मोठ्या प्रमाणावर Oxytocine  तयार होत असते. उदा. मला जी बाब येत नव्हती किंवा एखादे गणित येत नव्हते ते माझ्या मित्राने मला समजाऊन दिल्यास त्या मित्राबद्दल मला प्रेम , आपुलकी वाटते आणि ते मी अजुन दुसऱ्या कोणाला शेअर करते तेव्हा  शरिरात Oxytocin तयार होण्यास सुरुवात झालेली असते. मुलांसोबत काम करतांना विषय मित्र खूश दिसतात कारण त्यांना उमजलेले शिकण्यातले गुढ इतर मुलांना सांगण्याचं व्यासपिठ आपण उपलब्ध करून देतय. मला येतंय सगळ्यांना यायला हवं या compassion पातळीवर मुलं पोचतात ते  love Hormone वाढण्यास मदत करतेय.

Serotonin हे एक प्रकारचे Mood stabilizer आहे.

भविष्यवेधी प्रक्रियेच्या ६ बाबींवर काम करतांना स्वतः शिकण्याच्या प्रक्रियेत  किंवा एकंदर सर्वच बाबीवर अनेक वेळा मुलांचे मूड स्विंग्ज होतांना आपण अनुभवतो. पारंपारिक शिक्षण प्रक्रियेत प्रत्येक मुलाचे मूड स्विंग्ज अनुभवणे किंवा ते निरिक्षणातुन जाणणे अवघड होऊन बसते अशा वेळी माझा मित्र आज उदास दिसतोय हे शिक्षकाच्या आधी मुलांना कळालेले असते आज माझी पियर असणार उदा. अजय उदास दिसतोय तेव्हा मला आधी ते कळते त्याबद्दल  मी  त्याच्याशी बोलते अडचण समजुन घेते त्याची आमच्या गृपमध्ये चर्चा होतेय विषयमित्राची मदत होतेय नाहीच तर पुढे गुरुजी किंवा बाई आहेतच ही प्रक्रिया मुलांचे Mood stabilize  होण्यासाठी काम करतेय  कारण पूर्वी फक्त शिक्षक होता आता इतर पर्याय जे नैसर्गिक आणि अनियंत्रित आहेत.

Endorphine  हे  pain killer सारखे काम करते

भविष्यवेधी शिक्षण प्रक्रियेमध्ये असर पातळीच्या मुलांचे दुःख काय असते हे आपण मोठ्या प्रमाणावर अभ्यासतोय वर्गातील मुलं , पालक , शिक्षक , समाज जेव्हा  सहज असे बोलुन जात असेल की उदा प्रियंकाला साधं वाचता लिहिता सुध्दा येत नाही अशा वेळी तिच्या दुःखाचं कारण समजुन घेण्याचं काम ६ बाबींच्या माध्यमातुन होतेय. एकदा की समानानुभूतीच्या पातळीवर जावुन  असर चे मूल समजुन घेतले त्या दुःखाची जाणीव होईल आणि मग पुढे दुःखनिवारण होण्यासाठी उपाययोजना केली जाईल. Pisa ची मुलं Nas , Asar च्या मुलांसोबत काम करत आहेत म्हणजे त्यांना त्यांचे दुःख ( इतरांना येते मलाच का नाही? या अनुषंगाने ) माहीत आहे  आणि  त्याच्या निवारणार्थ 6 कौशल्यांच्या माध्यमातून काम होतेय. या संपूर्ण प्रक्रियेत Endorphine   वर काम होतय.

आता हे सगळं लिहितांना मला जाणवतय की माझ्या शरिरात जिथे कुठे असेल तिथे OXYTOCIN स्त्रवतंय नेमकं मेंदुतून की काय? कोण जाणे

 पण स्त्रवतय हे नक्की 😄😄 आणि मग ते भारी भारी वाली Feeling येतेय

आणि आता पुढे जे कोणी तुम्ही वाचुन छान छान म्हणुन  रिवार्डाल😄😄  त्यातुन Dopamine  तयार होईल. का तेपण तयारच झालय काय की🤣 

  प्रियंका पाटील

अशाप्रकारे संपूर्ण भविष्यवेधी शिक्षण

सर या वैज्ञानिक दृष्टीसाठी  Thank you  so much आमचा तरतम भाव विकसित होत जावो ही या 6 हार्मोन्स च्या चरणी ..🙏🏻🙏🏻 😄